बाल्या-वस्थेंतील पद - पद ३५८ वें
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद. ३५८ वें.
मुकुंदराजा तूं प्रिय माझा । लवि देह तूझा राम भक्ती-काजा ॥धृ०॥
नवविधाभक्ती करिं राघवाची । राम सन्मुख नित्य दासबोध वाची ॥मु०॥१॥
विवरुनी अर्था साधिं परमार्था । निशिदिनी भज तूं राम समर्था ॥मु०॥२॥
तुझे आई बाप राम सीतापती । ओळख घे त्यांची साधुंचे संगतीं ॥मु०॥३॥
तरिच जन्माचा होइल उद्धार । विष्णु कृष्ण जगन्नाथा आवडसी फार ॥ मुकुंदराजा तूं प्रिया माझा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP