श्री वेंकटेश्वर - पदे १८१ ते १९०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


१८१
असो, लवणाचा होताचि अंत । स्वर्गस्थ आनंदें बहुत ।
पुष्पवृष्टी करिती अतिशयें ॥
वीणा मृदंग घेऊन । सिद्ध तुंबरादि नारदमुनी ।
गाती नाचती उल्हासोनी । दैत्यसूदनाकारणें ॥
अहो, त्रिकोटिसंवत्सर । राज्यभ्रष्ट होते अमर ।
ते बालविष्णूच्या कृपें सुस्थिर । स्वपदीं बैसले देव ते ॥
म्हणूनी उत्साह भारी । देव करिती विरजावरी ॥
गीत नृत्य नाना  परी । ऊर्वश्यादि अप्सरांचे ॥

१८२
म्हणे,     ‘ वर माग, झालो प्रसन्न । तुज इच्छित देतो वरदान ।
हे अन्यथा नाही वचन । तू पूर्ण भक्त सत्य पै ॥
तू शंभुप्रसादेंकराने । जिंकिलेसि हे त्रिभुवन ।
मात्र तुझ्या बलासमान । दुजा नाही देखिला ॥
ऐकूनि विष्णुचे वाक्य सुंदर । लवण म्हणे, ‘माझे हे कलेवर ।
त्वां करावे पापरोगहर । सरोवरतीर्थरूपें ॥...
हे पुण्यक्षेत्र उत्तम । पापग्रस्तांशी औषध परम ।
विष्णुगया याचे नाम । ठेवूनि रहा जगत्पते ॥
तुझे दर्शन घेती जे भक्त । पूजन करिती विधियुक्त ।
त्यांच्या कामना पुरवाव्या इच्छित । हेचि मागणे देवराया ’ ।

१८३
तेथे सुंदर माधव । तैसा येथे व्यंकट देव ।

१८४
त्रिविक्रमवपुर्मेघश्यामल: कोमलाकृति: ।
श्रीवत्सवक्षा राजीववनमालाविभूषित: ॥

१८५
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शारंगधरा ॥ध्रु.॥
तव चरणांशी लक्ष्मी सुंदर ।
जय-विजयाचे युगुल मनोहर ।
अवतारांची तुझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ॥१॥

१८६
तुझे गीत गाते हे मंगल ।
अविरत निर्मळ गंगेचे जल ।
पिऊन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ॥२॥

१८७
शिखराभवती शुभ्र पाखरे ।
प्रदक्षिणा करतात तुला रे ।
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ॥३॥
पडतो मी, पण तू वरती धर ।
व्यथित असा मी, तू करुणाकर ।
हे करुणामय, तुझ्यात आहे पूर्ण दयेचा झरा ॥४॥

१८८
जय जय शारंगधरा भुवनसुंदरा इंदिरावरा हो ।
जगदाधारा, दयासागरा, अनादिपरमेश्वरा हो ॥ध्रु.॥
श्यामल, कोमल, भव्य, चतुर्भुज, रूप दिव्य तप कांती हो ।
मोहक मुख सुप्रसन्न बघता, सहज मनाची शांती हो ॥
सुरगण स्तविती तुजशि अनंता, ध्यानिं मनीं एकांतीं हो ।
प्रभुराया, तव अद्‍भुत माया पाडी सकलां भ्रांती हो ॥१॥

१८९
दुर्जनदंडनकारण धरिसी गदादि अयुधें करीं हो ।
शरण मी पायां, माधवतनया तारी भवसागरीं हो ॥३॥

१९०
काकड आरती लक्ष्मीरमणा गोविंदा ।
उठी शारंगधरा, प्रभो, वारी दुर्धर आपदा ॥ध्रु.॥
भावभक्तिचा पीळ भरुनी काकडा केला ।
प्रभातकालीं मंगलरूपा, ओवाळू तुजला ॥
संत, महंत, विरागि, भाविक जन आले द्वारीं ।
गर्जती जयजयकारें भगवन्‍ वासुदेव हरी ॥
सहस्रदीपें प्रभा फाकली, बाह्यांतरिं उजळी ।
विश्वाचे सौंदर्य विनटले श्रीहरिमुखकमळीं ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP