मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्लोक २१ ते ३०

पवित्र उपदेश - श्लोक २१ ते ३०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

प्रपंच वाटे जरि गोड व्हावा । निष्कारण क्रोध मुळीं त्यजावा ॥
हें तत्त्व थोडयांतमनीं पटेना । बैसे अहंवृत्ति न ते उठेना ॥२१॥
कुटुंबी जनी  राघवाच्या चरित्रा । मनी आठवावें कृती ती पवित्रा ॥
सदा पूर्ण कल्य ण होईल जाणा । स्वभक्ताभिमानी प्रभू रामराणा ॥२२॥
दिलें वचन एकदां रघुवरें जयासी पहा । असत्य न करीच तें जगिं अशी सुकीतीं महा ॥
तशीच वनिता सती जनकजा तिच्या वांचुनी । स्त्रिया सकळ मानितो जननि त्या मना पासुनी ॥२३॥
रामावतार सकळां बहु पूज्य वाटे । आदर्शभूत अति तत्तम दावि वाटे ॥
दे भुक्ति मुक्ति शरणागत जो तयाला । सांगें कसा विसरुं या तरि दातयाला ॥२४॥
अद्दष्टें जयां लाभलें अन्न पाणी । न व्हावें तयां नम्र जोडूनि पाणी ॥
सदा जानकीनाथ चित्तीं धरावा । प्रयत्नें तया आपुलासा करावा ॥२५॥
विपत्काळीं माझ्या परमसदयें सद्‌गुरुवरें । फिरावीं गे त्यांच्या करुनि कविता श्रीयुत घरें ॥
न कोणी तो पावे मग भजन भावें प्रभुवरा । दिल्या हाका आला रघुपति दयासागर खरा ॥२६॥
मुनिजन सुखकारी सर्व संतापहारी । जनन मरण वारी राम कोदंडधारी ॥
दशवदन विदारी जो स्वभक्तांसि तारी । निशिदिनिं मदनारी गात ज्या प्रेमभारी ॥२७॥
चरित्र माझ्या प्रभु राघवाचें । गातां मुखें नाम नुरे भवाचें ॥
या प्रत्यया घेउनियां पहावें । साधूनि हा योग सुखें रहावें ॥२८॥
माते समान परनारि सदा पहावी । हें दिव्य तेज पुरुषां रघुराज दावी ॥
बापा समान नर अन्य तुम्हीं विलोका । सीता स्त्रियांसि शिकवी हरि दु:ख शोका ॥२९॥
मोठें धैर्य तिचें पहा स्वभवनीं नेतां दश्यास्यें तिला । केले यत्न परंतु जाण वश ती झालीच ना त्या खला ॥
चित्तीं ध्यान धरूनियां स्वपतिचें षण्मास ते राहिली । भेटे राम तिला वधी दशमुखा कीर्ती जनी गाइली ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP