श्री वेंकटेश्वर - पदे १ ते १०
श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते.
१
वेंकटेशा यात्रे जाती ।
लोक उदंड कानग्या खाती ( देती ? ) ॥
आणि नवेद्य उभ्यां खाती रे रे रे रे ।
रचना उदंड सांगती रे ॥६॥
२
गिरिवरी महाराज अवतारी ॥ध्रु.॥
गरुड सेवा करी, मारुति महाद्वारीं ॥१॥
शंखचक्रापीताबंरधारी ।
पुष्करणी पाप निवारी ॥२॥
कर्पूरआरत्या करीं ।
पाहती नर नारी ॥३॥
रीस-वानरांच्या हारी ।
रामदासाचा कैवारी ॥४॥
३
शामसुंदर शोभे त्रिदशकैवारी ।
दक्षिणेसि शेषनामें सीता सुंदरी ॥२॥
४
श्यामसुंदर शोभे त्रिदशकैवारी ।
दक्षिणेसि शेष, वामे ( वाशीं ) सीता सुंदरी ॥२॥
५
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
आरती ओवाळू तुज रे जगदीशा ॥ध्रु.॥
अघहरणी पुष्करिणी अगणितगुणखाणी ।
अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी ॥
असंख्य तीर्थावळी अचपळ सुखदानी ।
अभिनव रचना पहातां तन्मयता नयनीं ॥१॥
६
अतिसुखमय देवालय, आलय मोक्षाचे ।
नाना नाटक रचना, हाटक वर्णाचे ॥
थकिस मानस पाहे स्थळ भगवंताचे ।
तुळणी नाही, हे भू-वैकुंठ साचे ॥२॥
७
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल लीळा ।
नाना रत्ने, नाना सुमनांच्या माळा ॥
नानाभूषणमंडित वामांनीं बाळा ।
नाना वाद्यें, मिनला दासांचा मेळा ॥३॥
८
श्रीचैतन्यकृपा अलोकिक । संतोषोनि वैकुंठनायक ।
वर दिधला अलोकिक । जेणें सुख सकळांसी ॥१०१॥
हा ग्रंथ लिहिता गोविंद । या वचनीं न धरावा भेद ।
हदयीं वसे परमानंद । अनुभवसिद्ध सकळांसी ॥१०२॥
या ग्रंथींचा इतिहास । भावें बोलिला विष्णुदास ।
आणिक न लगती सायास । पठणमात्रें कार्यसिद्धी ॥१०३॥
९
ऐसा करुणावचनीं देवदास । प्रार्थितां पावला जगन्निवास ।
वोतिला चैतन्यकृपेचा रस । सुखसंतोष पैं केला ॥१३२॥
१०
ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषांसी दाहक ।
तोषूनिया वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 13, 2014
TOP