मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
शेवटचें पद

शेवटचें पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्रीमद्‌सद्‌गुरु बांदकरकृत समग्र कविता सग्रह.

श्री बांदकर महाराजानीं आपला पुण्य देह शके १८२४ आश्विन वद्य प्रतिपदा या दिवशीं ठेविला ! खालील पद देह ठेव्ण्यापूर्विं फक्त तीन दिवस म्हणजे-आश्चिन शुद्ध दिवशीं ठेविला ! खाली पद देह ठेवण्यापूर्विं फक्त तीन दिवस म्हणजे-आश्विन शुद्ध त्रयोदशी दिवशीं केलें आहे ! व हेंच पद त्यांचें शेवटचें होय !!!
पद.
पाहुंयारे कृष्ण जो मर्दिं कालियाला ॥ जेणें बहुत पाडिले देहविषें त्याला ॥धृ०॥
माझें मीच हें विषोदक पाजुनि लोकां ॥ होता करित रात्रंदिन पात्र दु:ख शोका ॥ मोठा शत्रु शिरोमणि बाधक सकळांला ॥जेणें०॥१॥
करिं पुच्छ शिरावरि पाय फणा मर्दीं ॥ करिं टाळ वाजवुनि गाति भक्त गदीं ॥ यद्भजन नुरवि तिळ दु:ख समुद्राला ॥जेणें०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सच्चित्सुख कळला ॥ ज्यां त्यां जिवांचा देहभाव गळला ॥ देह मीपणा नुरवुनि रमवि सज्जनाला ॥जेणें०॥३॥

( भजन )

सीताराम-सीताराम-सीताराम-सीताराम-ऋषिवर-कविवर-मुनिवर-तरले-या निजमंत्रें भव हें नाम.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

॥ श्री बलभीम मारुतिराय की जय ॥

श्री समर्थ रामदास वैष्णव सद्‌गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नम:

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP