मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची पदे भाग ६

सत्कवींची पदे भाग ६

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


‘स्वामी, मज न सोसवे ऐसें सत्य ।
मी न राहे आतां येथ । जाईन त्वरित भूलोकीं ॥
ऐसा प्रेमकलह करून । जगन्माता निघाली तेथून ।
पृथ्वीवरी येऊन । करवीर क्षेत्रीं राहिली ॥
जितुकीं तीर्थें पृथ्वीवर । तितुकीं असतील करवीर क्षेत्रीं ।
पंचगंगेचिया तीरीं । राहती झाली जगन्माता ॥

असो. सर्वदा उदासचित्त । काय करी जगन्नाथ ।
त्याग करोनि वैकुंठातें । भूतळाप्रती पातला ॥

कोठें रहावें म्हणोन । स्थळ पाहे मनमोहन ।
ऐसा हिंडत जनार्दन । दक्षिणदेशीं पातला ॥
भागीरथीचे दक्षिणतीरीं । तीन शत योजनांवरी ।
तीर्थ नाम सुवर्णमुखरी । प्र-वरा नदी वसतसे ॥
त्याचे उत्तरेसी कोसावरी । नामाभिधान वेंकटगिरी ।
शतयोजन लांब निर्धारी । त्रिंशद्‌ योजन रुंद जो ॥

यावरी हिरण्यगर्भ बोले वचन । म्हणे, ‘स्वामी! शीघ्र उठोन ।
करावें की मंगलस्नान । पुण्याहवाचन करावया’ ॥

मी सांगतो तैसें करावें । शीघ्रचि करवीरपुरा जावे ।
महाद्वारीं उभें रहावें । मग आरंभावें शोकातें ॥
दीघ्र स्वरेंकरून । करूं लागावें रुदन ।
मग ते इंदिरा घाबरोन । पुसेल येऊन तुजलागी ॥
काय संकट पडलें म्हणोन । इंदिरा पुसेल तुज कारण ।
तूं काही न करितां अनमान । इतुकेंच सांग तिजप्रती ॥
म्हणावें, तुझ्या विरहेंकरोन । वैकुंठ त्यागिलें नारायणें ।
वेंकटाद्रीवरी येवोन । राहिलासे उदास ॥
तेथे होवोनि व्यथा भारी । जर्जर जाहला असे मुरारी ।
या व्यथेतून निर्धारीं । वाचे की न वाचे कळेना ॥
ऐसें तियेसी सांगोन । पुन्हा करावें दीर्घ रुदन ।
मग ती अविलंबेंकरून । येईल तुजसमागमें ॥

विश्वाचा विश्राम रे । स्वामी माझ राम रे ।
आनंदाचें धाम । वाचूं गाऊं त्याचें नाम रे ॥

महालक्ष्मी, निज दर्शन दे मज ।
होय सुख सहज आत्मनिरीक्षणीं ॥ध्रु.॥
तूंचि जीवलगा, जीवन त्रिजगां ।
अखंड सुभगा सदसद्‌विलक्षणी ॥१॥
असुनि निराकृति, चतुर्भुजाकृती ।
मूर्ति तुझी भजकांसि सुरक्षणी ॥२॥
मातुलिंग विज्ञान, गदा धृती ।
खेट निजानुसंधान क्षणक्षणीं ॥३॥
अद्वयब्रह्मानंद प्राशनपात्र ।
करीं बिभ्रती श्रीकमलेक्षणी ॥४॥
चतुरायुधवती श्रीविष्णुयुवती ।
कृष्ण जगन्नाथ पदीं लीन स्वमोक्षणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP