मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२

मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


मुक्तेश्वरांची पदे
अमृतभरिते सरिते, अघदुरितें वारीं ।
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं ॥
वारीं मायापटल प्रणमत परिवारीं ।
हे रूप चिद्रूप तद्रूप दावीं निर्धारीं ॥४॥

चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते, माझे निजभाळीं ॥
पुसोनि चरणातळीं पदसुमनें क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

नगरप्रवेसीं नरशार्धुळा । दुर्गाप्रासाद देखिला डोळां ।
दुर्गा भगवती विशाळा । लोटांगणीं वंदिली ॥
धर्मराज करी स्तवन । विस्वमाते तूंतें नमन ।
तुजवेगळें ब्रह्म आन । हें सर्वथा घडेना ॥
ब्रह्मा शंकरू आणि हरी । बाळकें जन्मली तुझे उदरीं ।
वर्तती आपुले व्यापारीं । तुझी आज्ञा जननिये ॥
तुझी आज्ञा भंगितां देख । ब्रह्मा जाहाला चतुर्मुख ।
लिंगपतन त्रिंबक । कपाळपाणी त्वां केला ॥
विष्णूसी देउनि बहुसोंगें । बहुत खेळसी आंगें ।
लागतां वृंदोचिये मागे । श्मशानवासी तो केला ॥
शक्राआंशीं पडिलीं भगें । शशांक व्यापिला क्षयरोगें ।
तो तुझेनि आज्ञाभंगें । अविधिमार्गें वर्ततां ॥ ( विराटपर्व )

तारा तूंचि सुगतागमीं । गौरी भगवती शैवधर्मीं ।
वज्रादेवी यया नामीं । कौळिकाचारीं बोलिजे ॥
जैन म्हणती पद्मावती । त्रिपदा गायत्री वेदमतीं ।
सांख्य बोलती तुजप्रती । आदिशक्ती व्यापक ॥
अवतार धरूनियां गोकुळीं । जन्मलीसी नंदाकुळीं ।
कंसकुळा करूनि होळी । चैद्य मागध अटिले ॥ ( विराटपर्व )

तारा तूं सुगतागमीं, भगवती शैवागमीं बोलती ।
वज्री कौलिक वानिती, जिनमतीं पद्मावती मानिती ॥
गायत्री प्रतिपाद्य वेद म्हणवी. सांख्यागमीं वर्णिली ।
हे माया प्रकृती, असो. बहुत हे पद्मावती चांगली ॥ ( पद्मावती स्तोत्र )

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP