मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय २४ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय २४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मुचुकुन्दचरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । नरनारायण कथा पुढें सांगत । पुरुकुत्साचें दायाद असत । महाबळी अंबरीष एक ख्यात । दुसरा मुचुकुंद नावाचा ॥१॥अंबरीष राज्य करुन । अंती पुत्रासी राज्य देऊन । सुविपुल तप आचरुन । गणेशसायुज्य लाभला ॥२॥मुचुकुंद राजर्षि राज्य करित । धर्मयुक्त महातेजयुक्त । शक्रतुल्य पराक्रमें असत । देवांसही आधार त्याचा ॥३॥एकदा देवदैत्यांचे युद्ध होत । दैत्य देवांसी जिंकत । मुचुकुंदासी तेव्हां शरण जात । देव सर्वही परमादरें ॥४॥त्यांची प्रार्थना ऐकून । मुचुकुंद गेला धावून । शस्त्रबळें करी हनन । महादैत्यांचें त्या वेळीं ॥५॥युद्धप्रसंगीं काल बहुत । जाता युगातिक्रमण होत । युगभेद पाहून देवांस म्हणत । आद्य ज्ञान द्या मजप्रतीं ॥६॥नंतर ते देव परमभावित । मुचुकुंदासी सांगत । आता पर्वतद्रोणींत । निद्रा घ्यावी आपण ॥७॥नृपा तुज जो उठवील । त्याचें मरण ओढवेल । तेथ तुजला होईल । वासुदेवाचे दर्शन ॥८॥तो महायोगी नृपात्तमा देईल । ज्ञान श्रेष्ठ तुज विमल । ते ऐकून वाक्य अमल । गंधमादनावरी गेला ॥९॥तेथ एका द्रोणींत । निजला मुचुकुंद आनंदांत । बहु काळ ऐसा लोटत । विष्णु तें जाहला वसुदेवसुत ॥१०॥विष्णु साक्षात महायोगी अवतरला । तपानें त्यास आराधिला । महावीर कंसासी मारुन राहिला । मथुरेंत वासुदेव॥११॥कंसाचा श्वशुर अत्यंत । तेव्हां झाला झाल क्रोधयुक्त । जरासंध नामा तेथ येत । सैन्यासहित युद्धार्थ ॥१२॥शाल्वकादी नृपांसहित । तेवीस अक्षौहिणी सेनेसहित । आला चालून मथुरेप्रत । कृष्णें त्याचें मर्दन केलें ॥१३॥संकर्षणासमवेत । श्रीकृष्ण महातेजयुक्त । जेव्हां त्याचा नाश करित । तेव्हां जरासंध माघार घेई ॥१४॥पळून गेला स्वस्थानांत । सैन्यासह झाला पराजित । सतरा वेळा पुन्हा येत । लढण्या परी यश न मिळालें ॥१५॥तेव्हां त्यानें यवनाधिपती । दुष्ट कालयवनाची प्रीति । सहाय मागून लढण्या पुढती । आला चालून मथुरेवरीं ॥१६॥गर्गशापें यादव विनाश ओढवला । यवनराज त्यापरी आला । तें जाणून त्या समयाला । समुद्रात निर्मिली द्वारका ॥१७॥आपुल्या मायेनें निर्मिली । ऐसी ती नगरी भली । यादवांची तेथ केली । पाठवणी श्रीकृष्णानें ॥१८॥नंतर यवनराजासमीप येत येत । आपुलें रुप तया दाखवित । वासुदेव पलायन करित । तेव्हां मथुरा नगरींतून ॥१९॥नारदानें कृष्णाची चिन्हें सांगितली । यवनेंद्रे संधि साधली । कृष्णाची पाठ धरिली । निर्भत्सना करुं लागे ॥२०॥अरे कृष्णा महात्मा धावसी । यदुवंशाला लांछन लाविसी । तूं जरी काळासम अससी । तरी कां भ्यालास मजलागीं ॥२१॥तेव्हां कृष्ण पुढे धावत । मागून कालयवन त्वेषयुक्त । मुचुकुंद जेथ झोपला निश्चिंत । त्या गुहेंत कृष्ण प्रवेशला ॥२२॥तेथ कृष्ण राहिला शांत । परी यवनेंद्र मुचुकुंदा लाथ मारित । म्हणे निर्लज्जा येथ का निद्रित । करी युद्ध माझ्यासवें ॥२३॥मुचुकुंदाची निद्रा भंगत । यवनाच्या वचनें जाग येत । तो प्रतापवंत नृप उघडित । नयन आपुले क्रोधानें ॥२४॥त्याच्या नेत्रांतून उद्भवत । अग्नी तो यवनासी जाळित । काळयवन मेला तें पाहत । जनार्दन आनंदानें ॥२५॥तदनंतर त्या नृपासमीप जात । हर्षनिर्भर त्याचें चित्त । त्यास पाहून प्रणाम करित । मुचुकुंद भक्तिभावें ॥२६॥योगीश्वरासी कृष्णासी म्हणत । जैसे देवांनी कथिलें असत । तैसेंचि घडलें अकस्मात । आपुली भेत जाहली ॥२७॥आता ज्ञान मार्ग सांगावा । कृपानिधे मजला बरवा । जेणें मजला बोध व्हावा । प्रार्थना माझी ही विनमर ॥२८॥हें ऐकून हर्षसमन्वित । परमयोगी कृष्ण सांगत । त्या महाभागासी ज्ञान अद्भुत । अपूर्व गणेश अभेदाचें ॥२९॥मी महामते गणेश्वर असत । पूर्णत्वें कांहीं भेद नसत । हेंच परम ज्ञान चित्तांत । ठसवावें तूं नृपोत्तमा ॥३०॥पंचविध चित्ताचा त्याग करुन । त्याचें मोहप्रद ऐश्वर्य सोडून । योगसाहाय्यें आचरुन । गणेशत्व पावशील ॥३१॥चित्तरुपा महाबुद्धि असत । ती मोहरुपा जगांत । तैसीच सिद्धि या माया वर्तत । तेथ बिंब जें स्थित ॥३२॥तोच हा गणनाथ असत । हे योगसेवेनें पहावें सतत । बिंबभव भरम त्यागून चित्तांत । चिंतामणीचें दर्शन घे ॥३३॥गकारात्मक रुपा सिद्धि जाण । णकाररुपा बुद्धि सुजाण । त्यांचा स्वामी गणेश्वर ही खूण । त्यास भजावें महाभागा ॥३४॥तेणें शांतिलाभ होईल । ऐसें हे गुह्यतम ज्ञान निर्मल । नृपसत्तमा तुज अमल । क्रथिलें परम दुर्लभ जें ॥३५॥ऐसा उपदेश ऐकत । नंतर कृष्णाची पूजा करित । पुनरपि कृष्ण मथुरेंत । परतून गेला प्रतापी ॥३६॥तेथ यवनांसी मारित । बलराम समवेत अगणित । जरासंध येता पळून जात । द्वारकेंत तो श्रीकृष्ण ॥३७॥तदनंतर पृथ्वीतलावर । मुचुकुंद झाला योगपर । जैसा कृष्णें कथिला समग्र । तैसा त्याग आचरिला ॥३८॥त्या राजर्षीस शांति लाभत । पुढे तो विविध स्थळीं भटकत । गणेशाची भजे अविरत । प्राणत्यागगापर्यंत ॥३९॥मुचुकुंदाचें हें चरित । जो मर्त्य वाचित अथवा ऐकत । त्यास गणप प्रभु सर्व देत । यात संशय कांहीं नसे ॥४०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते मुचुकुंदचरितं नाम चतुर्विशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP