मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३८६ ते ३९०

गवळण काल्यांतील पदें - पदे ३८६ ते ३९०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

गोपिका यथोदेप्रत-

पद ३८६ वें.

हरिहाकीं दृश्य सकल नुरविच ग एकाएकीं ॥धृ०॥
पूर्ण मनाचा निश्चय साचा । अनुभव शुद्ध जिवाचा बळला कीं ग । दृश्य सकल०॥हरि०॥१॥
द्रष्टा केवळ स्थूळ घटांचा मूळ होय सूक्ष्माचा फळला कीं ग ॥दृश्य सकल०॥हरि०॥२॥

यशोदा कृष्णाप्रत-

पद ३८७ वें.
लवियेलें कोणी वेडें हें तुला बालमुकुंद श्रीहरी ॥धृ०॥
नसत्य आज्ञान कृति करिसी कश्चा हेतूला । काय हा मिथ्या आळ घेसी निर्मळ मूळि तूं तरी ॥लवियेलें०॥१॥
न तुज उचित कधिं रचित हें भवाब्धी सेतूला । सांगतेम साच ह्लषीकेशीं राहिम बा निश्चल घरीं ॥लवियेलें०॥२॥
कृष्ण जगन्नाथ तूं या मनी आवडे केतूला । चिद्धना आत्मनिश्चयेंसी भासलें द्वैत ही जरी ॥ लवियेलें कोणी वेडें हें तुला बालमुकुंदा श्रीहरी ॥३॥

यशोदा गोपिकां प्रत-

पद ३८८ वें.
कुंदरदन हरि सुंदर तनुतरि निंदुं नका यदुराया ॥धृ०॥
इंदिवरवदन इंदुहास अरविंद नयन पुतनारी । विषयांधा मतिमंदा होउनि घालवितां वय वायां । कुंद०॥१॥
अज्ञानावृतचित्तें आपण मानितसां वपुधारी । आत्मविचारें शोध करुनि निज अविद्येसि जिंकाया ॥कुंद०॥२॥
कृष्ण जगन्नाथ तुह्मां न कळुनि विकळ होतसां भारिं । सकळ गोपिका मी पण सांडा, निर्विकल्प सुख व्हाया ॥ कुंदरदन हरि सुंदर तनु तरि निंदुंनका यदुराया ॥३॥

गोपिका यशोदेप्रत-

पद ३८९ वें.
चटकी चपल मोठा नाटकी साच । घटचि नुरवी हट धरुनि मुरारि ॥च०॥धृ०॥
गोपकटकीं एकिं एकट अनेकीं । व्यापक निकट करिं न मिळे कि भारिं ॥च०॥१॥
सकल त्यजुनि तरि, धरिन मी श्रीहरि । करि नाना परि न वदवति कंसारि ॥च०॥२॥
सुख निर्धारे आत्मविचारें । कृष्ण जगन्नाथ ऐसा असतो संसारीं ॥च०॥३॥

येशोदा कृष्णाप्रत-

पद ३९० वें.
ऐसी कैसी रे तूज ये हरि खोडीतरी कोंडिन आजिवरि घडिघडि गोपिघरिं जासिल जरि निश्चय दृढअंतरिं ऐसीं०॥धृ०॥
वारंवार किति विनविति मति माझी निश्चल न करिसि अजुनि विचारीं ॥ऐसी०॥१॥
देह गेह संसारिं हंस कंसारि तूंचि मज प्रिय पुतनारी ॥ऐसी०॥२॥
बैस निज सदनिं पैस न जा कधिं कृष्ण जगन्नाथ चित्सुखकारी ॥ ऐसी कैसी रे तुज ये खोडी तरी कोंडिन आजिवरि घडिघडि गोपिघरिं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP