मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे १८१ ते १९०

प्रार्थनापर पदें - पदे १८१ ते १९०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद १८१ वें.
प्रिय ज्याचें नाम भालचंद्रा नियमि त्या गाइन रामचंद्रा ॥धृ०॥
भयहर सुखकर गुण ज्याचे नयनीं या पाहिन त्याचे ॥प्रि०॥१॥
निज जन तारक पक्षपाती, विजयि जो त्रिजगीं भक्त गाती ॥प्रि०॥२॥
देव एक रामचि त्रिभुवनाचा, सेवकाचा पुरवि काम साचा ॥प्रि०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ भजनीं, रंगुनि नाचे दिनरजनीं ॥प्रि०॥४॥

पद १८२ वें.
चला अयोध्येसि जाऊं । नाथ जानकिचा पाहुं ॥धृ०॥
संत साधु सद्भक्तांचा, मेळा मिळुनि किर्तनाचा गजर होतो आनंदाचा, तेथेंचि अखंड राहुं ॥च०॥१॥
टाळ मृंदगाची ध्वनी, नाम घोष पडती कानी, देह भान हारपोनी, पूर्ण ब्रह्मानंद लाहूं ॥२॥
रत्न जडित सिंहासनि, श्रीराम कोदंड पाणी, विराजे तो मोक्षदानी, त्याचे पायीं लक्ष लाउं ॥च०॥३॥
शरयु गंगेचे तटीं, किति सज्जनाची दाटी, ऐशीयाची घेउनि भेटि, राघवाचे गुण गाऊं ॥च०॥४॥
वैष्णव सद्नुरु अ़चलारामीं,  कृष्ण जगन्नाथ स्वामी, राम ध्यातां अंतर्यामी, द्वैत भाव हा न साहुं ॥च०॥५॥

पद १८३ वें.
सुख सागर आजि राम पाहुम नयनिं सुख० विषयांत निमिष नाहीं सुख सुख सुख ॥सुख साग०॥धृ०॥
राजिव लोचन माझी पुरविल आस, देइल विश्रांति निज पदिं या जिवास, काया मनें वाचा निश्च्य साचा, फिरुनि संसारिं काय वरव वरव वरव ॥सु० सा०॥१॥
रत्न जडित सिंहासनिं रघुराज, सन्मुख नाचति भक्त सांडुनियां लाज, गजर करिति नामस्मरणाचा, कोटि सूर्य प्रभा फांके लख लख लख ॥सु० सा०॥२॥
आपद, धरितां दृढ विश्वास जयाचा, त्रिविध तापें न होय रख रख रख ॥सु० सा०॥३॥

पद १८४ वें.
भक्त जग काम कल्पतरु धीर पातला रामचंद्र रघुवीर ॥धृ॥
कीर्तन प्रिय हरि वर्तन करि, सद्वर्तन ज्याचें स्थीर ॥पा०॥१॥
निज नामाचा लंपट साचा, प्रेमें गुण गंभीर॥पा०॥२॥
 विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभु, लाउनियां न उशीर ॥पा०॥३॥

पद १८५ वें.
राम हा जनक जनकजामाता जनकजामाता ॥धृ०॥
जो सच्चिदानंदघन मुळीं, रावण वधार्थ भूमंडळी, अवतरला दशरथ कुळीं, भक्ति सुख हाता ॥रा०॥१॥
त्रिगुणात्मक विश्व पसारा, नटला आपण जो सारा, तो प्रगटला भक्त कैवरा, नाहिं भय आतां ॥रा०॥२॥
ब्रह्मेंद्रादि उमाशंकर, स्तविति ज्या अहर्निशीं निरंतर, तो हा कोटि मदन सुंदर त्रिभुवन त्राता ॥रा०॥३॥
शुक सनक सनक योगी भले, तेहि या सगुण ध्यानि रंगले, त्रिजग नगीं चित्कनका लाभले, जन पथिं जातां ॥रा०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, सगुण निर्गुणैक्य भावाचा, आला अनुभव हा साचा, नित्यगुण गातां ॥रा०॥५॥

पद १८६ वें.
कोणी कांहिं ह्मणा श्रीराम धणी को० केला राम० को० मज राम० ॥धृ०॥
अकळ अगम्य जयाची करणी, सकळ जना सुख कारक स्मरणीं, केवळ भवनिधि तरणी ॥के०॥१॥
दक्ष सदा तो पतितोद्धरणीं, अखंड जागे अ:करणीं, तम हर चित्सुख तरणी ॥के०॥२॥
अक्षय आनंदाची भरणी, अघटित लीला करि अवतरणी, लिहिता न पुरे धरणी ॥के०॥३॥
असंग जो विक्षेपा वरणी, ज्यावरि ब्रह्मांड उपरणीं, भक्तां संकट हरणी ॥के०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ विचरणी, व्यतिरेकान्वय ज्ञान विवरणी, ठाव दावि निज चरणी ॥के०॥५॥

पद १८७ वें.
जीवन सर्वां जीवांचा, श्री रामचि साचा, काय निश्चय मतिचा, हा जडला ॥धृ०॥
जो अनंत ब्रह्मांडें नटला, पटतंतु घट मृद्वत्पटला, भक्तांस्तव दुष्ट वधीं झटला, तो मज या सज्जनाच्या संगतिचा अंगीं, भजन प्रसंगीं, कीर्तन रंगीं, सांपडला ॥जी०॥१॥
बाह्याभ्यंतर व्यापक सर्वां जो, सच्चित्सुख आपण बरवा तो, निरखिन हरिखें नित्य नवा उत्साहें या मनाचा जो, काम पुरविता नामचि गातां शामसुंदर प्रभु आवडला ॥जी०॥२॥
विधि सुरवर हर शंकर गिरिजा, परमात्म विचारें करिति पुजा, स्मरणांत न ज्याहुनि देव दुजा, तो स्वामि हा जगाचा विष्णु कृष्ण जगन्नाथ निज नयनि संतकृपें दृष्टिस पडला ॥जी॥३॥

पद १८८ वें.
श्री रघुराय आजि पहासि काय, मज तुं बाप माय, निज दाखविं पाय ॥धृ०॥
बहु व्यसाय, क्षणभंगुर काय, वय हें जव जाय, कधिं होसि सहाय ॥श्री०॥१॥
मोठि नवलाय, खोटें वाटे खरें काय, पोटिं षड्रिपु खाय, कोठें जाऊं नेणें काय ॥श्री०॥२॥
पुरे सर्व हाय,  यासि आपुलि दुराय, मज भेटे लवलाय, तुज बहु उतराय ॥श्री०॥३॥
हरिम हे अपाय, सुचवूनि, उपाय विष्णु कृष्ण जगन्नाथ नित्य नाम गाय ॥श्री०॥४॥

पद १८९ वें.
देखोजी देखो राम अजोध्याधीश आते है । सब देखनमों बडा अजो० सब भूपनमों बडा अजो०॥धृ०॥
सपत द्वीपका भूप जगन्मों करित ज्या के गीरत है, कोटि मदनका मूरत सुंदर शाम मनोहर सूरत है ॥दे०॥१॥
जडित रतनको मुकुट बिराजत, मोतन माला झलकत है, शिरके ऊपर छतर पताका, राम नामका फडकत है ॥दे०॥२॥
जिनके आगे थाट मिले सब संतनके प्रभु गाजत है, हात जोर सुरभाट बंदि नर बाद्य तुतारे बाजत है ॥दे०॥३॥
सब त्रिभुवनके रछन करके, बार बार अवतरते है, थार चरणके पास देत निज, दासनके उद्धर्ते है ॥दे०॥४॥
जगक्ति माता सीता जिस्के बामांकेपर बैठे है, आखनमों देखनके सबकूं, हमकू दरसन देते है ॥दे०॥५॥
कोटि सुरजका प्रकाश पुष्पक बिमानमो झग झगते है, लगबग करके आये हमारे, माय बाप हम दिसते है॥दै०॥६॥
सबसे मोठा दशरथ बेटा, वहाके सज्जन कहता है, भाइ लछीमन भरत शत्रुघन दो दों बाजू रखता है ॥दे०॥७॥
अष्टादस पद्मे कपि उनके दरसन सुखसे उडते है, हर्सभरित अंजनिके नंदन रंजन पावमें पडते है ॥दे०॥८॥
बिधि शिव जिस्के ध्यान करत बहु, भगति प्रेमसे स्मरते है, बिसनु किसन जगन्नाथ प्रभु आत्म भगत हित कर्ते है ॥दे०॥९॥

पद १९० वें.
मंद हसित रघुराय नयनि पाहुं, घस घसित रत्न जडित शिरी मुकुत प्रकट तेज निकट जानकि शोभे, दीव्य चाप बाण करीं ॥मं०॥धृ०॥
दक्षिणेसि लक्ष्मण, लक्षणयुत लक्ष विचक्षण, दक्ष पवनसुत लक्ष कोटि रक्ष:कुल नाशन, पक्षपाति निज भक्त रक्षण करी॥मं०॥१॥
कुंद रदन इंदीवर लोचन, इंदिरा कटाक्ष प्रिय सुंदर, इंदु वदन करि बिंदु सदृश भवसिंधु सकल सच्चित् सुखमय हरि ॥मं०॥२॥
सूर्य कोटि चंद्र प्रथ लख लख, आठवितां मुख होय अमित सुख, गांठ घे होउनि कधिं निरखिन पद नख, पतितासि विष्णु कृष्ण जगन्नाथ उद्धरीं ॥मं०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP