Dictionaries | References

ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी

   
Script: Devanagari

ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी

   एकदां रानात एक शिकारी शिकार करण्यास गेला असतां त्‍याने एक सशास पकडले. इतक्‍यात दुसरा एक मनुष्‍य तेथे येऊन तो ससा बळकावून आपली शिकार आहे असे सांगू लागला. याप्रमाणें त्‍यांचा तंटा चालला असतां ते शेवटी न्यायाधिशाकडे निकाल मागण्याकरितां गेले. न्यायाधिशाने त्‍यांचे दोघांचे म्‍हणणे ऐकून घेऊन असा निर्णय दिला की, ज्‍याच्या हातांत ससा आहे त्‍याचीच ती शिकार मानावी. दुसर्‍याच्या कृत्‍याचा आपणास फायदा घेणार्‍याबद्दल म्‍हटले जाते. -शाब २.२८१. possession is eleven points of the law, and they say there are but twelve.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP