मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय ४८ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय ४८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत शुक्रशिष्यसुबोधसंवादः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । ॐकार वेद मुख्यांचे वचन ऐकून । मुदित झाले नाग ऋषिगण । तैसेचि सर्व देवगण । प्रणाम करुन पूजिती त्यांसी ॥१॥आपुलें मत त्यागून । ॐकारादीस म्हणती कर जोडून । आपण सांगितलें जें वचन । तें सर्व मान्य ब्रह्मयप्रभूद ॥२॥वेद सर्वांचें गुरु ख्यात । त्यांनी सांगितलें तें करणें उचित । तेंच गतिप्रद सर्वसंमत । वेदाधारविहीन त्याज्य ॥३॥जो वेदवचन न मानित । त्यासम आचरण न करित । तो नरकलोकीं जात । यातना भोगी बहु तेथे ॥४॥आतां तुम्ही समस्त । देवनायक मुनि जनसंघासहित । ब्रह्मयज्ञाच्या पार निश्चित । जाणार निश्चित हें असे ॥५॥देवही ऐसे बोलती । महाभाग ते वेद मुख्यांस स्तविती । तेव्हां ते हर्षित होती । ओंकारसहित चार वेद ॥६॥महाभाग देव त्यांसी पूजिती । नंतर वेद ओंकारासह अंतर्धान पावती । आपापल्या स्थानीं परतती । ब्रह्मयज्ञ पूर्ण करिती सारे ॥७॥ ऐशापरी हे साधो होत । ब्रह्मयज्ञाची पूर्तीं पुनीत । संशय सोडून सारे भजत । ते सारे गणनायकासी ॥८॥हें सारें योगशांतिप्रद । रहस्य कथिलें तुज सुखद । सर्वमान्य मुक्तिप्रद । आतां तूही भज गणनायकासी ॥९॥सुबोध कथा पुढती सांगता । ऐसे सांगून शुक्राचार्य अंतर्हित । झाले परी प्रल्हाद भक्तियुक्त । भजे तया गणनाया कासी ॥१०॥मातेच्या उदरांत ऐकलें । जें रहस्य मी गर्भरुपीं चिंतिलें । विशेषानें जतन केलें । तेंच मज योगदायक ॥११॥सर्व पुण्याच्या बळें स्मृती । माझी या जन्मी होती । जागृती हयास्तव मी जन्मापासून चित्तीं । भजतों तया गणनायका ॥१२॥गुरुदेवांनो मी सांगितलें । आपल्या प्रश्नाचें उत्तर भलें । जें जें मज आठवलें । शिकवूं नका मज मोहविद्या ॥१३॥श्रीकृष्ण म्हणती सुबोधाचें वचन । ऐकून हर्षयुक्त विप्रजन । म्हणती त्यासी भावज्ञ । भावसिद्धीस्तव ऐसें ॥१४॥सुबोधा जें तूं कथिलेस । तें अन्यथा न वाटे चित्तास । परी तूं वत्सा ऐकविलेंस । हितकारक वचन उत्तम ॥१५॥तुझे पितामह महाभाग । दुर्बुद्धी ते महासुर मुभग । त्यांसी गणेश हस्ते मृत्युयोग । ओढवला भूतकाळी ॥१६॥गणेशानें देवपक्ष घेऊन । केलें त्याचें तदा हनन । म्हणून पितृवत्सल तव जनक महान । द्वेष करी गणेशाचा ॥१७॥जो तुझ्या पित्याचा द्रोही । त्यासी त्यागावें तूही प्रत्यही । नाही तरी ठार मारील पाही । पिता तुजसी निःसंशय ॥१८॥महामते म्हणोनि दुराग्रह । करुं नको तूं ऐसा निग्रह । असुर कुळांत हिताकह । जन्म झाला तुझा असे ॥१९॥तरी तूं आपुले कुळाचार । पालन करी बुद्धिपुरसर । हे त्यांचें ऐकून उद्गार । सुबोध बहु क्रुद्ध झाला ॥२०॥त्याचे नयन रक्त झाले । तो त्वेषानें द्विजांसी बोले । धर्मसंयुत । जें वचन असलें । अशक्य त्या बाल्यांत ॥२१॥म्हणे सर्वत्र गणेश वसत । योगरुपें द्विजांनो जगांत । स्वस्वधर्माचा नियंता असत । नाना क्रीडापरायण ॥२२॥स्वर्गांत देव पृथ्वीवरी नर । पाताळांत स्थापिले त्यानें असुर । आपापल्या मार्गांत रहावें स्थिर । हितेच्छूंनी सर्वदा ॥२३॥माझ्या पितामहें राज्य केले । त्रैलोक्याचें जरी तें झालें । धर्महीनतेनें दूषण असले । म्हणोनि वधिले गणेशें तया ॥२४॥तैसाचि माझा पिता जगांत । धर्म सोडून वागत । त्यासही मारील त्वरित । गणेश यांत संशय नसे ॥२५॥आतां सांग मजप्रत । गणराजें काय केलें विपरीत । स्वधर्म त्यासी प्रिय बहुत । सर्वांचा हितकर्ता तो ॥२६॥विघ्नराज तो संशयातीत । त्यांसीच मी भजेन निश्चित । वडिलांसही त्यागीन जगांत । दुष्टवृत्ती जे असती ॥२७॥जरी मज गणेशभजनीं रता । मारील तो तें तत्त्वता । ब्रह्मप्रद होईल मरण सर्वथा । आपण चिंता करुं नका ॥२८॥माशांचा त्रास बहु होत । तैसेचि डास घोंघावत । म्हणोनी कोणी का घर त्यागित । सांग पंडित विप्रांनो ॥२९॥बुद्धिपति गणेशाची सत्ता । सर्वत्र चालते ही महत्ता । त्या सिद्धिपतीची हानि तत्त्वता । काय करील माझा पिता? ॥३०॥गणेशभजन हाच स्वधर्म । सर्वं भूतांस पुरुषार्थप्रद अनुपम । ब्रह्मलाभार्थ मनोरम । तोचि तुम्हीं आचरावा ॥३१॥आपण ब्राह्मण न राहिलात । विषयपरायण तुम्ही समस्त । धर्म सोडून वास केलात । दैत्याधीन येथ होऊनियां ॥३२॥जे गणेशाच्या भजनीं आसक्त । ब्रह्मपरायण पुनीत । तेच ब्राह्मण सत्यार्थे जगांत । काय बालिश अन्य सांगता ॥३३॥शुक्रशिष्यांस ऐसें सांगून । सुबोध करी गणेशाचें भजन । एकनिष्ठ त्याचें मन । तत्पर गणेशभक्तींत तो ॥३४॥नमन गणेशासी महात्म्यासी । परेशासी परात्परासी । अनादिमध्यांतमासी ।ढुंढें तुजसी नमस्कार ॥३५॥विघ्नपते तुज वंदन । सुशांतिप्रदा तुज नमन । ऐसा विवाद घाली म्हणून । भयभीत झाले असुरगण ॥३६॥ते शुक्राचार्यांचे शिष्य चित्तांत । जाहले बहुत चिंतायुक्त । ज्ञानारीस सांगण्या जात । राजपुत्राचा हा वृत्तान्त ॥३७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते शुक्रशिष्यसुबोधसंवादो नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP