Dictionaries | References

उचल

   
Script: Devanagari

उचल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   fallen to the lot of some other of the sharers. 7 Monies borrowed from various quarters, or at different periods, or taken up, from time to time, from one's own banker. v उचल, फेड: also so bor- rowing or so taking up of monies. v कर. 8 seizing and dunning; catching up and harassing for payment. v कर, लाव g. of o.

उचल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An assault. Reviving. inciting. raising.

उचल

 ना./क्रि.  अग्रिम धन , आगाऊ घेतलेली रक्कम , उधारी , वारंवार रक्कम घेणे ;
 ना./क्रि.  उठावणी , चळवळ , जागृती ;
 ना./क्रि.  पुन्हा उभे करणे , पुन्हा जोरावणे , पुन्हा डोके वर काढणे , बळावणे ;
 ना./क्रि.  उंच करणे , वर करणे ;
 ना./क्रि.  आवेशाने चाल करणे .

उचल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे   Ex. पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
 noun  आगाऊ घेतलेला पगार   Ex. या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
   see : उचलणे

उचल

  स्त्री. 
   चाल ; हल्ला ; घाला . ( क्रि० करणें ).
   पुन्हां वर डोकें काढणें ; पुन्हां जोरावणें , बळावणें ( आजार , शत्रु , गोंधळ इ . ). ( क्रि० खाणें . )
   उत्तेजन देणें ; प्रवृत्त करणें ; प्रोत्साहन देणें ; मागें लागणें . ( देणें )
   पुन्हां उभें राहणें ; जोडणें ; स्थापना करणें ; ( कर्जबाजारी किंवा नादार इसम ) स्थिरस्थावर होणें . ( घेणें )
   ( संघटित किंवा जोराचा प्रयत्न करुन ) एखाद्याला वर उचलणें , आणणें .
   ( वांटपामध्यें ) एखाद्याच्या हिश्शाला दिलेल्या ( विहीर किंवा एखादा हक्क ) वस्तूबद्दल मोबदला म्हणून दिलेला . विशिष्ट जमिनीचा तुकडा .
   आपल्या सावकारा - पेढी - कडून किंवा कोणाकडून वेळोवेळीं काढलेल्या , उचललेल्या रकमा . ( क्रि . उचलणें ; फेडणें . )
   अशा रकमा उसन्या घेणें ; उधारी . ( क्रि० करणें . )
   पैशाबद्दल तगादा लावणें , करणें , छळणें , नड लावणें .
   जागृति ; चळवळ ; उठावणी . सर्व प्रांतांत एकदम उचल झाली . - टिळकचरित्र ३ . ६ . ३ . [ सं . उत + चल ]
०चावडा   रा - वि . उच्छृंखल ; अविचारी ; धंद्यांत मन नसलेला ; लहरी ; हुक्कीबाज ; अस्थिर ; चंचल ; तर्‍हेवाईक ; छांदिष्ट .
०चावडेपणा  पु. छांदिष्टपणा ; लहरीपणा ; चंचलबुध्दि .
०जागता   ( अर्वाचीन काव्य )- वि . ताजेतवानें होण्या - करण्यासाठीं तयार ; हुषारी आणणारा . उभीं झोंपतीं झाडें , त्यांचा उचलजागता चाळा । - कृष्णाकाठीं कुंडल ( गोविंदा - ग्रज ).
०टप्पू वि.  
   ( वाईट अर्थी ) उडाणटप्पू ; भटकणारा ; कोठेंहि स्थिर नसणारा .
   ( चांगल्या अर्थी ) वाटसरु ; उपर्‍या ; कायम वस्ती न करणारा ; वस्तीकर्‍या ; खुंटावरचा कावळा .
०पाखल   क्रिवि . वरखालीं ; ढवळाढवळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP