श्री वेंकटेश्वर - पदे १६१ ते १७०
श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.
१६१
कोणी त्रिमलाचारे नामें ब्राह्मण । जो का सदाचारसंपन्न ।
षट्कर्मे आचरोन । बेलगुप्पी गावीं जाण राहतसे ॥
जो सत्तवगुणी आणि भाविक । वेंकटाचलीं अवतरला देख ।
भक्तजनांचा प्रतिपालक । तो वैकुंठनायक सदा चिंती ॥
तयाची असे साधारण वृत्ती । त्या़तचि करी उदरपूर्ती ।
आन्मद मानूनिया चित्तीं । सदा तृप्ती मानितसे ॥
१६२
तव इच्छा वेंकटगिरीवरी । जावयाची असे खरोखरी ।
परिश्रम घेऊनि इतुक्या दूरी । भूदेवा, निर्धारी जाऊ नको ॥
शूरपाल नामें क्षेत्र । काशीसमान असे पवित्र ।
तेथील नृसिंहदेवाचे चरित्र । प्रसिद्ध सर्वत्र जगतीं या ॥
तेथे जाऊन कृष्णास्नान । करूनि विप्रा, शुचि होऊन ।
घ्यावें देवतादर्शन । तसेच पूजनही करावे ॥
कृष्णादक्षिणतीरीं देख । द्बय अर्ध कोशावरी सम्यक ।
कल्हळी नामें खेटक । गिरीवरी एक वसते ॥
नागणैयाख्य श्रेष्ठ भक्त । ईशदर्शनार्थ वाट पाहत ।
राहिला असे, तूही तेथ । जावें त्वरित विप्रेंदा ॥
१६३
अश्विन वद्य त्रयोदशीसी । यात्रा परत आली, त्या दिवसीं ।
त्रिमलाचारी त्यांचे संगतीसी । शूर्पालक्षेत्रा पावला ॥
अग्रत: देखिले नृसिंहभवन । शोभतसे दैदीप्यमान ।
पुढे गेला कृष्णा उतरून । श्रीपुढे लोटांगण घातले ॥
दक्षिणाभिमुख नृसिंहरूपी वेंकटपती । बसले, कोटिसूर्यासम दीप्ती ॥
सव्यभागी बैलेश्वर गणपती । तेवीं केशव वराहमूर्ती विराजे ॥
वामभागीं श्रीरामचंद्रमूर्ती । पश्चाद्भागीं गरुड मारुती ।
उभे कर जोडोनिया तिष्ठती । अश्वत्थवृक्ष पुढती शोभतसे ॥
अभिमुख पूर्ववाहिनी कृष्णानीर । वाहतसे स्वच्छंदें । स्थिरस्थित ।
स्नानपानें भवभयहर । तटीं घाट सुंदर शोभतसे ॥
सिंहासनीं नृसिंहदेव विराजती । चतुर्भुज, श्यामवर्ण कांती ।
अंकीं भार्गवी शोभती । जे चिच्छक्ती-आदिमाया ॥
स्नान करोनिया घाटावर । येवोनि पूजिती नारीनर ।
सप्रेम नमिती वारंवार । पाहूनि द्बिजवर तोषला ॥
करोनिया आपण कृष्णास्नान । नृसिंहदेव पूजिला प्रेमेंकरोन ।
येणेपरी दिनत्रय जाण । तये स्थानीं ब्राह्मण राहिला ॥
१६४
परंपरें आम्ही शिवभक्त । शिवोपासनीं अनुरक्त ।
आता केलिया विपरीत । गुरु-देवता क्षोभतील की ॥
लोक निंदतील परम । म्हणतील ‘झाला उद्दाम ।
सोडिला आपुला कुलधर्म । झाला बेशरम’ वदतील की ॥
तैसेच सर्व गणगोत । ‘भांग उगवे तुळसीत ।
तसा झाला आमुचे वंशात ’ । म्हणूनि समस्त हसतील की ॥
मोडू जरी तयाचे वचन । तरी ब्रह्मैयारूपी भगवान ।
रुष्टेल, सत्यत्वेंकरोन । अनुभव पूर्ण मज आला ॥
१६५
पार्वती आणि लक्ष्मीपती । ही सहोदर जाण निश्चितीं ।
तू विष्णुपूजा करशील ती । पार्वतीअपचिती ( ? ) जाण पां ॥
यास्तव वैष्णवी दीक्षा घेवोन । हदयातील कल्मष टाकोन ।
करीत रहावे विष्णुपूजन । तेणें अपर्णा पूर्ण संतोषे ॥
कर्पूरगौर, शंखचक्रधर । गिरिजापती, इंदिरावर ।
दोघे एकचि साचार । हा मनीं निर्धार असो दे ॥
१६६
माझी झाली निभ्रांत मती । आता कोणाची काय भीती ।
तप्तमुद्रा घेईन निश्चितीं । म्हणोनि स्वस्थ चित्तीं राहिला ॥
तों ऐकिली सुवार्ता । वैष्णव स्वामी येतील आता ।
तेव्हा म्हणे ‘स्वामी समर्था । मम इच्छितार्था पुरवावे’ ॥
श्रीस्वामी रघुनाथतीर्थ । हे देशदिग्विजय करीत ॥
आले जंबूप्रांतात । तेणें आनंदित नागरस ॥
आपण पुत्रादि ( सवें ) घेवोन । घेतले स्वामिचरण दर्शन ।
विनवोनिया कर जोडोन । तप्तमुद्राधारण पै केले ॥
सवें उपदेश घेवोन । वंदोनिया श्रीचरण ।
श्रीमन्मध्वग्रंथादि जाण । करीत श्रवणपठण राहिला ॥
१६७
परशुरामभाऊचे पदरीं देख । होते येसाजी रघुनाथ नामक ।
कौशिकगोत्री, उपनाम फाटक । चाकरी मन:पूर्वक करोनी ।
भास्करपंत तयांचे सुत । तत्पुत्र दामोदरपंत ।
ज्यांहीं मिळविली सुकीर्त । जमखंडीपतिसेवेत पां ॥
मजसह चार पिढयांवरी । करीत आलो श्रीमंतांची चाकरी ।
लहानमोठी कामे परोपरी । केली मन:पुर:सरी विश्वासें ॥
पाचव्या पिढीचा श्रीपती । भाऊंची पंचम संतती जंबुपती ।
हल्लीचे भाऊसाहेब गुणज्ञ नृपती । त्यांची सेवा यथामती करिताहे ।
असो, तो दामोदर माझा पिता । सगुणा सुसती माझी माता ।
उभयतांचे चरणीं माथा । ठेवोनिया सुचरिता संपविले ॥
शके सत्राशे सदतीस । संवत्सर नाम राक्षस ।
शुद्ध पक्ष श्रावणमास । पौर्णिमा, भौम दिवस तद्दिनीं ॥
१६८
शेषाचलगतो विष्णु: सद्भक्तै: प्रार्थित: पुरा ।
कर्णाटदेशमागत्य रमया सह मोदते ॥
शूर्पारकक्षेत्रसमीपभागे क्षेत्रं पवित्रं किल जंबुखंडम् ।
तस्यैव पार्श्वे गिरिमूर्ध्नि देवो विराजते श्रीपतिवेंकटेश: ॥
१६९
महाराष्ट्रीयभाषायां हरिफाटकसूरिणा ।
वर्णितं तत्समाश्रित्य देववाणी प्रवर्तते ॥
जंबूपुराधिपस्यासौ प्रधानामात्यपीठभाक् ।
जयतान् माधवो येन प्रेरितोऽस्मीह कर्मणि ॥
राज्याधिकारे महति स्थाने स्थाने नियोजित: ।
अमात्यपदवीं प्राप्तो लभतां यथ उत्तमम् ॥
स्वयं सदाचाररत: शास्त्राध्ययनशीलवान् ।
अन्येषां पुण्यकार्येषु साह्यं कुर्वन् प्रवर्तते ॥
मंदोत्साहमसौ ज्ञात्वा विषीदंतं तथा च माम् ।
पुन: पुन: सद्वचनैरुत्तेजयति सत्कृतौ ॥
एवं माधवरायेन लेखनेऽस्मिन् प्रवर्तित: ।
प्रारब्ध्स्यान्तगमने साधनं भगवत्कृपा ॥
१७०
त्वत् कृपां महतीं लप्स्य इत्याशा ह्रदि मे प्रभो ।
तेनेदं तव चारित्रं यथामत्यनुवर्णये ॥
‘अश्म’ कर्णाटभाषायां ‘कल्ल’ इत्यभिधीयते ।
‘हळ्ळी’ति खेटकं, तेन ‘कल्हळ्ळी’ त्यश्मखेटकम् ।
अश्मखेटकसान्निध्ये स्थितो वेदगिरिर्महान् ।
तत्र श्रीवेंकटेशस्य स्थानं परमपानम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 14, 2014
TOP