मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे २०१ ते २१० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे २०१ ते २१० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे २०१ ते २१० Translation - भाषांतर २०१काळहस्तीश्वरा, जेवी साचार । शपथ, करितो स्वामी, सादर ।मजवरी दया करी लवकर । संतोषभरें न जेविशी जरी ॥तरी न जेवीन मीही निश्चित । ना तरी मदानें थबथबीत ।मांसघास देऊ काय मुखात । बरे, हर्षयुक्त तसे करीन ॥या प्रकारें बोलून सादर । त्याच्या वदनीं मांस मधुर ।अर्पिता जाहला भक्तशेखर । दयाळू थोर काळहस्तीश ॥२०२गंधोदकाच्या अभिषेकापरी । गंडूषजलसेचन अंतरीं ।मानिता जाहला भक्तकैवारी । कालाचा अरी सांबमूर्ती ॥सपादत्राण पादप्रहार । मस्तकीं जो करी व्याधकुमार ।त्यातें मानी तो परमेश्वर । शिशु सुंदर ऐशा स्कंदाने ॥लीलेने ठेविल्या चरणापरी । भक्तीने परीक्षून गोड भारी ।वन्यमांस जे अर्पिले निर्धारी । जे परोपरी मदाने युक्त ॥२०३ईश्वरप्रसादाहून इतर । काही न इच्छिले त्याने साचार ।त्या नीलाशी समेत महेश्वर । कैलासीं सत्वर येऊन पावला ॥ज्यास देऊन स्वमांसनयन । शबरही काळभय दारुण ।दूर करिता जाहला भक्तीने । जो परिपूर्ण दयासमुद्र ॥२०४मग त्या तीरमार्गाहुनी । नृप आला जंबुकेशायतनीं ।तेथे देव जंबुकेश्वर धणी । देवी जननी अखिलांडेश्वरी ॥जललिंग असे जो महेश्वर । जेथे येउनि ब्रह्मादिक सुर ।नित्य करिती जयजयकार । महिमा थोर ज्याची असे ॥कल्पवृक्षपुष्पें ज्यांच्या कबरीं । स्वर्गीं असती ज्या देवकुमरी ।त्यांनी सेविजेली जे गौरी । अखिलांडेश्वरी तेचि हे ॥२०५पूर्वी विश्वावसु चित्रसेन । दोघे गंधर्व असती गर्वाने ।देवाने शापिले तयांकरणे । ‘गज कोष्टी होणे तुम्ही’ मणूनी ॥त्यांनी करूनी क्षमापन ( क्षमायाचन ) । उस्राप मागितला परतूनदेव बोले तेव्हा वचन । ‘गजवन आहे भूमीवरी ॥ते क्षेत्र माझे प्रीतिकर । तेथे तुम्ही कित्तेक वासर ( संवत्सर ) ।जाउनी वास करा निरंतर । मग शंकर दया करील’ ॥२०६ऐशी ऐकूनी देवाची वाणी । गंधर्व येऊनी तया स्थानीं ।गज कोष्टी देह धरूनी । वास करून असतां ॥कोष्टयाने स्वतंतुगुणें । त्या जललिंगासी केले आयतन ।नित्यही करिती त्याचे पूजन । मुक्तिकारणें भकियुक्त ॥प्रतिनित्य ते भंगूनी गजाने । आपणाही करणे अर्हण ।ऐसे असतां बहुत दिन । गोप्त होऊनी कोष्टयाने पाहिले ॥येक्या दिनीं पुन्हा तो हत्ती । तैसेचि करितां तयाप्रती ।कोष्टयासी क्रोध आला चित्तीं । शिरला अतिवेगें पुष्करीं ॥महाशरीरही गजनायक । तेणें मृत जाहला सम्यक ।कोष्टीही तैसाचि निर्जीवक । शिवें स्वलोक गजासी दिला ॥कोष्टी मणाला देवासी । पुरली नाही पूजेची असोसी ।करावे म्यां नीट देउळासी । मग कैलासासी मी येयीन ॥२०७मृगया - यात्रा - विधि:चतुर्दश्यां आचार्यो नित्यकर्मानुष्ठानादिंक कृत्वा,शयनमंदिरं प्रविशय, देवमुत्थाप्य,ब्रह्म्कलशादिपंचकलशान् धान्योपरि निधाय,हिरण्यशृंगमित्यादिवारुणयंत्रणोदकपूरितान् पंचकलशान्गायत्र्याभिमंत्र्य देवं नित्यार्चनक्रमेणाभ्यर्च्य,पुरुषसूक्तेनाभिषिच्य, नित्यहोमं कृत्वा,देवस्य समीपं गत्वा, प्रणम्य -मृगयात्रा त्वया देव श्व: कर्तव्यं सुरेश्वर ।तत्र प्रतिसरारंभमनुज्ञां दातुमर्हसि ॥जितंते इति कंकणं बद्ध्वा -जितंते पुंडरीकाक्ष, नमस्ते विश्वभावन ।सुब्रह्मण्य, नमस्तेस्तु महापुरुष पूर्वज ॥२०८यत्र बाणा: संपतन्ति कुमारविशिखा इव ।इंद्रो नस्तत्र वृत्रहा विश्वहा शर्म यच्छतु ॥२०९शा. ए वेदंबु पठिंचे लूत भुजंगंबे शास्त्रमुल्चुचेंदा ने विद्याभ्यसनंबोनर्चे गरि चेंचे मंत्रमूहिंचेबोधाविर्भाव निधानमुलू चदुवुळय्या!कावु मी पादसंसेवासक्तिये काक जंतु ततिकिन् श्रीकाळहस्तीश्वरा!२१०मार्गावर्तितपादुका पशुपतेरंगस्य कृर्चायतेगंडूषांबुनिषेचनं पुररिपोर्दिव्याभिषेकायते ।किंचित् भक्षितमांसशेषकवलं नव्योपहारायतेभक्ति: किं न करोत्यहो वनचरो भक्तावतंसायते ॥ N/A References : N/A Last Updated : March 14, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP