पु. ( क्क . ) गोंधळ ; गुंतागुंत ; घोंटाळा . घोळ अर्थ ३ , ४ , ५ . पहा .
पु. - हरभर्याचा हुळा ; ज्वारीचा हुरडा इ० जो हातावर चोळून मीठ घालून खातात तो . हुरडा ओंब्या घोळाणा । तिळगुळेंसि चाखविलें सुजाणा । - एभा . ३१ . ४०१.
- ( व . ना . ) कडू निंबाचीं कोवळीं पानें , चिंच , बिबे इ० कांचें मिश्रण करून त्याला फोडणी देऊन तयार केलेला पदार्थ . हा आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीस - बदलत्या ऋतुमानाचा शरीरावर होणारा परिणाम टाळण्यासाठीं - खातात . [ घोळणें ? ]
पु. घोळणा पहा .
पु. ( व . ) कच्ची पालेभाजी कुसकरून तिखट , मीठ , तेल वगैरे घालून केलेला खाद्यपदार्थ ; घोळणा . [ घोळणें ]
पु. नाकपुडयांमधील पडद्याचा मांसल भाग ; गुणगुणा ; घोळणा ; घोणा पहा . [ सं . घोणा = नाक ]
०फुटणें नाकांतून ( उन्हामुळें , उष्णतेमुळें ) रक्त वाहूं लागणें .