शेख महंमद चरित्र - भाग १३

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जनार्दनपंतांनीं एकनाथास आपल्‍या गुरूचें दर्शन करविले. त्‍याबद्दल एकदोन कथा महिपतिबाबा देतात. त्‍या पुढील चर्चेस उपयुक्त असल्‍यानें त्‍यांचीहि थोडक्‍यांत नोंद करणें

टीपः
तंजावर मठपति समर्थशिष्‍य भीमस्‍वामीकृत ‘श्रीसमर्थचरित्र’ -रामदास आणि रामदासी, भाग २ रा - श्रीसमर्थांची दोन जुनी चरित्रें, धुळें १९०३ इ. (लेखनकाल १६८१ इ.) यांत पृ. १३-४ वर भीमस्‍वामी लिहितातः ‘‘चंद्रगिरी माजी गवी (डोंगरांची खांड) । तेथें वास करी कवी । त्‍याचा जागा तो पूर्वी । शहापूरा ॥११॥

‘‘चंद्रगिरीचा डोंगर । त्‍यांत गुप्त एक शिखर । तेथें राहें योगेश्र्वर । निरंजन । ॥१॥ रे नवल त्‍या  निरंजनाचें । शिखर पाहों आकाशाचें । ऐसे पृथ्‍वीमध्यें कैचें । पाहों जातां ॥२॥
जागा सुंदर गहन । तेथें सुख पावे मन । वरी पाहतां गगन । सांठविलें ॥३॥
तेथें अखंड नाहीं वात । म्‍हणोनि जागा तो निवांत शीत काळीं धुमधुमीत । वस्त्रा न लगे ॥४॥
कृष्‍णा कोन्या दोहींकडे । मध्यें पर्वताचे कडे । मंडळ पाहातां चहूंकडे । समाधान ॥५॥
तळी असतीं शेत भातें । तेथें फिरताती अऊतें । नानापरीचीं मार्गस्‍ते । येती जाती ॥६॥
वरुती सेरडें मेंढरें । गुरेंसी गुरें वासुरें । ठाई ठाई गुराखी पोरें । क्रीडा करिती ॥७॥
भोंवती डोंगरांचीं थाटी । दिसती कडे आणि कपाटें । सवेंच येऊनि धुकटें । झांकोळिती ॥८॥
तळीं पाहातां आकाश । दिसे दुसरें कैलास । तेथें जावया संतोष । वाटतसे ॥९॥ तया खालती आहे माण । वरतें आहें तळकोंकण । कर्‍हाड देवगिरीपट्टण । पंचक्रोशी ॥१०॥
राया रघुनाथाचें देणें । जालें हनुमंताकारणें । देव पाहावया पारणें । लोचनाचें ॥११॥
रामदासाचा विसावा । रुद्रु जाहला अकरावा । भक्तजन वेगीं धांवा । दर्शनासी ॥१२॥.’’
श्री. शंकरराव देव आपल्‍या प्रस्‍तावनेंत लिहितात कीं, ‘‘शहापुराहून श्रीसमर्थ चंद्रगिरीस राहावयास गेले (चरेगांवच्या मागचा डोंगर) तोच चंद्रगिरीचा उर्फ चांदोबाचा डोंगर. त्‍या डोंगरांतील समर्थांची गुहा अद्याप पाहावयास मिळते.’’ (पृ. १५, सदर)


आवश्यक आहे. ‘भक्तविजया’ च्या पंचेचाळिसाव्या अध्यायांत दोन कथा आल्‍या आहेत, त्‍यांत जनार्दनपंतांनीं एकनाथास आपल्‍या गुरूच्या भेटीस जातांना बजावले की, कोणत्‍याहि स्‍वरूपांत सद्‌गुरूची भेट झाली तरी संकोच वगैरे न धरतां दिलेला प्रसाद वगैरे घे. एकनाथानेंहि ते मान्य केले. नंतर ते निघाले. असा पूर्व भाग सांगितल्‍यावर महिपति लिहितो की, ‘‘ऐसा जाणोनियां हेत । एकनाथ नेलें अरण्यांत । तेथे अकस्‍मात अनुसुयासुत । आलें त्‍वरित भेटावया ॥७५॥
जनार्दन म्‍हणे एकनाथा । आमुचे स्‍वामी वोळखीं आतां । ते अविंध बैसोनि अश्र्वावरूता । आला अवचितां त्‍या ठाया ॥७६॥
येकरूप देखतां दृष्‍टि । येकनाथ जालें भयभीत पोटीं । प्रत्‍यक्ष यवन दिसतो दृष्‍टि । असत्‍य गोष्‍टी मज वाटे ॥७७॥
विशाल डोळे आरक्त नयन । हातीं शस्त्र अश्र्ववाहन । सन्निध येऊनि उतरला जाण । मग केलें जनार्दनें नमन त्‍यासी ॥७८॥
यवनभाषा अनुसुयासुत । जनार्दनासी बोलत । ते दृष्‍टी देखतां एकनाथ । नवल करित मनांत ॥७९॥
सद्‌गुरु म्‍हणती जनार्दना । क्षुधा लागलीं करूं भोजना । तेथें पक्वान्नी करूनि जाणा । नवल स्‍वामीनें दाविलें ॥८०॥
रत्‍नजडित कनक ताट । त्‍यांत षड्रस वाढिले त्‍वरित । जनार्दन बैसोनि निकट । जेवी स्‍पष्‍ट सांगातें ॥८१॥’’.
यावेळीं सद्‌गुरुने जनार्दनास त्‍याच्या जवळ असलेल्‍या मुलास (एकनाथास) भोजनास बोलवावयास सांगितले. जनार्दनपंतांनीं बोलाविले. परंतु यवनाचें अन्न कसें खावें म्‍हणून एकनाथ पळून गेला.

जनार्दनपंतांने एकनाथास नंतर पुन्हां एकदां सद्‌गुरुदर्शनास अरण्यांत नेले. ‘‘ऐसे म्‍हणोनि त्‍याप्रति । अरण्यांत गेले सत्‍वर गती । मलंग धरूनि अवचितीं । दत्तात्रय मूर्ति दिसतसे ॥१००॥
मायारूप तेचि कामिनी । काम धेनूसवें दिसोनि । सुनी बैसे रूप देखोनी । जनार्दन मनीं आनंदलें ॥१०१॥
......यवन भाषेनें अनुसुयासुत । जनार्दनासी काय बोलत । क्षुधा लागली बहुत । तरी भोजन त्‍वरित करावें ॥१०३॥
मग मृत्तिकापात्र सत्‍वर काढोनी । त्‍यामाजी दुहिली शुनी । तिच्या दुग्‍धांत अन्न चुरुनी । बैसले भोजना उभयतां । ॥१०४॥’’.
सद्‌गुरुनें एकनाथास बोलावण्यास सांगितलें. परंतु ‘‘वचन ऐकोनि एकनाथ । मनांत जालें संकोचित । साक्षात फकीर दिसत । कैसें अनुचित करावें ॥१०६॥’’.
जनार्दनपंतांनीं असे करणें चांगलें नव्हे म्‍हणून एकनाथास सांगितलें व प्रसाद म्‍हणून उच्छिष्‍ट एक ग्रासहि दिला. परंतु तो एकनाथानें सेवन न करितां वस्त्राचें पदरीं बांधोन ठेविला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP