मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे २९९ ते ३००

श्री नवदुर्गेचीं पदें - पदे २९९ ते ३००

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पदें २९९ वें.
आइ मज नवदुर्गे नवदुर्गे सदा आनंदमय कर गे ॥धृ०॥
दुर्गतिच्या संसर्गे, श्रमलों मी इंद्रिय वर्गें ॥आ०॥१॥
ब्रह्मादिक सुरवर गे । वंदिति स्तविति तुज निरंतर गे ॥आ०॥२॥
भवनिधि हा दुस्तर गे । तरवुनी जनन मरण निस्तर गे ॥आ०॥३॥
निश्चय ज्या तुजवर गे । त्याचा घेसि प्रपंच भर गे ॥आ०॥४॥
मजवरि मन निष्ठुर गे । करुनी होउ नको कधिं दुर गे । आ०॥५॥
संसारिक हुर हुर गे । आत्म कृपेविण हे कसि दुर गे ॥आ०॥६॥
त्रिविध ताप संहर गे । कळउनि आपण सुखसागर गे ॥आ०॥७॥
हाचि मला दे वर गे । कधींच न पडो आत्म विसर गे ॥आ०॥८॥
दे निज भजनीं भर गे । कृष्ण जगन्नाथा दृढ तर गे ॥आ०॥९॥

पद ३०० वें.
श्री नवदुर्गें निज करुनि कांहीं जगदंबे श्री० मज काम क्रोध मत्सरादि रिपु गांजिति हे परिहारी ॥धृ०॥
प्रणव रूपिणी शिणविसि कां मज, तुजविण पहातां कोणी, रक्षिता त्रिजगीं नाहीं । देह मीपण नुरवुनि आत्मशक्तिनें संकट विघ्न निवारीं ॥श्री०॥१॥
सच्चित्सुख स्वरुपा आपण, एकचि त्रिभुवन नटली, संत हे वदति पाहीं । ऐसा अखंड अनुभव देउनि मिळविं स्वानंदा माझारीं ॥श्री०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाच्या करुणा शब्दें जागुनि सर्वदा ह्लदयीं राहीं । तूं बाह्याभ्यंतर भेद रहित निर्वेद फिरविं संसारीं ॥श्री०॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP