शेख महंमद चरित्र - भाग ७
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
पहिला प्रसंगः
‘‘आतां माझे नमन जी सद्गुरु । करावा पतिताचा अंगिकारु । तुम्ही महा वरिष्ठ दिगंबरु । दीन तारक दुजे ॥२७॥
मानापमान वेगळें केलें । शिष्यत्व लोपवुनि गुरुत्व दिधले । परि म्यां पाहिजें जतन केलें । कृपेनें तुमचें ॥२८॥
मायबापाचा आठवतां उपकार । त्यांनीं हा वाढविला संसार । परि भवमोचकाचा विचार । नेणतीच कांहीं ॥२९॥
......शाण्णव कुळींचें कवीश्र्वर । आणिक निजभक्त उदार ।.....॥५७॥’
’---१०० ओंव्या.
दुसरा प्रसंगः १०४ ओंव्या.
तिसरा प्रसंगः
‘‘पंडित म्हणती काय बोले तुरुक ।....॥२९॥
.....ये मनुष्य देहीचीं सगुण पितरें । तीं मज वाटलीं महा पवित्रें । तीं ये ग्रंथीं मांडावीं नाममात्रें । आज्ञा द्यावी सद्गुरु ॥४७॥
याति गोरे [घोरी ?] राजमहंमद पिता । सगुण पतिव्रता फुलाई माता । ते प्रसवली अविनाश भक्ता । शेख महंमदालागीं ॥५०॥
हीं स्थूळ देहींचीं सांगितलीं मातापितरें । मूळ पिता न कळें शून्य आधारें । सहज सद्गुरु लाधला संचितकारें । पुसावयालागी ॥५१॥
....यासि आश्रय नाहींत पुराणें । ऐसें कोणी एकाचें बोलणें । जैसे स्वात्मसुख केलें जनार्दने । तैसा हा उद्गार ॥६६॥
हें श्रीमुखीचें गीताशास्त्रवचन । ज्ञान ठाणदिवीचा प्रकाश गहन । शेख महंमदीं केलें निज भोजन । मीन उर्ध्वं मुखे ॥७७॥’’
--- ११० ओंव्या.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP