मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे १३४ ते १४०

साधनोपदेशपर पदें - पदे १३४ ते १४०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद १३४ वें.
पांचिं अहेतु न येतो जन्मा, जो महप्तदाब्ज परा गाश्रि, प्राप्त विज्ञानीं ॥धृ०॥
अहंता त्यजि त्या, महंतिं समता पावे निजानंद निष्कामसि त्यंज्ञान मनंतं ब्रह्म निजात्मानुभाव ध्यानीं ॥पां०॥१॥
प्राप्ता प्राप्तीं न हाले, अखिलात्मत्वें साधी निजात्मैक्य वर्त्मासंतत तेहि निवति, यद्वाग मृतें निराभिमानी ॥पां०॥२॥
दास्यत्व करितां वैष्णव गुरु चरणाचें, भेटे अखंड चिच्छर्मा अजश्रम व्यभिचारिणीं भक्तियुक्ता श्री कृष्ण वानी ॥पां॥३॥

पद १३५ वें.
राहुंया जरा संत विचारीं रे । विषय जसें मृगनीर ॥धृ०॥
दु:खड या संसारीं स्वहित करूं रे सेवूंया बरा स्वात्म सुखाब्धी रे ॥वि०॥१॥
माया भ्रम हा भारीं, विवेकें हरूं रे, साधुंया नरा आत्म पराधी रे ॥वि०॥२॥
विष्णु गुरु कृपा मजला तारी, कृष्ण हें स्मरूं रे, । लाउंया त्वरा ऐक्य समाधी रे ॥वि०॥३॥

पद १३६ वें.
स्थिरावि चित्त गुरुराज कृपा रे । पहातां कोण मी कैसा रे ॥धृ०॥
अनेक दृष्य जगत्पसारा याचा, एकचि आपण साक्षी उमजा रे ॥स्थि०॥१॥
प्रपंच कांहीं वस्तुत्वें नाहीं, कनकावरि नग जैसा रे ॥स्थि०॥२॥
अस्थि भाति प्रिय जाणुनि आत्मा साचा, नाम रुपात्मक वृत्ती वर्जा रे ॥स्थि०॥३॥
ठायिंच्या ठायीं नुरोनियां ही, जगात स्वरुपीं बैसा रे ॥स्थि०॥४॥
अनुभव व्यवहारितांही समाधी नढळे पाहीं, समय असों भलतैसा रे ॥स्थि०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, निर्विषय स्फूर्तिनें समजा रे ॥स्थि०॥६॥

पद १३७ वें.
जाइं गुरुपायीं लाग वेगेंसी हित पाहीं रे, नरतनु हे स्थिर नाहीं, विषयीं भरसि परि पडसि अपायीं ॥न०॥धृ०॥
स्त्री पुत्र सुह्लत्‍ तुज वाटे हित, यम घाला घालि तेव्हां करिसि तूं कायी ॥जा०॥१॥
कोण कोणाचा यांत जिवाचा, भुलसि फुकट कायि धरिसि पिसायी ॥जा०॥२॥
विष्णु गुरुपदा आठवुनीं सदा, कृष्ण जगन्नाथ झाला सुखरूप ठायीं ॥जा०॥३॥

पद १३८ वें.
संसार चिंता कां करितां सोडा ॥धृ०॥
देह नव्हे हा शाश्वत, याचा विश्वासहि थोडा ॥सं०॥१॥
निज ह्लदयस्थित राम कळाया, सद्‍गुरुपद जोडा ॥सं०॥२॥
संसार साक्षि अलक्ष लक्षुनि, आवरा मन घोडा ॥ सं०॥३॥
उठतां वृत्ति आत्मस्मरणें आपणांतचि ओढा ॥सं०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्मणे, भवबंधन तोडा ॥सं०॥५॥

पद १३९ वें.
श्री रामनाम गारे आवडीं । वेगें संत समागम जोडीं ॥श्री०॥धृ०॥
भवंडि विषय बुज, कबडि न मिळे तुज, चावडि सांडुनि वेइं स्वस्वरुपीं गोडी ॥श्री०॥१॥
गणित करुनियां जें, ह्मणसि सकल माझें, कोणिच न पावे जेव्हां यम डोयी फोडी ॥श्री०॥२॥
करितां संसार काम, वाचे उच्चारावें नाम, विष्णु कृष्ण जगन्नाथ देहबुद्धी तोडी ॥श्री०॥३॥

पद १४० वें.
सहज राम सुखधाम अससि तूं, ह्मणसि नाम रुप देह मी कसा, काम विषयिंचा भ्रमविल हा तुज ॥स० धृ०॥
भुलसि प्रपंचा मानुनि साचा, खेद मनानें आपणा आपण शोधुनियां बुज ॥स०॥१॥
खूळ पण रहित शोध मुळाचा, कुल करि पावन त्रिजगातें न होय व्याकुळ, कथिलें हित गुज ॥स०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा अनुभव कीं म्रासुनि द्वैतातें, अद्वख सेवीं गुरु चरणांबुज ॥स०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP