मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३९१ ते ३९५

गवळण काल्यांतील पदें - पदे ३९१ ते ३९५

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

यशोदा गोपिकां प्रत-

पद ३९१ वें.
तो हा आनंदकंद बालमुकुंद नित्य नेणतां । मोहें देह मीपणि गुंतुनि तुह्मी व्यर्थ शीणतां । जनि लाज हे सुखकाज नाकळे वृत्ति कल्पितां ॥तोहा०॥१॥
मुखें शाद्विक बोल बोलता हित नोहे तत्वता । करि कोण हें तरि शोध घ्या बरिं अंतरीं स्वता । हरि निश्चल घरिं अखंड आहे साच पाहतां ॥तोहा०॥२॥
वय कां अमोलिक या असद्विषयांत घालितां । दुविचारें गांठुनि पापें जोडुनि जन्मे भोगितां । ओळखा कृष्ण जगन्नाथ या निश्चयें निजात्मता ॥ तो हा आनंदकंद बालमुकुंद नित्यनेणतां०॥३॥

गोपिका यशोदेप्रत-

पद ३९२ वें.
धरुं सच्चिदानंद बालमुकुंद आनंदकंद साचा ग । आत्म निश्चये तरि अंतरिं परि शब्द न करुं वाच्या ग ॥धरुं०॥१॥
मोठा बाट की कटकांत नाटक एकटा जगताचा ग । लटिकें नोहे घटिकेंत गांठिन सत्य शपथ जिवाचा ग ॥धरुं०॥२॥
कृष्ण जगन्नाथ जो चीद्धन तो मी साधिन हट केला ग । निजकारणिं अति लंपट मति निष्टक न निजेला ग ॥ धरुं सच्चिदानंद बालमुकुंद आनंदकंद साचा ग ॥३॥

यशोदा कृष्णा प्रत-

पद ३९३ वें.
तुज साठिं गोपि टपती या भारीं रे । जपुनियां स्वहित विचारि रे तु०॥धृ०॥
साधुनि बहुत परि धरितिल दृढ जरी । करिसि तूं कायि पूतंनारि रे ॥तुज०॥१॥
त्यजुनि बा मज दुरीं । जावूं नको श्रीहरी । विनवितीं हेंचि वारंवारि रे ॥तुज०॥२॥
कृष्ण जगन्नाथ निज । आत्मपदपंकज । अलक्ष लक्षितां सुखकारि रे ॥तुज०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत-

पद ३९४ वें.
हरि निष्क्रीय तरि अंतरिं जरि बाह्य हा करी ॥धृ०॥
वाटति तुह्मां दैवयोगें माया हे खरी । सत्य विस्मृति नासवि धृति लाउनि मीपण छंदा ॥हरि०॥१॥
कोण कोठिल कर्ता याचा शोध घ्या बरीं । घाबरिं असिं व्हाल न कधिं होउनियां मतिमंदा ॥हरि०॥२॥
सांडुनि अज्ञान जाणु-नियां ज्ञान सेवा लैकरीं । कृष्ण जगन्नाथ आनंदाचा कंद न वदुनि मुखिं निंदा ॥ हरि निष्क्रीय तरि अंतरिं जरि बाह्य हा करी ॥३॥

गोपिका यशोदे प्रत-

पद ३९५ वें.
खोटा न मोठा चटकि खरा श्रीहरी । लटिकाचि भ्रम करि आपुला आपण वारी चट०॥धृ०॥
चिदचीद ग्रंथी, सम दृष्टांती । दाढी वेणी बांधितो हा निजतांपुरूषनारी ॥चट०॥१॥
बहुत केले यत्न परी, ग्रंथी भेद नोहे तरी । जे जे मी मी ह्मणती त्यांसी अखंड खंडेना भारीं ॥चट०॥२॥
दर्शन होता निज साक्षित्वें, कृष्ण जगन्नाथें । केली निर्बध सूख संसारी ॥ चटकिखरा श्रीहरी०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP