मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे ९१ ते १०० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे ९१ ते १०० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे ९१ ते १०० Translation - भाषांतर ९१भज सुरेश, व्यंकटेश, श्रीश, शेषतल्पका ।नाश करी त्रिविध ताप, सुखवि स्वनत भाविका ॥ध्रु.॥व्यंकटेशवास गिरीं, जाय तेथ नमन करी ।गाय गाय नाम नरा, त्वरित हरिल पातकां ॥१॥सेव सुरवरादिसुरा, हेतु स्वजनपूर्णकां ।साक्षता कलींत नाथ प्रणत-मोक्षदायका ॥२॥९२पहा पहा बहुकाळ यातना । भोग भोगुनि विटलो मना ।सांप्रत दृढ धरिले चरणां । प्रात:काळीं या हेतू ॥५॥९३जय देव जय देव शेषाचलवासी ।आरती ओवाळु तुमचे चरणांसी ॥९४मम मानस सुखकर्ता, हर्ता दुष्टांचा ।सुलभ भक्तालागी, शास्ता नष्टांचा ॥भयमोचक स्वामी, पालक विश्वाचा ।पांडवपालक, इंद्रियचालक, बाळक नंदाचा ॥९५पंचफणा शिखरीं देव श्रीहरी ।सन्मुख हनुमंत उभा असे द्वारीं ॥गरुड सेवा करी चरणीं निरंतरीं ।कोटितीर्थ जाण त्रिमलगिरीवरी ॥१॥जय देव जय देव जय व्यंकटरमणा ।आरती ओवाळू, तुजविण उद्धर ना ॥ध्रु.॥९६जय विजय दोन्ही द्वारपाल द्बारीं ।देव एक म्हणूनी दाखवितो परी ( ? ) ॥चतुर्भुज मंगलमूर्ती दिसती साजिरी ।वैकुंठीचा राजा सखा श्रीहरी ॥२॥९७देखिली मंगलमूर्ती, बरवा उत्साह ।प्रसन्न झाला तिमया देवाधिदेव ॥विप्र कोटि चरणीं मागतसे ठाव ।तयाला प्रसन्न त्रिमलगिरिराव ॥३॥९८अपांपतिसुतापते गिरिनिवासिया ईश्वरा ।अगा भुवनसुंदरा अघहरा कृपासागरा ॥तुझ्याविण रिता नसे मुळिच ठाव या भूवरी ।नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥१॥अलास जगतीतलावरि पतीत तारावया ।असे असुन ये स्थलीं तुज न ये दिनाची दया ॥सदैव धरिसी कसे धनहिनास देवा दुरी ।नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥२॥९९जगत्त्र तुझे शिशू असुनि माय त्या तू खरी ।तुझ्याविण कृपा वदे, करिल कोण बाळावरी ? ॥त्यजून शिशुला कधी जननि ती न राहे दुरी ।नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥३॥धनाढय अवघे अधी करुनिया जगा ठेवणे ।अल्यास मग वंदण्या धन सुखें तया मागणे ॥दिसेल तरि ही कृती तव जगास देवा, बरी ।नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥४॥१००उदारपण आपुले गिरिवरी तुवां सोडिले ।सराफपण, जे नसे उचित, ते वृथा घेतले ॥ब्रिदास अपुल्या नको कमिपणा अणूं यापरी ।नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥५॥पदांवरि तुझ्या तुझी मुळि न मालकी राहिली ।असे असुन ती अम्हां गिरिस पारखी जाहली ॥कधी परत घेति का सुजन ते दिलेले तरी ? ।नमो प्रणतवत्सला तुजसि व्यंकटेशा हरी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : March 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP