|
वि. ( नंदभाषा ) पंधरा . तळी भुर .... ला ( रुपयांस ) चार चिरड्या घेतल्या . [ ? ] स्त्री. १ एका गावाने दुसर्या गांवाची आकसाने सूडबुद्धीने केलेली लुटालूट , मारहाण , जाळपोळ इ० शाबीत , वसूल करुन घेण्यासाठी गांवकर्यांनी केलेला हल्ला . [ का . तळिपु = कुटणे , मारणे ] स्त्री. ( गो . राजा . ) लहान तळे . [ तळे ] स्त्री. १ जाते , घरट इ० कांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक ; याअर्थी खालची तळी , वरची तळी असे प्रयोग करतात . २ घरटांतील पीठ ज्याच्यावर पडते तो घरटाखालचा सपाट दगड , लांकडाची फळी , काथवट . ३ एका ताम्हनांत भंडार , कुंकू , विडास , नारळ इ० ठेवून तीन अथवा त्यापेक्षा अधिक खंडोबाचे भक्त ते ताम्हन कपाळास लावतात व खंडोबाचे येळकोट असे म्हणतात तो प्रकार ( क्रि० उचलणे ; भरणे ). धेंडा नाचविलीया वरी । तळी आणिली बाहेरी । फळी पुष्पी अति साजिरी । ज्ञानदीपे जोज्वळ । - एरुस्व १७ . ३१ . ४ ( ब्राह्मणेतरांत रुढ ) नवरात्र्याच्या दिवसांत नवपरिणीत वराकडील लोक ताटांत साडी , चोळी , हळदकुंकू , फराळाचे पदार्थ इ० ठेवून नवपरिणीत वधूकडे पाठवितात ती . ( क्रि० नेणे , पाठविणे ). ५ चिखल , घाणपाणी इ० आंत जाऊ नये म्हणून विहीरीच्या तोंडासभोवती केलेली वर्तुलाकार फरसबंदी , चुनेगच्ची . ६ फुले , भस्म इ० नी युक्त असलेले गुरवाच्या भिक्षेचे ताम्हन . ७ विहीर बांधून काढताना बांधकाम उभारण्यासाठी खाली विहिरीत बसविलेले लांकडी चौकट . ८ . ( गो . ) गणपतीची मूर्ति आणतेवेळी नारळ , तांदूळ इ० कांची मूर्तिकारास दिलेली भेट . [ तळ ] ( वाप्र . ) ( एखाद्या कार्याची ) तळी उचलणे , भरणे - ( ल . ) ते कार्य करण्यास सर्वांनी हातभार लावणे ; सर्वांनी मिळून एकजुटीने एखादे कार्य सिद्धीस नेणे . ( ल . ) सर्वांनी कट करुन ( एखाद्यास ) हांकून लावणे , पदच्युत करणे . कशी उचलली तळी मिळाले ते बाराभाई । - ऐपो ४११ . तळी - तळीराम गार करणे - आपणांस इष्ट ते साध्य करुन स्वस्थ बसणे ; उपभोग्य वस्तूचा उपभोग घेऊन स्वतःची इच्छा तृप्त करुन स्वस्थ बसणे ; ढेंकर देणे . ०आवारु वि. ( नंदभाषा ) सतरा . ह्या सातक्याची किंमत तळी आवारु रुपये आहे . [ ( नंदभाषा ) तळी = पंधरा + आवारु = दोन ] ०गार पु. वरील अर्था़च्या तळीत भाग घेणारा मनुष्य . ०उधानू वि. ( नंदभाषा ) अठरा . [ नंदभाषा तळी = पंधरा उधानू = तीन ]
|