मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ४०६ ते ४१०

गवळण काल्यांतील पदें - पदे ४०६ ते ४१०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

गोपिका यशोदे प्रत-

पद ४०६ वें.
बाइ न धरिं ह्लदयिं भय हरि अचाट निज थाट मेळवुनि हा स्वगणाव्नित वाट रोधुनि मागें पुढें आपणचि होय न०॥धृ०॥१॥
चोज न वदवे मौजचि केवळ योजुन पहातां अंत न लागुनि मिपण त्यजुनि राहें होउनियां तन्मय ॥न ध०॥१॥
स्वरुपावरि वृत्ती आवरिं द्वैत न तिळ-भरि, आठवु दे मज हितगुज तजविज आपणचि करि प्रिय ॥न ध०॥२॥
आत्म भजनि लवि आत्मविचारें, कृष्ण जगन्नाथ अगुण-सगुणि जेथें तेथें प्रक-टुनि आपणचि खेळे सुखमय ॥ न धरिंह्लदयिं भय हरि अचाट०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत-

पद ४०७ वें.
मुरारे गोपीसी कधीं न जाय आंतरे सुखविचारे विहर मुरारे ॥धृ०॥
तुजकरितां हरि श्रमवुनि कातरी चुकवी अविद्यादि हे अपाय ॥आंतरे०॥१॥
नित्य निरंतर तूं तंव हितकर नावडे त्वदन्य व्यवसाय ॥ आंतरे० ॥२॥
प्रिय नवनूतन आनंद चिद्धन कृष्ण जगन्नाथा तुझा काय ॥आंतरे सुख विचारे विहरे मुरारे ॥३॥

गोपिका यशोदे प्रत-

पद ४०८ वें.
लाज न तिळ या इलाजचि नचलेग वाजचि दे मजला ॥धृ०॥
काज न आणिक साजणि पाहतां ग माजला स्वसुखी भला । सांज सकाळीं हा जनदेखत आत्मरतीं सजला ॥लाज०॥१॥
असतां सहज मज कळउनि निजगुज पळवी द्वैताला । स्वात्मखुणेनें अंतरिं नेउनि साधितो स्वहिताला ॥ लाज०॥२॥
स्वस्वरुपीं रत कृष्ण जगन्नाथ अद्वय करितो मला । हरुनि अहंपण स्फुरवितो आपण अंतर्बाह्य एकला ॥लाज०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत-

पद ४०९ वें.
बारे जगज्जीवना कैसें आवडे मना ॥धृ०॥
व्रज वधु या तुजसाठीं, गजबज करिती जाणसीत ना ॥बारे०॥१॥
अगणित गुण तरी, न गणवती हरी वारी देहवासना ॥बारे०॥२॥
कृष्ण जगन्नाथा स्वहितार्था लावी सकलां जना ॥ बारे जगज्जीवन कैसें आवडे मना ॥३॥

श्रीकृष्णाच्या मुरलीनादें निमग्न झालेल्या गोपिकांचा परस्पर संवाद-

पद ४१० वें.
मुरलि रविं मुरलि मति ग माझी, मुरलि रविं मुरवी नुरवि संसार घरदार आपपर हरी मुर० ॥धृ०॥
प्रापंचीक धंदा हरि गोविंदचि । पद दधी घृत नवनितयुत जातां तरि ॥मुर०॥१॥
अद्वय चीद्धन नित्य निरंजन । तनुमन धनजन वन आपणचि करी ॥मु०॥२॥
पुरवि मनोरथ कृष्ण जगन्नाथ । दावुनियां आत्मपथ स्वरुपिं निश्चल वरीं ॥ मुरलि रविं मुरवि मति ग माझी० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP