श्री वेंकटेश्वर - पदे ३१ ते ४०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


३१
ज्याचे पायवणी सदाशिव जटाजूत स्वयें वंदितो ।
ज्याचे रूप मनात मध्वमुनि तो पाहोनि आनंदतो ॥
जो या भक्तजनांसि संकट पडों नेदी कधी श्रीहरी ।
तो हा व्यंकट रामराज्य करितो साम्राज्य पृथ्वीवरी ॥१॥
ज्याचे पूजन पंकजासन करी क्षीराब्धिमध्यस्थळीं ।
कैलासीं गिरिजापती जपतसे सप्रेम नामावली ।
ज्याची मूर्ति मनात मध्वमुनि तो ध्यातो सदा सावळी ।
तो हा वेंकटराज राज्य करितो, साम्राज्य शेषाचळीं ॥२॥

३२
त्रैलोक्यात तुझाचि आश्रय मला, तू गाय, मी वासरू ।
माझी तू कुळदेवता जिवलगे, तू माय, मी लेकरू ॥
सेवाहीन अनाथ दीन मन ते विश्वंभरे, पोसिले ।
माझे तों अपराधवर्ग सदये, त्वां सर्वही सोसिले ॥६॥
नाही म्यां नवरात्र उत्सव तुझा ह्या लोचनीं देखिला ।
नाही या श्रवणीं पुराणमहिमा वेदांत तो ऐकिला ॥
नाही या चरणीं प्रदक्षिण कधी देवालया घातली ।
देवा, काय करू ? कुबुद्धि विषयांमध्येच हे रातली ॥७॥

३३
मार्ग शुद्ध लखमापुरिचा जी । होत उत्सव बरा गिरिचा जी ।
श्रीहरी करितसे घरिचा जी । नाहि अन्य जनिं या परिचा जी ॥
व्यंकटेश करुणारसपात्रा । भेटुनि निववु गा निज गात्रां ।
आदरें नमुनि वैष्णवमात्रा । पाहु धन्य लखमापुरियात्रा ॥
तारि जो जन भवांबुधिच्या पुरीं । चारि मुक्तपुरिची मधुरापुरी
जो कृपा करितसे अखमा पुरी । तो रमापति वसे लखमापुरीं ।

३४
देवद्रोही म्हणविति त्यांवरि । चक्र तुझे ते क्षोभे ॥

३५
कुलस्वामी माझा त्रिभुवनपती, वेंकटपती ।
सदाही सद्‍भावें सुर, मुनि, महाभक्त जपती ॥
तुझ्या पायां या सतत नमितो, दीनशरणा ।
प्रभू पंचक्लेशात्मक भवनिधीमाजिं तरणा ॥१॥
त्यजोनी वैकुंठा, भुजगगिरिमाथां विलससी ।
तथापि त्रैलोक्यीं भरुनि विभु, संपूर्ण अससी ॥
जनाच्या उद्धारा प्रकटुनि महीमाजिं विभवा ।
महामाया तूझी अकळ विभुदेंद्रा विधिभवां ॥२॥
महालक्ष्मी तूझ्या हदयकमळीं नित्य निवरे ।
तिला विश्रामातें अणिक दुसरे स्थान न वसे ॥
प्रिया तूझ्या ठायीं अचपळ गुणें साचचि रमे ।
जिला ब्रह्मेंद्रांच्या सदनिं पळ तेही न करमे ॥३॥

३६
अनंतब्रह्मांडोदरगत जनीं उत्सव घडे ।
समस्तांचे दैवें प्रभुं तव कृपाद्वार उघडे ॥
जगाच्या कल्याणास्तव निघसि तू दिव्य वहनीं ।
सुधासारें दृष्टीं भरति वरदा, याच अहनीं ॥१३॥
रथीं जेव्हा देवा, वळघसि, महावैभवधरा ।
त्रिलोकीलोकांहीं अतिशय घडे पीडित धरा ॥
सुरां, मर्त्यां, नागां मिसळण पडे याच दिवशीं ।
तदा साने मोठे म्हणुनि कवणा कोण गिवसी? ॥१४॥
सहस्त्राक्षाचीही नयनकमळे तैं न पुरती ।
‘महाशोभा पाहू’ म्हणति अमला दिव्य पुरती ॥
तदा दो नेत्रांच्या लघुतर नरां कै निरखवे ।
न माये ब्रह्मांडीं किति म्हणुनि तैं या हरिखवे ॥१५॥

३७
सुरेंद्राच्या वामा वरुषति शिरीं दिव्य सुमनें ।
महानंदें गाती चरित, भजती नित्य सुमनें ॥
महावाद्यांचेही गजर सुरगंधर्व करिती ।
नटी नाटयारंभीं अभिनय कळायुक्त धरिती ॥१६॥

३८
श्रीशेषाद्रिनिवासा! वेंकटनाथा! तुला असो नमन ।
बहु भक्तांचे झाले मुदित, तव पदांबुजीं वसोन, मन ॥१॥
नमितो त्वच्चरण, सदा दासांच्या पावतात नवसा जे ।
श्रीगोविंदा! यांचा महिमा विश्र्वात नित्य नव साजे ॥२॥
भक्त चतुर्विधहि तुझे सुकृती श्रीवेंकटेश्वरा! धन्य ।
संसारात श्रमति, भ्रमति, प्राणी अभक्त जे अन्य ॥३॥
प्रभु! तू करिसी, मानुनि नत शूद्रहि विप्रसा, दया त्रात्या ।
श्रीशा! न घडेचि तुझी, जो कोणी विप्रसाद, यात्रा त्या ॥४॥

३९
पाहे तुझा रथोत्सव जो, सादर रथगुणासि आकर्षी ।
नाकीं तद्यश गातो त्याच्या पूर्वजसभेत नाकर्षी ॥१४॥
वानरहि तव रथोत्सव सादर अवलोकतात, बहुधा तो ।
वेष तसा घेऊनि, सुरपति येतो; या सुखेंचि बहु धातो ॥१५॥
तुझा रथोत्सव जो पाहतो आणि रथाचा दोर धरून श्रद्धेने रथ ओढण्यात

४०
तुज, निर्निमेष होवुनि, सादर जोडूनि हस्त जो पाहे ।
तद्रूपचि तो होतो, फळ कोणा दर्शनीं असे आहे? ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP