मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ४०१ ते ४०५

गवळण काल्यांतील पदें - पदे ४०१ ते ४०५

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

गोपिका यशोदे प्रत-

पद ४०१ वें.
असतां सहज सुख नसताचि दाटुनि दाखवि आपण खेळ महा । चंचल वृत्ती वत्सें नाचवि एकचि श्रीहरि साक्षी साक्षी पहा ॥असतां०॥१॥
निजतां शयनि निज न पडों दे निज, जागृति स्वप्नहि हा हरितो । अलक्ष केवळ न लक्षवे गति, तन्मय आत्मत्वीं करितो ॥असतां०॥२॥
जिकडे तिकडे व्यापक स्फुरतो, चिन्मय बुद्धिंत शुद्ध मला । कृष्ण जगन्नाथ निर्गुण सगुणी, अनुभव नकळुनि जन भ्रमला ॥असतां०॥३॥

यशोदा गोपिका प्रत-

पद ४०२ वें.
आनंदि आनंद दाटे एक चिद्धन केवल तोचि हा जाणातिं अंतरिं आनंदिं०॥धृ०॥
अच्युत अनंत पूतनारी, नेणतां न होत पूतनारी, स्मरतां त्रिविध ताप वारि, पापनुरवि स्वसुख कारि, सदय श्रीहरी ॥ आनंदि०॥१॥
ह्लदय कमल विमल करुनि, सगुण मूर्ति ध्यानि धरुनि, पाहतां देहभान नुरुनि, द्वैत समुळ मीपण हरुनि, आपणचि करी ॥ आनंदि०॥२॥
पूर्ण परब्रह्म साच, कृष्ण जगन्नाथ हाच, अन्य तो मनाचा नाच, उठति विषय कल्पनाच, अज्ञान हें तरी ॥ आनंदि०॥३॥

गोपिका यशोदे प्रत-

पद ४०३ वें.
परि सान साच हरि करि करणीं, बरि ओळखि घ्या तुह्मी सुमति तरि ०॥धृ०॥
न विलोकुंयापरिस बाळ दुजा अवलोकुनि पाहातां चालक हा आत्मगडि सकळ केले आपणा सदृश स्थिति पूर्व पालटुनि भयचि हरी ॥परि०॥१॥
करुं काय यास न उपाय न सुचे मति कुंठित होती चपळ महा, जप रात्रदिवस मज हाचि सदां अति लंपट वृत्ती सुरसिं खरी ॥परि०॥२॥
गृहदार न कुलस्वविचार स्फुरवि जेथें तेथें कृष्ण जगन्नाथ गोकुळिं पाहा, दधि दुध नवनित भवनांत शिरुनि घट नुरवि सर्व सार एकचि वरी ॥ परि सान साच हरि करि करणी बरि ओळखि घ्या तुह्मी सुमति तरि ॥३॥

यशोदा कृष्णा प्रत-

पद ४०४ वें.
करिसि तरि किति हरि हा हट रे । झटुनि व्रज वधुंसि घटचि न ठेविसी अति तुज हें चट रे क० ॥धृ०॥
नाटकि ह्मणति नारी लटिकें न तिळभरि जरि श्रवणी कटकट रे । श्रुतिसिद्धनिपटचीज्जग-मृद्धट जेविं तंतु पट रे ॥करिसि०॥१॥
प्रपंच आमुचा नुरविसि साचा या वदति सट सट रे । सांडुनि खटपट धरितिल झटपट अनेकिं एकटरे ॥करिसि०॥२॥
कृष्ण जगन्नाथा तूं निर्भय चीत्सुखमय बळकट रे । तिखट बोल हे फुकट आइकसि राहिं मन्निकट रे ॥ करिसि तरि किति हरि हा हट रे०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत-

पद ४०५ वें.
गोप युवति श्रीहरि हा, निश्चल घरिं नांदे पहा ॥धृ०॥
विषयी केवळ लुब्ध तुह्मां क्षुब्ध करिति नित्य महा । काम क्रोध लोभ मोह मत्सरमद शत्रु सहा ॥गोप०॥१॥
साचकिं अति नाचकि मति नाचवि इद्रियांसि दहा । जाचवि जिव याचें कारण शोधुनि स्वसुखांत रहा ॥गोप०॥२॥
धन्य कृष्ण जगन्नाथ न विसबे शाश्वत आत्म गृहा । मुक्तिमार्ग विशारद मज भक्ति दे निज सौख्य वहा ॥ गोप युवति श्रीहरि हा० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP