मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १

श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


उद्यद्‌दिनकरवदने शशिशेखरसदने ।
बुधजनशरणे वरुणे परशिव-आवरणे ॥१॥
जयदेवि जय देवि शाकंभरि दुर्गे ।
मां परिपालय जननि विदलितरिपुवगें ॥ध्रु.॥

मामव जननि, जनिते, अभिनवपरिवारे ।

जय देवि जय देवि जय रुक्मिणि कांते
भीमरथीतटनिवसद्‌विठ्ठलविभुकांते ॥
पूरितनिजजनकामे विद्युत्तनुकांते ।
जय सकरुणहृदये कुरू वासं मत्स्वान्ते ॥

देवि त्रिभुवनमातेर्निर्जितशशिवदने ।
ताटंकांकितकर्णे नीलोत्पलनयने ॥
बिंबसमाधरदीपकसितसुस्मितरदने ।
चारुकपोले ललिते मुनिवरकृतनमने ॥२॥

रामपदांबुजमधुकररामाभिधवरदे ।

जय देवि जय देवि विंध्याचलवासिनि ।
मात: पालय पालय मां केशवभगिनि ॥ध्रु.॥

काकड आरती अंबे, तुजला ओवाळी ।
उठोनिया सत्वर भक्तजनांतें पाळी ॥ध्रु.॥
आला प्रात:काळ आता उठावे माते ।
दाखवावे चरणकमल भक्तजनांतें ॥१॥
ब्रह्मा विष्णु शिवादिक तुझी बालके ।
आळवित प्रेमें तुजला जननि! कौतुकें ॥२॥
अपुलाल्या कामीं अंबे, त्यांला योजावे ।
झाला उशीर आतां सत्वर उठावे ॥३॥
सनकादिक योगीजन चरण पहाया ।
आले तुझे चरणकमळीं भाळ वहाया ॥४॥
नारायण विनवी श्रीरामा, जागे करावें ।
पूर्ण कृपादृष्टीं मजला बाळा पहावे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP