मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|चरित्र| भाग ८ चरित्र भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४ भाग १५ भाग १६ भाग १७ भाग १८ भाग १९ भाग २० भाग २१ भाग २२ भाग २३ भाग २४ भाग २५ भाग २६ भाग २७ भाग २८ भाग २९ भाग ३० भाग ३१ भाग ३२ भाग ३३ भाग ३४ शेख महंमद चरित्र - भाग ८ श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग Translation - भाषांतर चवथा प्रसंगः‘‘शरीर जें नामें रंगलें मुसलमान । तें शरीर पूजिलें पीर म्हणोन । मृत जाल्या चाले महिमान । यालागीं शुभ आचरावें ॥२२॥..... आतां सद्गुरूस करूनी नमस्कार । आदरें नमस्कारिलें चराचर । हे शहाण्णव कुळीं माझें गोत्र । ज्ञानविज्ञान भासे ॥४९॥....दश लक्षणीं प्रमाणता आवडी । एक एकें चरणीं घ्यावी गोडी । तोडोनियां द्वैताची बेडी । गोदा-नीर व्हावें ॥६४॥.....ऐका भिसभिल्ल अल्ला हूं अकबर । टीका धरा भावभक्तीचा अंकूर । एवं बोलते हजरत मिरां पीर जहीर । दीन उद्धरणालागीं ॥९५॥.....निकट बौधिक हृदयीं गंगानीर । ऐसे शिष्य अंगिकारावे ॥९६॥---१०३ ओंव्या.पांचवा प्रसंगः‘‘मुलाणा तो जो आपुलें मूळ जाणें । आपुलें दुःख तैसें परावें माने । अनिर्वाच्य बांग ब्रह्मांड दणाणे । सोऽहं तसबि फेरी ॥८१॥अहंकार टोणगा अक्कल सुरी । विवेकें कापून भक्षण करी । उन्मनि मशिदींत नमाज गुजरी । त्या बोलिजे मुलाणा ॥८२॥ फकीर तो जो राग विषयीं सांडवला । श्र्वास उच्छ्वासें नित्य आठवी अल्ला । देखोनि पळे बाष्कळ गलबला । एकांत सुख भोगी ॥८३॥ फकीरपणाचा दावी ना तोरा । स्वयें वाटा बुजविल्या तेरा । प्रेमाचा अंमल लागली सहज मुद्रा । सत्य फकीर जिंदा ॥८४॥.....यवनांचा आचार्य मुल्ला काजी । सकळ अधर्मांसी द्यावी बाजी । गोत्रास करावें भक्तीस राजी । तो आचार्य खरा ॥९९॥ चौदा पंथाचा आचार्य सोफी खरा । आपल्याच मार्गास म्हणती बरा । आणिकातें निखुंदुनि करी तोरा । त्याचें ज्ञान मिथ्या असे ॥१००॥’’---११६ ओंव्या.सहावा प्रसंगः‘‘..... विकासे शेख महंमद मुसलमान ।.....॥१०॥ मुसलमान म्हणविलें एक्या गुणें । मुसेस नव मास वस्ती करून । होतो म्हणून वोळखा खूण । पवित्र हो तुम्ही ॥११॥’’---१२१ ओंव्या.सातवा प्रसंगः‘‘पर्वकाळ रविवार दिन । तीरा गेलों तुमचें सेवेलागून । तेथें कां मज लावियलें पान । सांगा स्वामी पुसतों भावें ॥९३॥ ऐसें भुजंगानें डंखिलें तिनदां । तिनदां विष दिधलें गोविंदा । तुझें काय चुकलों परमानंदा । मज कळले पाहिजे ॥९४॥ यावेगळें मज छळति दुर्जन । नानापरी बोलती अवलक्षण । इंद्रियेंहि घाले घालिती जपोन । परी चकेच ना तुझें कृपें ॥९५॥ भाव भक्ति वैराग्य करितां मना । महा कष्टी जालों बा निज मंडना । तुझी सत्ता सकळ त्रिभुवना । मज कां गांजविशी ॥९६॥ शेख महंमदी संतोष सद्गुरु खुणें । सत्य स्वामी जेव्हां लागली होतीं पाने । तेव्हां धावां केला अद्वैत बोधानें । मग झेंडू फुटोन गेला ॥९९॥....भावें वर्णिली ईश्र्वराची लीला ।.....॥१००॥’’---१०० ओंव्या. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP