मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे २१ ते ३० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे २१ ते ३० Translation - भाषांतर २१जे जे इच्छा करील प्राणी । ते पूर्ण करील चक्रपाणी ।यालागी ग्रंथपठणीं । आळस सर्वथा न करावा ॥१४४॥देवीदास विनवी पुढतपुढतीं । ग्रंथ हा केवळ भागीरथी ।श्रवणस्नानें उत्तम गती । प्राणिमात्रास पै होईल ॥१४५॥२२जागृत फार विशेषा । धाव पाव व्यंकटेशा ॥श्याम चतुर्भुज पंकजनयना । प्रसन्नदर्शन मंगलवदना ॥पावन कीर्तिच्या सदना । संकटनाशक हषीकेशा ॥१॥प्रतापदर्पा विराट पुरुषा । सर्वोत्कर्षा तू अविनाशा ॥तोडिसि नाना आशापाशा । घेसि पूर्ण सकळ यशा ॥२॥अपार तुझा महिमा गोड । माझे मनिचे पुरवी कोड ।दुर्घट जन्ममरणमुळ तोड । देऊनि भावभजनलेशा ॥३॥जय जय गरुडध्वज गोविंदा । सद्गुरु केसरि उद्बोधा ॥शिवदिन-जीवन-परमानंदा । त्रिमळ नारायण ईशा ॥४॥२३देवा व्यंकटरमणा स्वामी, देवा, साक्षी अंतर्यामी ।दुर्घट संकत वारुनि भक्ता ठेविसी सुखधामीं ॥१॥लक्ष्मीचा भर्ता, तूचि पुरता कर्ता पतीतपावन नामी ।शास्त्रे, वेद, पुराणे थक्कित वर्णु काय गुण मी ॥२॥स्वरूपसुंदर देखुनि रतिपति लज्जित की सवदायी ।सगुण निर्गुण ध्यान कसे हे लक्षू गोविंदा, मी ॥३॥भावभक्तीचा डोल्हारा, तू डोलसि मज विश्रामी ।केशरि गंध रेखिला । शिवदिन वंदितो निष्कामी ॥४॥२४सुख आटावे, दु:ख दाटावे, देवा! त्वां भेटावे ।आणिक काही न मागे तुजला, बाह्यांतरिं भेटावे ॥१॥देवा व्यंकटरमणा रे, स्वामी! भवभयशमना रे ॥प्रमाण आज्ञाधारक तत्पदिं साष्टांगीं नमना रे ॥२॥हरि गोविंदा, पावन बिरुदा बोल न लवि कदा की ।विकल्प-दुर्जन-मर्दन तूझे तेज:पुंज गदा की ॥३॥अधोक्षजा रे, सुमनपुजा रे द्यावि मला गुरुवारीं ॥तिर्थप्रसादें निववी काया भक्तकाजकैवारी ॥४॥शिवदीनाचा हेत मनाचा तूची पुरता कर्ता ।दुर्घट संकत विघ्ने नाना केसरिरूपें हर्ता ॥५॥२५जय जय वेंकटेशा वेंकटेशा ।मम कुलदैवत, सुहद, परेशा ॥ध्रु.॥तव कृपाकटाक्षलेशा । नासी त्रिमिर भवदु:खपाशा ॥१॥त्रिभुवनापाळा सर्वाध्यक्षा । स्वभक्ता रक्षिसि शुद्ध पक्षा ॥२॥ध्यानीं मनीं पूर्ण आशा । डोळां पाहीन मी जगदीशा ॥३॥तव नामें दुर्बुद्धिभासा । नासुनि दत्ता प्रेमप्रकासा ॥४॥२६भाग्यें वेंकटेश देव देखिला हो ।तत्क्षणीं हदयपटीं रेखिला हो ॥ध्रु.॥भव्य मुकुट शिरिं, तिलक ललाटीं ।वदनें चंद्र तुच्छ लेखिला हो ॥१॥मानस-षट्पदें तत्पदकंजीं ।चिन्मकरंद-बिंदू चाखिला हो ॥२॥अभयंकर करें संसृतिडोहीं ।जेणें रामतनय राखिला हो ॥३॥२७चला वेंकटेश पाहू । मन त्याचे पायीं वाहू ॥ध्रु.॥परम सुखास्पद दर्शन ज्याचे । जन्मल्याचे फळ पाहूं ॥१॥वैकुंठाहुनि देवशिखामणी । आला त्याचे गुण गाऊं ॥२॥दिव्य अनंताकृतिनगवासी । होऊ, प्रसादहि सेवू ॥३॥२८भज भावें वेंकटराज रे ॥ध्रु.॥देव दयानिधि हाचि रमावर ।भजकांचे करि काज रे ॥१॥पूर्ण परात्पर शेषशयन हा ।थोर नाटकी महाराज रे ॥२॥रामसुतप्रभु जडापहारक ।ज्यासि वंदि सुरराज रे ॥३॥२९त्रिभुवनेश्वर त्रिमलनायका । विनवि त्रिंबक तें गुज आयका ॥त्रिविधताप-निवारणचंदना । त्वरित तोडि गुणत्रयबंधना ॥१॥मुख कसें तरि दाखविसीं जगीं । चरणिंची बिरुदावलि ते बगी ।सबळ म्यां तुज आणियलें उणें । पतितपावन तूं कवण्या गुणें ॥२॥तम विलोकुनि सूर्य जिवें पळे । द्विरद देखुनि सिंह भयें सळे ॥शलभ पक्षिबळें वणवा विझे । कवण मूर्ख तुझ्या बिरुदा रिझे ॥३॥३०बहुत उद्धरिले निजदास गे । मज झणी करिशील उदास गे ।गिरिवरील महोत्सव येकदा । जिवलगे, मज दाविसि गे कदा? ॥४॥जधिं पडेल तुज अनुकूल गे । मज तधी मग धाडिसि मूळ गे ।तरि तुझ्या घरिं काय असे उणें । विसर हा पडला कवण्या गुणें ॥५॥बहुत खंति तुझी मज वाटते । कठिण दूर दिगंतर वाटते ।पतितपावन नाम तु आठवी । गरुडवाहन सत्वर आठवी ॥६॥गिरिवरील महोत्सव दाखवी । चरणतीर्थ मनोहर चाखवी ।जननिये, अपराध तु नाठवी । उदरवाढ करूनिहि साठवी ॥७॥अति अमंगळ बालक घाण तें । जननिला चरणद्बय हाणतें ।परि तयावर ती बहु माउली । शिरिं करीं तळहातिची साउली ॥८॥निसुर सांडिन कोकरू श्रीधरा विसरसी झणी मध्वमुनीश्वरा ।लिखित म्यां लिहिलें अपुल्या करीं । उचित होईल जें तुज तें करी ॥९॥ N/A References : N/A Last Updated : March 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP