Dictionaries | References

लोळ

   
Script: Devanagari

लोळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

A term for a squat, thickset, and roundbellied child; also for any overgrown or enormously big animal, esp. among the smaller animals; as काय हो घुशीचा लोळ सांपडला पिंजऱ्यांत; काय मुंगुसाचा लोळ चालला; मांजरीनें उंदिराचा लोळ धरला; also for a monstrous and misshapen bale, pack, or mass indefinitely; as निजून लोळ पडणें or पसरणें To lie along as a huge log, or spread abroad as a washerman's pack. In this sense पांघरूणाचा लोळ, कामाचा लोळ &c.

लोळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Rolling over and over. A glowing fire.

लोळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अगडबंब माणूस, घूस, उंदीर इत्यादी मोठ्या आकाराचा प्राणी   Ex. धान्यघरात मोठमोठे उंदराचे लोळ फिरत होते

लोळ     

 पु. आगीचा झोत ; जोराने पेटलेला आगीचा कल्लोळ ; सवेग असा आगीचा डोंब ; अग्नीच्या ज्वाळांचा भडका ; गर्जत येणारी अग्नीची ज्वाला .
 पु. लोळण्याची क्रिया ; लोळणे . दुःखातिशयाने गडबडां लोळणे ( या अर्थी रडण्याचा किंवा रडून लोळ घालणे किंवा घेणे असा शब्द - प्रयोग करतात . )
( ल . ) ( ताप , लोकांचा उपद्रव इ० मुळे ) एखाद्याची झालेली दुरवस्था किंवा पीडितपणाची स्थिति ; थकवा ; अति श्रांत स्थिति ; भागोटा . पोराने किंवा तापाने माझ्या जिवाचा लोळ केला .
( मुंग्या , माशा इ० चा ) दाट थवा , समुदाय , गोंगाट .
( लोथ - ध च्या ऐवजी असण्याचा संभव ) लठ्ठ पोटाचे पोर ; अगडबंब माणूस , घूस , उंदीर इ० मोठा प्राणी ; धूड . काय हो घुशीचा लोळ सांपडला पिंजर्‍यात .
( व . ) जळमट .
अव्यवस्थितपणे बांधलेला गट्टा ; अव्यवस्थित पदार्थ , चिरगुटे , पोथ्या इ० ची रास ढीग .
काम , कारभार , कारखाना इ० चा पसारा ; व्याप .
चाळा ; वेडेवांकडे कृत्य , वागणूक . वदवती न कवीसहि लोळ ते । - वामन , भामाविलास ( नवनीत पृ . ९९ ). [ लोळणे ] निजून लोळ पडणे - पसरणे - एखाद्या मोठ्या ओंड्यासारखे किंवा धोब्याच्या कपड्यांच्या पसार्‍याप्रमाणे - गाठोड्याप्रमाणे पसरणे - पडून असणे . ( या अर्थी पांघरुणाचा लोळ कामाचा लोळ इ० ).
०आकांत  पु. मोठमोठ्याने ओरडणे ; प्रचंड व भयंकर गर्जना ; आक्रोश . ( क्रि० करणे ; मांडणे ; लावणे ; चालविणे ; उठणे ; होणे ).
जोराचा प्रयत्न ; धडपड ; अविरत श्रम .
आरडाओरड ; क्षोम ; एखाद्या गोष्टीविषयींचीए सार्वत्रिक तक्रार ; पटकी ; पाऊस , दरवडेखोर , माहागाईची धारण इ० मुळे उत्पन्न झालेली परिस्थिति . पेंढार्‍यांचा - जरीमरीचा - पावसाचा - पाण्याचा - धारणीचा - माहागाईचा - लोळ - आकांत . [ म . लोळणे + आकांत ] कंड लोळकण - स्त्री .
लोळण ; जमिनीवर गडबडं लोळणे ( विशेषतः जरुरीचे काम असतां किंवा जबरदस्तीचा प्रतिकार करतांना ); एखादा जबरदस्त मनुष्य दुसर्‍याला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून नेत असतां त्याने पडणे , लोळणे , धडपडणे इ० त्याच्या सर्व क्रिया .
एख्याद्याचे मन वळविण्याकरितां त्याच्यापुढे लोळण घेणे ; लोटांगण घालणे . ( क्रि० घेणे ; मारणे ). रांडांच्या पायी लोळकंड घेणारा बुढ्ढा मूर्ख . - नारुकु ३ . ४२ .
कुत्री , मांजरे इ० चे बागडतांना एकमेकांवर उड्या मारणे , एकमेकांच्या अंगावर लोळण घेणे .
०घोळ  पु. 
( कागद , चिरगुटे , खाद्यपदार्थ इ० ची ) कालवाकालव ; डिवचाडिवच ; कुसकरणी ; चुरडणे ; घोटाळा ; मिश्रण .
हिशेब , जमाखर्च , कारभार इ० ची अव्यवस्था ; घोंटाळा ; गुंतागुंत ; गोंधळ .
मनाची अस्वस्थता ; गोंधळलेली स्थिति ; विसकटलेली स्थिति . ( क्रि० करणे ; होणे ).
हट्टी किंवा द्वाड पोर जमिनीवर लोळून व हातपाय आपटून करते तो गोंधळ ; हूड किंवा उच्छृंखल पोराने घेतलेली लोळण ; केलेली धडपड - गडबडणे . [ लोळणे + घोळणे ]
०पट  स्त्री. लोळण ; आजारामुळे आलेली पडून राहण्यासारखी स्थिति ; अंथरुणावर पडून लोळणे ; एखाद्या सांथीने पुष्कळांना दुखणे येऊन लोळत लोळत पडण्याची स्थिति ; आजारामुळे आलेली दुर्बलता ; हीनदीनपणाची स्थिति . [ लोळणे + पडणे ]
०वडी  स्त्री. निरनिराळ्या डाळींच्या चुरीच्या पिठाची लांबट वळी करुन ती उकडल्यानंतर तिची केलेली वडी . [ लोळणे + वडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP