मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची पदे भाग ७

सत्कवींची पदे भाग ७

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


त्वदीय महाराष्ट्र हा बुडत यातनासागरीं ।
तयास कर देउनी त्वरित काढ अंबे, वरी ॥
आई, घडविं ऐक्य तें न च छळो कुणीही कुणा ।
प्रसीद मज लक्षुमी, झणि निवार या यातना ॥

नरपुंगव वीर गाजी । छत्रपती राजा शिवाजी ।
ज्याने हिंदूंची राखली बाजी । यवनसत्र करून ॥
ताराबाईं त्यांची सून । राजकारणपटू पूर्ण ।
तिने नवी गादी स्थापून । कोल्हापुरात नेली की ॥

शैवमतीं तूं भवानी । मध्वांस वैष्णवी नारायणी ।
वैदिक मतात होउनी । गायत्री तूं राहिलीस ॥
शारदा म्हणती गाणपत्य । शक्तिरूपा ध्याती शाक्त ।
भोळ्या भाविक वारकर्‍यांप्रत । रुक्मिणी तूं आदिमाया ।
जेथें ब्रह्मा शक्ती तेथ । हा वेदान्ताचा सिद्धान्त ।
तुझ्या साह्यावीण सत्य । ज्ञान ब्रह्माचे होईना ॥

माय माझी तूं समर्थ । मग मी कां असावें दीनवत ।
सिंहाचिया पोराप्रत । अजत्व कदा संभवेना ॥
जें जें उणें पडेल माझें । तें तें अवघेंच अंबे, तुझें ।
दासगणूचें सर्व ओझें । आतां तुझ्या शिरावर ॥

तूं प्रकृती आदिदेवता । तूं सकळ तीर्थांची पवित्रता ।
तूं भक्तिमार्गाची निष्कामता । शूरत्वाची शक्ती तूं ॥
तूं खडगाची सतेजता । तूं काव्याची सरसता ।
तुझ्या भेटीवाचून वृथा । सर्व आहे. मातोश्री! ॥

हे नरा, करी तूं त्वरा, जाय करविरा,
अति सौख्य तुला देइल विष्णुची दारा ॥ध्रु.॥
बहु श्रेष्ठ असे करवीर, पंचनदितीर,
चित्त करि स्थीर, तया स्थळिं राही ।
या जगदंबेचे पाय सदा मनिं ध्याई ॥

रंकाळतळें, पद्माळें, वरूण, पेठाळें.
आदि पहा स्थान ।
स्वर्गपदाचे देव देत बहु मान ।
त्र्यंबुली माय ही भली, सदय दासासी,
दर्शन घेतां आशा भवातें नाहीं ॥
गोमती, धरुनि सन्मती, अधी कर दान,
दे विष्णुपदीं पिंड हो पितृ-उद्धरण ।
हे देव किती मी गणूं? तीर्थें किति म्हणूं?
शेष पां थकला ।
तिथे मानव तनुच्या काहि चालेनात अकला ॥

असें शहर, नित्य बाजार, बहुत गुलजार
असे की गुजरी,

छत्रपतींची पुण्यशील पहा स्वारी ॥
ओंकार, राम, विठ्ठल, विष्णुमंदिरा,
नव दुर्गा, कात्यायनि, पहा एकवीरा ॥१॥

दृढ नाम जया अंतरीं, आणिक वैखरी
नाम उच्चारी,
तो धन्य धन्य या आला असे संसारीं ॥३॥

सुंदरे, गुणमंदिरे, करुणाकरे, कमलोद्‌भवे ।
सिद्धचारणपूजिते, जनवंदिते, महावैष्णवे ॥ध्रु,॥

त्राहि हो, मज पाहि हो. मज पाहि हो महालक्षुमी ।
हेम बावन, रत्नकोंदण तें सिंहासन आसनीं ॥१॥
एक एक विचित्र माणिक जोडिलें मुकुटावरी ।
त्यांसि देखुनि लोपला शशि चालला गगनोदरीं ॥२॥

निजरिं तुज पूजिलें, बहु शोभसी कमलासनीं ।
काय हो तुज वर्णुं मी? मज पाव गे कुलस्वामिनी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP