मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६

श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


करवीरक्षेत्रनिवासिनी । पूज्य तूं या त्रिभुवनीं ।
सकल जगताचे जननी । भक्तचिंता करितेसी ॥९॥
पंचगंगा कोल्हापूर क्षेत्र । तुझ्या लीलेचे मोठे चरित्र ।
दक्षिणकाशी असे पवित्र । वर्णिते झाले श्रेष्ठ मुनी ॥१०॥
हे कोल्हापूरनिवासिनी । विदर्भी गणोज्या येवोनी ।
भक्ता तोषवायाकारणीं । स्थान हे की भूषविले ॥११॥
भक्तप्रेमें येथे आली । भक्ती जनांला लागली ।
बहुतांसी तूं पावली । सुभाव जनीं वाढळा ॥१२॥
भक्ताबरोबर तूं येसी । गणोज्यासी राहसी ।
चारशे वर्षे झाली त्यासी । आनंद झाला सर्वांसी ॥१३॥
कोल्हापुरास न जातां । सेवा गणोज्यासी करितां ।
पावसी आपुल्या भक्तां । नमन तुला अंबिके ॥१४॥

चैत्रीं मार्गशीर्षमासीं । यात्रा असे पौर्णिमेसी ।
तैसे भक्तजन दर्शनासी । नित्य येती कधीही ॥३०॥
तूं तयांलागी पावसी । त्यांचे संकटां निवारिसी ।
अनुभव येतो जनांसी । भक्ती भावें करिताती ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP