|
पु. १ ( वारा , पाणी , गवताच्या काडया ; धूळ इ० कांची ) गिरक्या , घिरटया , वळणें घेत जाण्याची स्थिति ; गरगरां फिरणें ; भ्रमण करणें . २ ( कामें , हिशेब , वस्तु इ० कांचा ) गोंधळ ; अस्ताव्यस्त स्थिति ; गळहाटा ; गुंतागुंत ; गोलंकार ; खिचडी . त्या पोरानें पोथीचा घोंटाळा करून टाकला . ३ ( मनाची ) गोंधळून , बावरून , दिडमूढ होऊन गेलेली अवस्था ; मनाचा गोंधळ . ४ नागमोडीची , वेडीवांकडी जागा , स्थल ; गुंतागुंतीचें काम . ५ ( वार्यानें ) दिशा , रोंख बदलणें ; घोंटाळणें . वार्याच्या घोटाळयांत सांपडून तें गलबत बुडूं लागलें . ६ एकंकार ; गोलंकार . [ घोटाळणें ]
|