|
पु. गिरकांडा ; फेक ( दगड , वारा , पाणी यांची ); चक्कर ; गिरकी ; भोंवडा ( मुलानीं अंगाभोवतीं घेतलेला ). ( क्रि० देणें ; खाणें ). तिरमिरी ; भिरभिरी ( राग इ० विकारांनीं आलेली ). ( क्रि० येणें ). निष्फळ येरझार ; फेरा ; गरका . ( क्रि० मारणें ; देणें ; पाडणें ; घेणें ; खाणें ; पडणें ). लहानशी फेरी ; थोडें फिरुन येणें . तूं एथेंच बैस मी भिरकंडा मारुन येतों . ( ल . ) घोंटाळा ; अडचण ; फेरा . झोंक ; झोकांडी . ( क्रि० जाणें ). चिंधडी ; धांधोटी . ( विरु . भिरकांडा ) फरकंड ; फरपट ( फरफटविलेलें कांटेरी झुडुप , मृत पशु , जड लांकूड , साप यांची ) ( ओरबडल्यामुळें उठलेला ) अंगावरील ओरखडा ; बिरखडा ; भरकटा . [ ध्व . भिर ! ] भिरकंड्यात पडणें - घोंटाळणें ; गोंधळणें . भिरकंड्या उडविणें - ( ल . ) गोंधळवणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें ; कोटिक्रमानें निंदेनें जेर करणें . भिरकंडी , भिरकांडी - स्त्री . भेलकंडा ; भेलकंडी ; झोक ; झोकांडी . ( क्रि० जाणें ). निष्कारण , निष्फळ , इकडेतिकडे हिंडणें . ( क्रि० मारणें ; खाणें ). भ्रमण ( भोवरा , धंद्यांतील कोल्हांट्या यांचें ). ( क्रि० घेणें ; मारणें ). रागाचा झटका ; भिरभिरी ; तिरमिरी . भिरकणें - सक्रि . प्रायः भिरकावणें . भिरका - पु . भिरकंडा ( दगड इ० चा ); भिरका व भराका पहा . या शब्दाशीं भिरका शब्द समानार्थक आहे ; तथापि याचा प्रचार कमी आहे . भिरकांडणें - सक्रि . भोंवडणें ; भिरकावणें ; गोफणीनें फेकणें ( दगड इ० ). ( ल . ) जोरानें हांकणें ( गाडी इ० ). भिरकांडा , डी - भिरकंडा व भिरकंडी पहा . भिरकांडें - न . तिरमिरी ; भिरभिरी ; रागाच्या झटक्यानें आलेली चक्कर ; डोळे फिरणें . गोंधळ ; कामाचा गरगरा , घायकूत . तगाददारांची निकड आणि कटकट . भिरकाविणें , भिरकावणें - सक्रि . गोफणीनें भोंवडणें आणि झोकणें . झुगारणें ; फेकणें ; झोकणें ; भिरकांडणें . मग प्रेत त्याचें भोवंडून । रागें दिधलें भिरकावून । तिरस्कारानें , बेपर्वाईनें देणें ; एखाद्याकडे झोकणें , फेकणें , टाकणें . भिरकुटी - स्त्री . भरकटा ; लिहिण्यांतील लपेटी . ( क्रि० काढणें ; ओढणें ). भिरकें - न . एक किंवा दोन माणसें बसण्याजोगी बैलांची , घोड्यांची गाडी . हिला साटी नसते ; आंसावर दोन - एक फळ्या टाकतात व घोड्यावर बसतात त्याप्रमाणें बसतात . झीट ; चक्कर ; तिरमिरी ; भिरभिरी . भूतबाधा . भिरगोरें - न . भिरभिरें . गिरकी खाणें . ( ल . ) गांजणूक ; ओढाताण ( तगाददार , मूल इ० कडून ); ( क्रि० लावणें , मांडणें , देणें , आणणें ). तोडतोडून खाल्ल्याची , घोटाळ्यांत पडल्याची स्थिति . ( क्रि० होणें ). भिरड , भिरंड - स्त्री . तिरमिरी ; रागाचा आवेश . ( क्रि० येणें ). भिरडी - स्त्री . तिरिमिरी . खरडपट्टी ; निर्भर्त्सना . ( क्रि० काढणें , उडविणें , करणें ).
|