मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर| अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् कवी बांदरकर लघु आत्मकथन अभंग संग्रह श्रीगुरुबोध ग्रंथ श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् पदे १ ते १२ पदे १३ ते २९ पदे ३० ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते ९६ पदे ९७ ते १०९ पदे ११० ते १२० पदे १२१ ते १३३ पदे १३४ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६२ पदे १६३ ते १६४ पदे १६५ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१२ पदे २१३ ते २२० पदे २२१ ते २२६ पदे २२७ ते २३८ पदे २३९ ते २५३ पदे २५४ ते २६८ पदे २६९ ते २८१ पदे २८२ ते २८८ पदे २८९ ते २९२ पदे २९३ ते २९५ पदे २९६ ते २९८ पदे २९९ ते ३०० पदे ३०१ ते ३०३ पद ३०४ वें पद ३०५ वें पद ३०६ वें पद ३०७ वें पदे ३०८ ते ३०९ पद ३१० वें पदे ३११ ते ३१६ पदे ३१७ ते ३२१ पदे ३२२ ते ३२५ पदे ३२६ ते ३३० पदे ३३१ ते ३४४ पदे ३४५ ते ३४९ पद ३५० वें पदे ३५१ ते ३५३ पदे ३५४ ते ३५५ पदे ३५६ ते ३५७ पद ३५८ वें पद ३५९ वें पदे ३६० ते ३६१ पदे ३६२ ते ३६३ पदे ३६४ ते ३७० पदे ३७१ ते ३७४ पदे ३७५ ते ३८० पदे ३८१ ते ३८५ पदे ३८६ ते ३९० पदे ३९१ ते ३९५ पदे ३९६ ते ४०० पदे ४०१ ते ४०५ पदे ४०६ ते ४१० पदे ४११ ते ४१२ श्री राघवाष्टक पतीनपावनराम’ श्लोकाष्टक ‘जानकीजीवनराम’ मंत्रार्याष्टक ‘राजीवनयनराम’ श्लोकष्टक ‘आनंदघनराम’ मंत्रार्या श्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक अभंग श्री आर्या शेवटचें पद पवित्र उपदेश श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्रीसद्गुर्वष्टकम् मत्सद्गुर्वष्टकं इत्यंष्टकं श्रीगुरुकृपाष्टक पदे १ ते ७ श्री सद्गुरुची आरती अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले. Tags : kavyapoemकाव्यबांदकर अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् Translation - भाषांतर नमिन वैष्णवसद्नुरुपादुका । प्रिय बहू मज ज्या सुरवदायका ॥कथिन तन्महिमा परमादरें । जरि न ये वचनीं कथितां बरें ॥१॥संसारतापशमनार्थ प्रयत्न केले । जे जे न ते सुरव करूं मजला शकेले ।मी माझें यांत बुडलों विषयांध झालों । दु:खें अनावर अशास्तव मी निघालों ॥२॥माझे स्त्री पुत्र माझें गृह धन पशु हें द्रव्य हें देह माझें ॥संसारीं सर्व माझें म्हणुनि फिरतसें चित्त ना शांत माझें ॥या तापेम तप्त झालों त्यजुनि सकळ हें दूर देशीं पळालों ॥सोडीना कर्म माझें मज कठिण अशा पातकानें जळालों ॥३॥संसारबंधन हरील असा न कोणी । भेटे, म्हणूनि स्मरिला दृढ चक्रपाणी ॥जो निर्विकर परिजाणुनि भाव आला । श्री सद्गुरू वदति वैष्णव नाम ज्याला ॥४॥ज्यांचें दर्शन तें कधीं न उरवी तापत्रयाची कथा ॥वाड्माधुर्यरसामृतें परिहरी जन्मादिकांची व्यथा ॥नाशी जीवदरिद्र आत्मसुखसाम्राज्यासनीं स्थापुनी ॥ते आले गुरुराज वैष्णव जगीं जे राहिले व्यापुनी ॥५॥भवसमुद्र भयानक यांत मी । बुडुनि जाचतसें बहु या तमीं ॥मज अशांतुनि पार करा तुम्हीं । म्हणुनि सद्गुरुचे पद मी नमीं ॥६॥गुरुवरें कर ठेवुनि मस्तकीं । वदति भ्रांति हरीन समस्त कीं ॥न धरिम याविषयीं मानिं काळजी । कथिन जें तुज मी धरिं काळजीं ॥७॥करिन जो उपदेश तुला मनीं । दृढ धरोनि बसे निज चिंतनीं ॥मृगजलापरि या भवसागरीं । न बुडतांचि उगा भय कां धरी ॥८॥नर तटस्थ जरी उदकामधीं । निरखि तो प्रतिबिंब बुडे कधीं ॥न बुडतां बुडलों ह्मणतो जसा । न भवसागरसंग तुला तसा ॥९॥तटी आहें जो मी न कधिं उदकामाजि शिरलों ॥न ठावें त्या वाटे हरहर बुडालो न उरलों ॥विचारें तूं पाहें जरि धरि निज ज्ञान तरि तो ॥बुडालों मी ऐशी किमपि न मनीं भ्रांति धरितो ॥१०॥मी हा एक असे असें सहज तूं जाणोनियां नेणसी ॥कल्पी देह तुझ्यांत त्यांत शिरसी तो देह मी मानिसी ॥याचा संग धरोनि सौरव्य विषयीं कल्पोनियां भोगिसी ॥हें माझेंच रवरें असो मज सदा आनंद हो चिंतिसी ॥११॥आनंद आपण असें न कळे मनातें । घेऊनि विस्मृति धरी विषयांसि नातें ॥कीं होय सौरव्य तुज तें विषयांत आहे । वाटे, उगा भ्राम तुझा तुज बाधताहे ॥१२॥विषय कल्पुनि जें सुख भोगिसी । स्वरुप तेंचि तुझें परि नेणसी ॥ह्मणुनि दु:ख अनावर वाटलें । तुजवरीच तुझें तम दाटलें ॥१३॥तूं निर्विकार अनिवार सुखस्वरूप । झालें अहंपण तुझ्यांत विकाररूप ॥विस्तार सर्व घडला मग हा तयाचा । देहादि सर्व जडभार पुढें जयाचा ॥१४॥अज्ञान हें तुजवरी उपजोनि तूतें । झांकोनियां मिरवती वरि पंच भूतें ॥दृष्टांत यासि कथितों तुज शिष्यराया । ऐकोनि जो दृढ धरीं हरि सर्व माया ॥१५॥सुर्यावरी किरण त्यावरि अभ्र झालें । तैम सुर्यतेज मुळिंचें न दिसोनि आलें ॥संपूर्ण अभ्रमय जें नयनासि भासे । तें भासणें समज कीं रविच्या प्रकाशें ॥१६॥अभ्रांत दृष्टि पसरे तंव सूर्य नाहीं । ऐसें दिसे परि वसे रवि तेथ पाहीं ॥जे अभ्र तें उपजलें किरणांत ज्याच्या । तो शुद्ध सूर्य कधिं संग तया न याचा ॥१७॥तूं निर्विकल्प रवि शुद्ध तुझ्या स्वरूपीं । स्फूर्ती अहं किरण ज्ञान उठे अरूपीं ॥ज्ञानप्रभेवरि उठे बहु नाम रूपें । अभ्रें रवीसि तुज झांकिति शुक्तिरूपें ॥१८॥जें कां अहंपण तुझें उठलें तुझ्यांत । तेणेंचि सर्व रचिलें विषयादि जात ॥तूं कल्पनारहित कल्पित मीपणातें । सांडूनि लक्षित रहा निज आपणांतें ॥१९॥तूं एकला तुजवरी घडलें अनेक । जें वस्तुता न दिसतें करितां विवेक ॥झाला उगाचि भ्रम जेविं भुजंग दोरीं । मिथ्या परी उठति भ्रांति नसे विचारीं ॥२०॥रज्जूसि जैं विसरला भुजगासि भ्याला । बोले भयें करुनि कोठिल सर्प आला ॥तेथें विचार न करूनि प्रयत्न केले । नाशार्थ, ते न फळ देउनि व्यर्थ गेले ॥२१॥तैसाचि तूं विसरला तुझिया मुळाला । जो एकला परि न जाणुनि या खुळाला ॥हे सर्व खेळ अवघे तुझिया मनाचे । कल्पूनियां विषय सौख्य तुझ्यांत नाचे ॥२२॥जो तूं असंगपण ठाकुनि संग घेसी । वृत्ती अनावर ह्मणे उबगे तयांसी ॥तूं पाहसी तुज पुढें उठतात वृत्ती । सांडूनि एकपण शोधिं तुझे निवृत्ती ॥२३॥उठे वृत्ती बैसे परि न उठणें तूज बसणें ॥वसे साक्षित्वानें परि न कधिं त्या आंत घुसणें ॥अशा धैर्यें मेरूसम अढल तूं वा तुजमधीं ॥असंगत्वें प्राप्ती तुझि तुजचि याला न अवधी ॥२४॥देहेंद्रियें विषय प्राण मनादि यांतें । जो एकला स्फुरणरूप धरी तया तें ।आहे अखंद सुख जें तुजमाजिं पाहें । ग्रासूनि द्वैत निज आपण मात्र राहें ॥२५॥अज्ञानें तुजमाजि वृत्ति उठती त्यां देखसी एकला ॥तूं चैतन्य परंतु सूक्ष्म मुळिंचा जो मार्ग तो चूकला ॥त्याला तो व्यतिरेक अन्वय असा अभ्यास जैं साधिजे ॥ब्रह्मानंदनिमग्नरूप मुळिंची जेरवूण ते लधिजे ॥२६॥तो अभ्यास कसा म्हणोनि पुससी बा शिष्यवर्या जरी ॥जाणावा व्यतिरेक शुद्ध तुज तो सांगूं धरूं अंतरीं ॥जें जें दृश्य दिसे तयाहुनि असें मी वेगळा पाहणें ॥द्रष्टा दर्शन दृश्य या त्रिपुटिला सोडोनियां राहणें ॥२७॥दृष्टांतें कथितों तुला त्रिपुटि हे नाहींच देखावया ॥कीं सूर्यप्रतिबिंब जें जलघटीं तें स्पर्शतें कीं तया ॥नेणें दृष्टि घटांत हें जल तयामध्यें रवी भासतो ॥न स्पर्शेच कधीं रवी गगनिंचा जो या त्रिवर्गासि तो ॥२८॥जल घट प्रतिभानू शुद्ध सूर्यांत नाहीं ॥त्रिपुटि नयनिं भासे ज्या प्रकाशोंचि पाहीं ॥रविसि न वळखे जे ते घटीं सूर्य पाहे ॥नसुनि दिसत नेत्रीं कां अधो दृष्टि आहे ॥२९॥ज्या दृष्टीस दिसे घटीं जल तयामध्येंच भानू असे ॥त्या दृष्टीस घटोदकस्थ रविचा संबंध कांहीं नसे ॥दृष्टील दिसणें रवी गगनिचा जो शुद्ध त्याच्या गुणें ॥तो दृष्टीस कधीं न संग करितो आहे निजांगेंपणें ॥३०॥दृष्टी ज्ञान तुला रवीसि विसरे अज्ञानकुंभामधीं ॥पाहे वृत्तिजळीं तुझ्या प्रतिमुखा जें वस्तु नव्हे कधीं ॥देखे विस्मृतिकुंभ वृत्तिउदकीं तूं बिंबला मानुनी ॥त्या ज्ञानासहि तूं प्रकाशक पहा एकात्मता शोधुनी ॥३१॥न दृश्य तूं साक्षि असे तयाचा । मागें पुढें भास दिसे मनाचा ॥सर्वांसि या आपण मूळ साचा । अलक्ष सच्चित्सुख लक्षणांचा ॥३२॥दिसे तें तूं पाहें परि वळख द्रष्टयासि वळुनी ॥असे जो सत्यत्वें सुखमय सदा वृत्ति त्यजुनी ॥दिसे भासे सारें तुजवरिच हें तूं न दिससी ॥तुला तूं लक्षाया सहज समजानेंच अससी ॥३३॥देहादी दृश्य सारें जग मृगजल या कल्पका मीपणातें ॥सोडीं जाणोनि साक्षी निरखि रविसी सच्चित्सुखा आपणातें ॥मी माझें हें न कल्पीं स्वसुखमय तुझें रूप चिन्मात्र साधीं ॥स्वानंदीं मग्न होसी अनुभवुनि निजात्मैक्यतेची समाधी ॥३४॥तूम लक्षिसी दृश्य जगत्पसारा । सुखात्मबोधा विसरूनि सारा ॥अलक्ष्य तो आपण य विचारा । करीं, न लक्षीं तनु पुत्र दारा ॥३५॥विस र न तुज तूं जो सच्चिदानंदरूप । जरि तुजवरि भासे इंद्रियां विश्वरूप ॥समज सकल द्रष्टा दृश्य आत्माचि सारा । उलटुनि अवलोकीं आपणा निर्विकारा ॥३६॥उलट उलट शिष्या देखणें दृश्य सोडीं ॥वळखुनि निज द्रष्टा घे तदात्मैक्य गोडी ॥उठति विषयवृत्ती कल्पुनी सौख्यराशी ॥त्यज, भज निज आत्मानंद जोडीं मिराशी ॥३७॥तुला वाटे मातें विषय सुखदाते खचितसे ॥ह्मणूनी तद्भोगीं मन दिवस रात्र भ्रमतसे ॥तरी त्यांच्या भोगें वय सरुनि तृप्तीच न घडे ॥सुखाच्या इच्छेनें घडि घडि तुझें चित्त बिघडे ॥३८॥ज्यांचा आठव दु:खदायक मना जैं भोग ते ना मिळे ॥लाभे तैं मज आणि आणिक मिळो वाटेच इच्छामुळें ॥नाहीं तृप्ति कधीं जरी हि विटला सेवूनि इच्छी पुन्हा ॥व्हाया सौख्य अखंद संग्रह करी दु:खीं पडे वासना ॥३९॥आहे कोण पदार्थ नित्य सुखवी ऐसा जगीं दाखवीं ॥ज्याचा वीट न ये सदैव असुनी दु:खे न जो माखवी ॥यल्लाभाहुनि अन्य लाभ न दिसे शश्वद्नुणें चांगला ॥तो दावीं मज जीव ज्यावरि तुझा मोहूनियां पांगला ॥४०॥सुख दिसेल जरी धन तें तुला । तरि पहा धनिकांसि जनीं मुला ॥तळमळूनि दुज्यां विषयांप्रती । सुख ह्मणूनि अहर्निशिं धांवती ॥४१॥द्रव्य स्त्री पुत्र नव्हे सुख विवरिं मदुक्तीस या शिष्यराया ॥यांपासूनीच होतें सुख ह्मणुनि सदा टेंकसी तूं मराया ॥यांसंगे त्रास होतां त्यजुनि सकळ जाऊनि बैसेन रानीं ॥ऐसे खेदिष्ट त्यांनीं सुख कवण धरावें विचारें नरांनीं ॥४२॥पहातां संसारी सुखमय अशी वस्तु न ठरे ॥ठरावी जे वस्तु सुख ह्मणुनि ते दु:ख पसरे ॥सुखाचा दु:खाचा अनुभव जया त्यासि निवंडू ॥विचारें सत्याच्या जडतनुजगद्भान दवडूं ॥४३॥सुखें दु:खें कल्पीं प्रति विषयिं देहादि जगिं तूं ॥जडत्वानें ते तौं असति सुखदु:खाविरहितू ॥न आद्यंतीं जे हे विषय भ्रम हा जाण तुजला ॥सुखाच्या इच्छेनें सुखमय तुला तूं विसरला ॥४४॥सुखाची जे इच्छा त्यजुनि वळ मागें परतुनी ॥स्थिरत्वानें राहीं सुखमय निजात्मा समजुनी ॥उठों नेदी वृत्त्ती महज सुख येईल उदया ॥तदाकारें घोटीं स्फुरत सुख जें आपण तया ॥४५॥आहे सौख्य अखंड तूंचि समजे नाहीं दिसे जें दुजें ॥देहादी जड विश्व मीपण पहा विस्तारलें हें तुझें ॥तूं या आदि न कोणि अंतिं दुसरा सच्चित्सुखात्म्याविण ॥लक्षीं आपण जो अलक्ष्य मुळिंचा ग्रासूनियां मीपण ॥४६॥मी हा शद्ध उठे जिथें स्वरुप तें सच्चित्सुखात्मा तुझें ॥देहादी जड विश्व ज्यामघिं स्फुरें तो तूं स्वयें ना दुजें ॥आहे आपण मीपणारहित हे लक्षीं मुळींची खुणा ॥दृश्यादृश्य गिळोनि तन्मयपणें हो तूं तुझा देखणा ॥४७॥निद्रेमाजिं जसा निवृत्ति अससी जागेपणीं हो तसा ॥आनंदांत मुरोनि विस्मृति न घे रक्षी सुखात्मा ठसा ॥जें जें पाहसि तें सुखात्मक असे येईल लक्षीं तुला ॥तूं आनंदसमुद्र विश्व लहरी जाणोनि घोटीं मुला ॥४८॥आहे कोण सदैव हेंचि विवरीं कीं दृश्य त्या देखणा ॥नाहीं त्या अवलेकिं कोण धरि त्या आहेपणाची खुणा ॥निद्रा जागृति स्वप्न यासि वळखे नाशे न त्यांच्या सम ॥आहे आपण पूर्ण व्यापकपणें लक्षूनि टाकीं भ्रम ॥४९॥भासे आपण आपणासि न दुजें हें दृश्य ज्याच्याविण ॥बाह्याभ्यंतरिं जो नगीं कनकसा आहे पहा हे खुण ॥चित्तंतूवरि दृश्य विश्व पट हा भासे न तंतूविण ॥ऐसा आपण आपणासि निरखीं सांडूनि मी - तूंपण ॥५०॥आहे आपण आपणा समजणें जें तेंचि सच्चितूपण ॥वाटे स्वस्थ उपाधि नाहिं जइं तो आनंद वृत्तीगुण ॥ऐशा तीन खुणा तुझ्या कळविल्या लक्षांत याया तुला ॥जाणोनी निरुपाधियोग मुळिंचा साधूनि घे आपुला ॥५१॥वृत्ती त्या उठती सुखांत बसती ज्यां ठाउके ना सुख ॥सार इंद्रियवृत्तिनाच विषयीं बाहेरि ज्यांचें मुख ॥अंतर्दृष्ट करूनि त्यां वळवितां होती सुखाकार त्या ॥नित्याभ्यास करीं सुखास्पदचि तूं हो त्या न ठेवीं रित्या ॥५२॥तूं आनंद समुद्र पूर्ण लहरी विश्वात्मका या तुझ्या ॥आहे व्यापक तूं अखंड निरखीं नाहीं कदा हेतु ज्या ॥होतो जो व्यवहार तो तुजविणें नाहीं पहा आपणा ॥जो आहे सहजें सुख स्वरूप हे लक्षीत राहें खुणा ॥५३॥तूं हें सर्व तुझ्यामधीं सकल हें ऐसा तुला तूं दिसे ॥वाटे मीच शरीर हें तुज असे तें कल्पनेचें पिसें ॥नाहीं हें जड दृश्य विश्व निरखीं सच्चित्सुख व्यापला ।आदी अंत न जेथ जेथ वळुनी घे शोध तूं आपला ॥५४॥ज्ञानादर्शचि तूं तुझ्यामघिं पहा त्रैलोक्य हें बिंबतें ॥वस्तुत्वें न अशांत तूं तुजविणें कांहींच नाहीं रितें ॥ज्याचें मोज न आणि शेवट नसे तो तूंचि चित् आरसा ॥आहे एकचि सत्य वस्तु किती मी बोधूं तुला फारसा ॥५५॥आनंद चिद्घन अनंत अपार तो तूं । आहेसि व्यापुनि जगीं पटिं जेविं तंतू ॥हा विश्व मेघ वळखें मृगतोय सारा । चित्सूर्य तूंचि तुज जो दिसतो पसारा ॥५६॥जें जें दिसे तुजविणें न तयासि थारा । तूं आपणा वळख चित्सुख निर्बिकारा ॥जैम साधिसी गुरुकृपांजन युक्त दृष्टी । आनंदरूपचि कळेल समस्त सृष्टी ॥५७॥आहे नाहीं हे मनाचे विकार । त्या पूर्वीं तूं सर्वदा निर्विकार ॥भासे नासे जाण ते सर्व माया ॥ सांडी साधीं निश्चला आत्मठाया ॥५८॥आहे आपण हा प्रपंच सगळा कापूस तंतू जसा ॥तंतू तो पट जेविं तेविं धरिं तूं विश्वात्मतेचा ठसा ॥नाहीं कीं पट एक तंतुचि खरा जो तो नसे कापुसीं ॥आहे कापुस तेविं चित्सुखचि तूं लक्षीत राहे तुसीं ॥५९॥मेघाचें जळ जेविं सूर्यकिरणापासूनियां उद्भवे ॥वर्षे वर्षऋतूंत ज्या स्थळिं जळें वाटे रवी संभवे ॥ग्रीष्मीं आटति जैं जळें प्रतिरवी नाहींच सूर्य स्वयें ॥आहे, आपण सर्व वृत्ति मुरतां नाशे न जो निश्चये ॥६०॥दिसें जें दिसा विश्व सूर्यप्रकाशें । तसें रात्रिचें लागतां दीप खासे ॥अशा सूर्य-दीपासि हे चक्षु पाहे ॥ तुझी बुद्धि सर्वांसि या जाणताहे ॥६१॥ते बुद्धी तुज नेणतां तुजपुढें कल्पूनि नाना जडें ॥जे सच्चित्सुख आपणा विसरुनी आनंद व्हाया रडे ॥ती मागें न वळे ह्मणूनि नकळे आनंद तो आपण ॥या दृश्यासि भुलूनि नाचत सदा कल्पूनि मी तूं पण ॥६२॥दहादि हें जग दिसे निज चित्प्रकाशें ॥भासे प्रकाशमय तूंचि कदा न नाशे ॥वृत्ती प्रकाशति प्रकाश तुझाचि सारा ॥तूं ज्योति प्रकाशति प्रकाश तुझाचि सारा ॥तूं ज्योति ब्रह्म परिपूर्ण सुखैक थारा ॥६३॥तूं लक्षीं निज चित्प्रकाशचि खरा वृत्तीप्रकाशाविण ॥पूर्ण ज्योति न दृश्य जो स्थिरचरीं आंगें असे आपण ॥दृश्य ज्योति न सत्य तूं भुलुं नको आहेसि द्रष्टा स्वयें ॥ज्योती आपण आपणांत वळतां आनंदसी निश्चयें ॥६४॥प्रकाशक मुळीं खरा सकळ ज्योतिंला देखणा ॥अनंत सुखरूप तूं अढळ आपुली हे खुणा ॥धरूनि वळ अन्तरीं त्यजुनि कल्पना हेतुला ॥अखंड स्मर आपणा भ्रम नुरेल पाहें मुला ॥६५॥भला दिससि तूं मला स्वअधिकार पाहोनियां ॥न लाभ तुज याहुनी समज सत्य जाणोनियां ॥जलावरि तरंगसे निरखिं विश्व आत्म्यावरी ॥सुखास्पद अखंड जे पदवि आपुली हे वरी ॥६६॥त्याचें मानवजन्मसार्थक जया सत्संगती आवडे ॥आत्माभ्यास घडे सुरवांत पहुडे देहात्मता ती उडे ॥सत्वित्सौख्य घडे मती न बिघडे आनंदवृत्ती चढे ॥भाग्य श्री उघडे अखंडितपणें स्वात्मैक्य बोधीं जडे ॥६७॥जरि नरतुन भाग्यें प्राप्त झाली जिवाला ॥निजसुखपदवी हे सांपडे कीं तयाला ॥सुख मय परमात्मा जाणुनी सर्व सृष्टी ॥मुरुनि सुखसमुद्रीं चित्त पावेल तुष्टी ॥६८॥किति सुलभ असे हा मार्ग सच्छिष्य राया ॥मृगजलवत हा संसारसिंधू तराया ॥त्यजुनि सकळ वृत्ती लक्षितां आपणातें ॥सहज सुखसमुद्रीं मग्नता ये मनातें ॥६९॥संसारीं असतें जरी सुख पहा राजे निघाले कसे ॥राज्ये त्यागुनि बैसले वनिं तपश्चर्येसि ऐकों असें ॥ना ये वीट जयां जरी विषयिंच्या भोगें बहु त्रासती ॥ऐसा मूर्खसमूह पाहुनि तयां साधू सदा हांसती ॥७०॥मी ज्ञानी मज सर्व ठाउक असे संसार माझा खरा ॥स्त्रीपुत्रादिसमूहिं रंगुनि पडे लुब्धोनि गुंते घरा ॥होती त्रास पदोपदीं तरिहि ते लक्षांत नाणी कदा ॥मी हा कोठिल कोण नेणुनि सदा भोगी बहु आपदा ॥७१॥माझीं हीं पुत्र कन्यादिक जिवलगही स्त्री सुखा पार नाहीं ॥ऐसा लुब्धोनिं गुंते निशिदिनिं बहु गांजे न ये वीट कांहीं ॥द्रव्याचा लोभ मोठा कवडि न कवणा दे पहा मोह ऐसा ॥देहातें मीच मानी स्वसुख न कळतां मुक्त होईल कैसा ॥७२॥मी मी शद्व वदे सदा तनुमदें नेणेच मी कोणता ॥देखे सर्व जगा परी न वळखे मी कोण या पाहता ॥ऐके शद्व सुगंध घे प्रियपणें सप्रेम चाखी रसा ॥तो मी कोण विचार कांहिं न करी जो आपुल्या मानसा ॥७३॥होतो जो व्यवहार इंद्रियगणीं वृत्ती उठोनी कसा ॥तो तो जाणत, जाणत्या न वळखे जो बाह्य दृष्टी असा ॥कष्टी होय पदार्थ जो प्रिय बहू भोगासि जैं ना मिळे ॥नेणे कीं प्रिय वस्तु आपणचि, हें सत्संगतीनें कळे ॥७४॥प्रपंच बहु आवडे जरि न दु:ख त्या पासुनी ॥घडेल, जिव ना तरी पळुनि जाय हा त्रासुनी ॥सुखास्तव प्रपंच हा करुनि जीव हे शीणती ॥सुखस्वरुप आपण प्रिय पदार्थ हे नेणती ॥७५॥पदार्थ सुखसे तुला जरि दिसे सुषुप्तीं पहा ॥अपार सुख निद्रिता न विषयीं जिवाची स्पृहा ।प्रपंच सुख हा जरी तरि निजेंत कैचें सुख ॥न तैं विषयवृत्ति, जागृतिंत जें दिसे सन्मुख ॥७६॥त्यजी विषयचिंतनीं मन सुखार्णवीं त्या निजे ॥मुखें न वदवे निजानुभववृत्तिनें जाणिजे ॥असे सुख अखंड आपणचि जें न ठावे जना ॥ह्मणोनि विषयेच्छुंची विषयिं धांवती वासना ॥७७॥जैं वासना वळविशी स्वसुखैकठाया । वाटेल त्यां कठिण तेथुनिया उठाया ॥जें तें स्फुरेल सुख आपण विश्व सारें । दु:खें न राहतिल या निज सद्विचारें ॥७८॥लाभांत लाभ परिपूर्ण निजात्मलाभ । नाशे न जो नुरवि लेशहि दु:खगाम ॥तो जाहला तुज, तुझा भ्रम सर्व गेला । सच्चित्सुखस्वरुप बोधरवी उदेला ॥७९॥ब्रह्मानंदनिधीस तूज शरिराहंवृत्तिनें झांकला ॥तो तूं दृश्य नव्हे अदृश्य निरखीं सच्चित्सुखें फांकला ॥सर्वांपूर्विल जो अनंत परिपूर्णत्वें असे एकला ॥त्या तूं जाण अनेक सर्व त्यजुनी या दृश्यरूपा कला ॥८०॥जो सच्छिष्य असे तयासिच डसे सच्चित्सुरवात्मैक्यता ॥वाक्यें सद्नुरुच्या अखंड सुख तें होऊनि घोटीं स्वतां ॥वाटे विश्व समस्त त्या जरि दिसे आनंद हें तत्वता ॥ऐसा दुर्मिळ शिष्य सद्नुरुवचें जाणेल ब्रह्मात्मता ॥८१॥नसे ज्या शिष्याला गुरुवचनिं विश्वास घसरे ॥स्वरूपापासोनी उठति बहु वृत्ती नच सरे ॥शरीरा मी मानी निज गुरुसि कल्पी मनुजसा ॥तयातें लक्षावा मनुजसमुहीं हा पशु जसा ॥८२॥ज्याला सद्नुरु पूर्ण ब्रह्मचि असें वाटे सुशिष्या तया ॥विश्वासें गुरुवाक्य अर्थ उदया ये नाश नाहीं जया ॥वाटे आपण जें दिसे सकल तें आनंद सच्चित्गुरू ॥वर्षे जो सुखमेघ ये रिति न तो शिष्यासि ये सांवरूं ॥८३॥आला प्रत्यय ज्यासि हा गुरुकृपें आनंद तो आपण ॥मिथ्या देह जगद्भुजंग निज रज्ज्वात्मा वरी मीपण ॥गेलें दु:ख समग्र आपण सुखाचा जो समुद्र स्वयें ॥झाला तो तरला भवाब्धि गुरु वाक्यार्थाचिया निश्चयें ॥८४॥गुरू तो जो शिष्या परम सुखदाता निज मुला ॥चिदात्मैक्यस्फूर्ति धरूनि तनु मूर्ती प्रगटला ॥गुरूदेवांमध्यें तिळभरिहि तूं भेद न धरीं ॥स्मसवें ते सच्चित्सुख जलधि मी विश्व लहरी ॥८५॥गुरू देव यांमाजिं ना द्वैत कांहीं । तयांच्या स्वरूपासि लक्षोनि पाहीं ॥स्वशिष्यासि दावी गुरू देव ठाया । सुखात्मा कळे देव हे भक्तराया ॥८६॥घडे ज्यां प्रियत्वें गुरूदेवभक्ती । प्रपंचीं असोनी जिते त्यांसि मुक्ती ॥तयां विश्व हें सच्चिदानंद वाटे । जरा जन्म दारिद्य दु:खादि आटे ॥८७॥तुला कळविलें जसें मज कळे सुशिष्या खरें ॥निजानुभव घोंटि तूं वळुनि स्वस्वरूपीं बरें ॥प्रपंच करि चांगला न ढळसी सुखाच्या बळें ॥अखंड स्मर आपणा न मळसी मनाच्या मळें ॥८८॥श्रवण मनन नित्याभ्यास सोडूं नको हा ॥घडि घडि सुखकारी जो उरों नेदि मोहा ॥स्मरुनि प्रियापणातें आपुलें सौख्य भोगीं ॥न भवसि कधिं दु:खी आणि संसाररोगी ॥८९॥आत्मानात्मविचार जो सुलभ शद्धांनी तुला बोधिला ॥होतो हा व्यवहार सर्व सहजें साक्षी असे आपण ॥त्या त्या कालिं उठोनि वृत्ति तरि तूं कल्पूं नको मीपण ॥९०॥उठति सकळ वृत्ती साक्षि तूम कल्पनांचा ॥सहज अससि देखें भास मिथ्या मनाचा ॥सहजिं सहज भासे विश्वरूपें तुला तूं ॥सहज सुख भासे विश्वरूपें तुला तूं ॥सहज सुख कळाया तूं नको कांहिं चितूं ॥९१॥सहज अढळ तो तूं लक्षिं घे शिष्यराजा ॥सहज धरिं मृषा हीं इंद्रियें आणि काया ॥व्यवहरति प्रपंचीं ज्या नसे कीं मृषा तो ॥सहज अनुभवें या हा मृषा काळ होतो ॥९२॥जागा होसी सहज सहजें स्वप्नसाक्षित्व ज्याला ॥निद्रा ये ती सहज समजे तोचि तूं जाण त्याला ॥येती जाती सहज निज कामार्थ जे लोक सारे ॥त्यां द्रष्टा तूं सहज सहजें नासती जे पसारे ॥९३॥दिसे भासे जें जें सहजपण सोडीं नच तया ॥अशाचा तूं द्रष्टा सहज अससी नाश न जया ॥सुशिष्या तूं ऐसें सहजपण जैं लक्षिसि बरें ॥समाधीपूर्णत्वें सुख अनुभवा येइल खरें ॥९४॥सहज सुखसमुद्रा तूंचि हें विश्व आहे ॥सहज लहरिरूपें तो तुला तूंचि पाहे ॥सहज सुख समाधी हा ढळेना कदापी ॥अनुभवि पुरुषातें जो न घाली त्रितापीं ॥९५॥बा हें भाग्य तुझें तुला कळविलें नाशे न कल्पांतिं तें ॥आत्मत्वें परिपूर्ण तूं तुजविणें कांहींच नाहीं रितें ॥पाहे आपण आपणा सहज तूं आहे सुरवाचा निधी ॥मी हा शद्व मुरोनि जो स्फुरसि तो आनंद पावे सुधी ॥९६॥आहे तूं अधिकारि यास्तव तुला हें स्वात्मतत्वामृत ॥झालें प्राप्त न सोडितां घडी घडी पीसी न होसी मृत ॥सारा हा भवरोग जाउनि तुला आरोग्य सच्चित्सुख ॥होवोनी अजरामरत्वपदवी दे होइं अंतर्मुख ॥९७॥गुह्यांत गुह्य गुरुगम्य मुखें तुला या ॥जें बोधिलें सुखचि आत्मपणें कळाया ॥तें घोटिं तूं न करिं चावटि लोकजागीं ॥कीं ज्यासि नाहिं अधिकार न ते विभागी ॥९८॥नित्याभ्यास करीं मनांत विवरीं जें दृश्य तें अनृत ॥अभ्यासाविण बा फळेल न तुला हें स्वात्मतत्वामृत ॥माझें हेंचि खरें असें धरुं नको मी देह कल्पूं नको ॥आहे जो सहजें सुखस्वरुप त्या देवासि सोडूं नको ॥९९॥श्रीमद्वैष्णवसद् गुरू निजकृपें भेटोनि मातें स्वता ॥श्रीलक्ष्मीपति विष्णु बोध कळवी सच्चित्सुखात्मैक्यता ॥झाले शंभर श्लोक हे स्फुरुनि जे ते वर्णिले म्यां तुला ॥तूं यांतें विवरूनि स्वात्मसुख घे सांडूनियां हेतुला ॥१००॥विष्णू कृष्णजगन्नाथ स्मरणें सद्गुरुमुखें ॥लाभले जें स्वात्मतत्वामृत तें घोंटि तूं सुखें ॥१०१॥इति श्रीमद्वैष्णवसद्नुरुकृपान्वित कृष्णजगन्नाथस्फुरणजनित स्वात्मतत्वामृत शतकम् संपूर्णम्.॥ ॐ तत्-सत् श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP