शेख महंमद चरित्र - भाग २९

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


देवनाथांचा कवितासंग्रह छापतांना प्रस्‍तावनेत रामकृष्‍णनाथांचे (देवनाथांच्याच परंपरेतील शिष्‍य) श्र्लोक दिलेले आहेत. त्‍यांत परंपरा दिली आहे. तिची सुरवात अशीः

‘‘नारायणांपासुनि बोध झाला । तेणें सुखें तो ‘विधि’ पूर्ण झाला ॥
त्‍यापूर्ण बोधासि लिहून पत्रीं । केली सुखी जो निज पुत्र ‘अत्री’ ॥१॥
महाराज दत्तात्रयाचे कृपेनें । पुढें ‘चंद्रबोध’ सि ऐक्‍यत्‍व बाणें ॥
कृपें ‘बोधराजा’ ‘जनार्दन’ प्रबोधी । ‘जनार्दन’ कृपें  ‘एकनाथी’ समाधि ॥२॥’’.
म्‍हणजे देवनाथाच्या परंपरेत जनार्दनपंताचे गुरु चंद्र बोधले हे ज्ञात होते यांत शंका नाही.

शिवरामस्‍वामी (कल्‍याणी), एकनाथांचे नातू, यांच्या ‘भगवद्‌गीताचंद्रिका’ या ग्रंथास त्‍यांनी शेवटीं एक परिशिष्‍ट जोडले आहे. हें कन्नड छंदांत असावे. त्‍यांत एकनाथांची गुरुपरंपरा सांगितली आहे.

‘‘.....म्‍हणुनि पूर्ण परंपरा हें आदि अंतीं शिवस्‍वरूप घराशि आली तो अनुक्रम संत हे ऐका ॥२४॥
ईथ दत्त तथा सदानंद तयाचा शिष्‍य रामानंद निर्मलदेव तो गंभीर गुरुरावो । ब्रह्मआनंदाख्य सहजानंद योगीराज पूर्णानंद चित्तीं साटवा तुम्‍ही सदानंद ॥२५॥
देव नारायणगुरु अवतार दाहा रचुनि नटुनि प्रकटला धरुनी च हा अवतार आकरावा । सहजराजकुळीशि भूषण बाप नारायण माता लक्ष्मीविराजित एकनाथपरंपरा ऐका ॥२७॥
देवनारायण तयाचा तोचि पूर्णानंद होउनि शिवमुखी प्रकटोनि गीताचंद्रिका प्रकटी । मुखा आदी शिवगुरु मग दत्तयोगीराज बरवा चंद्रआश्रम या जनीं च जनार्दनू जाण ॥२७॥
एकनायक तोचि जाली बाळकृष्‍णचि होउनि लक्ष्मीशस्‍वपदीं ठेविलें नारायणकार ।
तोचि लक्ष्मी माय होय परंपरारूपेंचि हें प्रत्‍यक्ष गोदी आपण जाली कन्यकारूप ॥२८॥
मेरु सहजानंद नारायणगुरु स्‍वपरंपरामंदार येकोबाचि लक्ष्मी संप्रदायाची ।
येका रूपा भूमिका जेथें सहज तें बीज पडतां सरळ हा शिवरामअंकुर सुक्ष्म अंकुरला ॥२९॥’’.

सारांश शिवरामस्‍वामींच्या परंपरेत ‘चंद्र बोधलेच्या घरांत दत्तयोगिराज’ हाच जनार्दनस्‍वामींचा गुरु मानला आहे. हा दत्तयोगिराज म्‍हणजे चंद्र बोधलेंचें संन्यासाश्रमांतील नांव हे सहज लक्षांत येण्यासारखें आहे.
महिपतीबावांनीं आपल्‍या एकनाथ-चरित्रांत जनार्दनपंत व चंद्रभट यांनी वाणी उत्तम म्‍हणून एकनाथास ग्रंथकार्य करावयास प्रवर्तविलें व त्‍याचें लेखन त्‍यांनी नवाजिलें हा कथाभाग थोडासा अतिशयोक्तीनें दिला आहे. त्‍याचप्रमाणें जनार्दनपंतांच्या गुरूनें ‘त्रिपदा पिळिली, कुतरी पान्हाइली’ ही कथा, जरी पाल्‍हाळानें व कांहीं अवांतर अप्रस्‍तुत गोष्‍टींचा समावेश करून दिली असली तरी, एकनाथांच्या चरित्रांत वर्णिली आहे. मात्र तो गुरु म्‍हणजे मलंगवेषधारी माणूस होता असें सांगून पुढें तो ‘दत्त’च सांगण्याचा प्रयत्‍न केला आहे. चंद्रभटाचा जनार्दनपंतांशीं संबंध म्‍हणजे तो एक त्‍याचा सांगाती होता इतकाच दर्शविला आहे. चंद्रभट वैराग्‍य किंवा चतुर्थाश्रम घेऊन दौलताबादेस जनार्दनपंतांजवळ राहिला हें सांगितल्‍यानंतरची जी हकीगत महितपतिबावांनी दिली आहे ती मननीय आहे. हा सर्व कथाभाग पूर्वार्धांत उद्‌धृत केलाच आहे. त्‍याची पुनरावृत्ति येथे न करितां फक्त चंद्रभटाचे समाधीबद्दलचा मजकूर सारांशानें देतो. त्‍यांत महिपतीकालीन त्‍यानें प्रत्‍यक्ष पाहिलेली माहिती आली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP