श्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


११
तुज न जाणतां झालो कष्टी । आता दृढ तुझे पायीं घातली मिठी ।
कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घाली माझे ॥११॥
माझिया अपराधांच्या राशी । भेदोनि गेल्या गगनासी ।
दयावंता हषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करी ॥१२॥

१२
तुझिया नामाची अपरिमित शक्तीं । तेथे माझी पापें किती? ।
कृपाळुवा लक्ष्मीपती । बरवे चित्तीं विचारी ॥३८॥

१३
तुझे नाम पतितपावन । तुझे नाम कलिमलदहन ।
तुझे नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझे ॥३९॥
आता प्रार्थना ऐक कमळापती । तुझे नामीं राहो माझी मती ।
हेचि मागतो पुढतपुढती । परंज्योती व्यंकटेशा ॥४०॥

१४
ऐसी प्रार्थना करूनि देवीदास । अंतरीं आठविला श्रीव्यंकटेश ।
स्मरतां हदयीं प्रगटला ईश । त्या सुखासी पार नाही ॥५२॥
हदयीं आविर्भवली मूर्ती । त्या सुखाची अलोकिक स्थिती ।
आपुले आपण श्रीपती । वाचेहातीं वदवितसे ॥५३॥

१५
मजलागी देई ऐसा वर । जेणें घडेल परोपकार ।
हेचि मागणे साचार । वारंवार प्रार्थितसे ॥८१॥
हा ग्रंथ जो पठण करी । त्यासी दु:ख नसावे संसारीं ।
पठणमात्रें चराचरीं । विजयी करी नगातें ॥८२॥

१६
अंती व्हावे मोक्षसाधन । ऐसे प्रार्थनेसी दीजे मन ।
एवढे मागतो वरदान । कृपानिधे गोविंदा ॥८९॥

१७
प्रसन्न झाला व्यंकटरमण । देवीदासासी दिधले वरदान ।
‘ग्रंथाक्षरीं माझे वचन । यथार्थ जाण निश्चयेमसी ॥९०॥
ग्रंथीं धरोनी विश्वास । पठण करील रात्रंदिवस ।
त्यालागी मी जगदीश । क्षण एक न विसंबे’ ॥९१॥
देवीदास विनवी श्रोतयां चतुरां ॥ प्रार्थनाशतक पठण करा ।
जावया मोक्षाचिया मंदिरा । काही न लगती सायास ॥१०६॥

१८
क्षय संवत्सर आषाढमासीं । सोमवार तृतियेचे दिवसीं ।
पूर्णता आली ग्रंथासी " श्रोतीं सावकाशीं परिशिजे ॥१४४॥
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी या अपूर्ण ( पक्षाचा नामनिर्देश
नसलेल्या ) रचनाकालाचा निर्णय केला असून, त्यांच्या शास्त्रशुद्ध निर्णयानुसार

१९
सकळ सुरवरांचा ईशु । पूर्णब्रह्य सनातन वेंकटेशु ।
स्थिर करूनिया मानसु । हरिचरित्रास श्रवण कीजे ॥५॥
जयापासूनि निर्माण त्रिगुण । तो भक्तीस्तव जाला सगुण ।
शेषाचलीं अवतरून । भक्तजन उद्धरिले ॥६॥
ऐसा जो जगन्निवासु । करुणावचनें प्रार्थितो देवीदासु ।
तो श्रोतीं सावकाशु । आदरेंकरूनि परिसिजे ॥७॥
जय जया जी वेंकटेशा । पुराणपुरुषोतमा परेशा ।
भक्तांची पुरविसी आशा । माझी उपेक्षा का केली? ॥८॥
युगानयुगीं भक्तांसी । स्मरतां पावसी हषीकेशी ।
तो तू आलस्ययुक्त जालासी । मज न पावसी स्मरणमात्रें ॥९॥

२०
भक्तांलागी अनंत अवतार । अनंतरूपी तू साचार ।
श्रीगिरिवरी निरंतर । व्यंकटेशरूपें विराजसी ॥१२६॥
पंढरीस होऊनि पांडुरंग । धरिला पुंडलिकाचा संग ।
तोचि शेषाचळीं श्रीरंग । भक्तांलागी रक्षिसी ॥१२७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP