मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३

श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


दंड कमंडलू करीं शोभताती । रुद्राक्षांची दीप्ती कंठस्थळीं ॥
चरणकमळीं पादुका सुंदर । मूर्ति मनोहर तेज:पुंज ॥
सर्वांगा चर्चित विभूति उत्तम । तनू मनोरम शोभतसे ॥
कटीस मेखला ऐसा हा सोहळा । जगतावेगळा सद्‌गुरुराज ॥
माधवेंद्र विराजती सिंहासनीं । देखतां नयनीं हर्ष वाढे ॥
योगिराज माझा माधवेंद्रस्वामी ॥ राजयोगी नामी साजे ऐसा ॥
गोविंदतनय सीताराम जाणा । वंदी गुरुराणा अनन्यभावें ॥

हस्त दोन कोठे? मुखे लुप्त झाली ।
धेनू कुठे गेली श्वानासंगें? ॥१॥
गणपती या नामें दत्ता नटतोसी ।
विघ्ने निवरिसी भक्तांची तू ॥२॥
गजमुख सान नेत्र लंबोदर ।
दिव्य रक्तांबर कटिला शोभे ॥३॥
कमंडलू पद्म शंख गदा चक्र ।
रुद्राक्षांचे हार गेले कोठे ॥४॥
अंकुश परशू अन्‌ मोदक हस्तांत ।
चौथा वरदहस्त दीनांसाठी ॥५॥
लुप्त झाला काय मुकुट जटांचा ।
शोभतो रत्नांचा भव्य शीर्षी ॥६॥
प्रणवस्वरूपी शिवगौरीपुत्र ।
दत्त गजवक्त्र एकरूपी ॥७॥
श्रीदत्तगुरो, बघुनी दिव्य तुझे रूप ।
अनंता अमृप सुख होत ॥८॥
शिरें दोन्ही हस्तांसंगे कोठे गेली? ।
कुंकू शोभे भाळीं, अदभुत हें ! ॥१॥
शक्तिरूपें नटसी प्रभो दत्तात्रेया ।
जणू की पटवाया ‘जगदंबा मी‘! ॥२॥
शंख कमंडलू चक्र कुठे लुप्त? ।
त्रिशूल पद्म नष्ट आज कैसे? ॥३॥
कषाय वस्त्र आज दिले का टाकुनी? ।
पैठणी नेसुनी उभा काय? ॥४॥
दिसती ना कोठे रुद्राक्षांचे हार ।
ठुशी चंद्रहार रुचती आज ॥५॥
श्वानही पळाले. धेनु कुठे आज? ।
पाठीं वनराज उभा डौले ॥६॥
रत्नांचा तो मुकुट शोभे शिरावरी ।
खेटक पात्र करीं म्हाळुंगही ॥७॥
महालक्ष्मी नामें वससी करवीरात ।
धन्य हो अनंत दर्शनाने ॥८॥

श्रेष्ठ आदिशक्ती आतां आळवू या ।
प्रसन्न करूया नामघोषें ॥१॥
खेटक पानपात्र वामकरीं घेई ।
म्हाळुंग गदा ही सव्य हस्तीं ॥३॥
तेजस्वी मृगेंद्र पाठीं पायापाशी ।
दैत्यभक्षणासी सज्ज सदा ॥४॥
प्रणवरूप ब्रह्म शिरीं मातुलिंग ।
सौख्य दे अभंग सद्‌भक्तांसी ॥५॥
तमोरूप काली शारदा बासूस ।
सिद्ध ते सेवेस विजय-जय ॥६॥
अंबेच्या सन्मुख असे गणराया ।
विघ्ने निवाराया नित संतांची ॥७॥
राऊळात देव आपुलाल्या स्थानीं
जोडोनिया पाणि सेवेसाठी ॥८॥
जगदंबा करवीदा पावन करीत ।
धन्य हो अनंत दर्शनानें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP