७१
चल सखये, वेंकटगिरिला । नवरात्राचे उत्सवाला ।
कन्यापथ रविने धरिला । ध्वज असेल आज उभरिला ॥
स्थापून गरुडस्तंभाला ॥ महाद्वाराजवळी केला ॥
आरंभ हा येथुन झाला । चल सखये, वेंकटगिरिला ॥१॥
७२
उपेक्षिल्या तुवां धरिल मजसीं आता, कोण हाता ? ।
तुजवाचून मजऐशा या पतिता, कुठे त्राता ? ॥
७३
आंखनमों वेंकटेशा, बस मोरे आंखनमों वेंकटेशा ॥ध्रु o॥
श्याम तनूपर सुंदर मुखडा, पंकज नैनन वैसा ॥१॥
वैजयंतीपर मोतनमाला, बिच मणि कौस्तुभ ऐसा ॥२॥
चतुर्भुज पीतांबरधारी, छातीपर श्रीवत्सा ॥३॥
कानन कुंडल मकराकृतिके, शिरपर किरीत खासा ॥४॥
चक्र शंख दो हाथ विराजे, वेंकटगिरिपर वासा ॥५॥
७४
दत्तचि हा वेंकटेश । केला शेषाद्रिवास ॥ध्रु.॥
योगियांचा योग साधि ।
करि दूर आधि-व्याधि ।
तोडि जो कालाचा पाश ॥१॥
योगमार्गिं कष्ट फार ।
नेयि त्यात पैलपार ।
दीप हा मार्गप्रकाश ॥२॥
ऐसा हा चिदुल्लास ।
धरि नाना स्वरूपांस ।
निश्चय वासुदेवास ॥३॥
७५
दीनदयाळा वेंकटरमणा, त्वरित येई सखया ।
आता तू त्वरित येइ सखया ।
दैन्यपतित मी, मजला उद्धरी,
दाखवुनी पायां ॥ध्रु.॥
७६
आज आम्ही डोळेभरी मूर्ति पाहिली ।
इच्छा पूरली ॥ध्रु.॥
धनश्यामवर्ण अंगीं पूर्ण शोभला ।
तडित् पीतवर्ण भव्यवसन नेसला ।
रत्नखचित स्वर्णमयी कांचि लगटली ॥१॥
कांतियुक्त वत्सचिन्ह हदयिं मिरवते ।
कंठशोभि कौस्तुभासि साम्य दाविते ।
पादलंबि वैजयंति माळ विकसली ॥२॥
शंख चक्र गदा पद्म रम्य हस्तकीं ।
किंचिदुच्च गंडशोभा सरळ नासिकीं ।
कनककुंडलंचि कांति कानिं फाकली ॥३॥
भाळिं पीतवर्ण गंध, तिलक सावळा ।
कोटिसूर्यकांती रत्नमुकुट घातला ।
शेषपर्वताग्रिं ( रमे ) वासुदेवमाउली ॥४॥
७७
जे का करिती नवसासी ।
पुरवी त्यांच्या कामितांसी ॥
शता अष्टोतर । अभंग कुसुमें ।
व्यंकटेश नामें । अर्पियेली ॥
७८
भग्नपृष्ठकटिग्रीवं स्तब्धदृष्टिरधोमुखम् ।
कष्टेन लिखितं ग्रंथं, यत्नेन परिपालयेत् ॥१॥
७९
शके १८२२, शार्वरी नाम संवत्सरे, चैत्र शुक्ल १,
मंदवार, रेवती नक्षत्रे, शुभदिने इदं पुस्तकं
लक्ष्मीपुरस्थेन दातार-इत्युपनामक-व्यंकटेशेन
लिखितम्... श्रीलक्ष्मीव्यंकटेशार्पणमस्तु ।
शुभं भवतु ॥
८०
शेषाद्रिमस्तकीं । सोडोनि वैकुंठ ।
करी आदिपीठ । देवराय ॥१॥
देवराय मोठा । भक्तांचा कैवारी ।
देई मुक्ति चारी । साधकासी ॥२॥
साधकासी सत्य । पावतसे देव ।
पाहोनी सदैव । भाव त्याचा ॥३॥
भाव त्याचा जैसा । अंतरीं स्थिरावे ।
तैसाचि तो पावे । मोक्षसुख ॥४॥
मोक्षसुखानंद । प्राप्तीच्या कारणें ।
श्रम कष्ट घेणें । नोहे साच ॥५॥