Dictionaries | References

उलट

   
Script: Devanagari

उलट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : विपरीत, विपरीत

उलट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Revision or reconsideration: also Reversal; as उलट- मंसुबी Reversal of a decision, or reversed decision. उ0 घेणें with वर of o. To object to.
ulaṭa ad Contrariwise. Ex. मी तुजपासी कांहीं देसील म्हणून आलों आणि तू उ0 माझेंच कांहीं घेऊं पाहतोस.

उलट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Return, returning.
ad   Contrariwise.

उलट     

अ./ना.  परत , मागे ;
अ./ना.  उफराटे , प्रतिकूल , विरुद्ध ;
अ./ना.  उचल खाणे , पुनरुज्जीवन , पुनरत्थ्यान ,

उलट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला   Ex. रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
उलटा विरुद्ध
Wordnet:
asmওলোটা
kanವಿರುದ್ದವಾದ
kasمُخٲلِف
kokउरफाटे
malവിപരീതമായ
mniꯑꯣꯟꯅꯇꯩꯅꯕ
panਉਲਟ
sanविपरीत
telవ్యతిరేకమైన
urdبرخلاف , برعکس , الٹا , الٹ
See : वरून

उलट     

पुस्त्री . परावर्तन ; परतणें ( चेंडू वगैरे ).
ओहोटी ( समुद्राची ) ओसर .
पुनरुत्थान ; फेर उचल ; पुनरुज्जीवन ( पराजित शत्रु वगैरेचें ).
माघार ; परत , मागें आणणें ; विरुद्ध गति ( चाक , त्यावरचा दोर वगैरेची ).
पुनरागमन ; प्रत्यावर्तन ; प्रत्यागमन ( ताप , साथ , दुष्काळ वगैरेचे ).
माघार ; विन्मुखता ; भंग ( वचन वगैरेचा ).
पराड्मुखता ; सोडून जाणें ; विमुखता ; त्याग ( एखादें काम किंवा गोष्टीपासून ). ( क्रि० करणें ).
ओकारी ; वमन ; वांती .
प्रत्यावर्तन ; बद्दल देणें ; फेड ; परत करणें ; ( उपकार , अपकार , आदर , सन्मान वगैरेचा ). [ सं . उद + लट ; दे . उल्लट्ट ] - वि . उफराटें ; प्रतिकूल . - क्रिवि . परत ; मागें ; विरुद्ध दिशेनें ; विरुद्ध मार्गानें , रीतीनें . त्यानें तिकडून दगड मारितांच मीं इकडून उलट दगड मारिला .
०अहेर   एखाद्या कार्यांत मिळालेली देणगी , अहेर ( वस्त्र , वगैरे ) याबद्दल दुसरा आपला अहेर देणें ; परत अहेर .
०इन्साफ  पु. एखाद्या दिलेल्या निकालाचा विचार करुन पुन्हां दिलेला निकाल , निवाडा ; दुसरा , फेर निवाडा .
०उत्तर  न. प्रत्युत्तर ; जवाब .
विरुद्ध भाषण .
०करार  पु. केलेल्या कराराच्या प्रतिपालनार्थ प्रतिपक्ष्यानें केलेला दुसरा करार ; एका कराराच्या विरुद्ध दुसरा करार .
०कराराचें   - न . बाह्यत : खरेदी केलेली मिळकत तत्त्वत : गहाण समजून किंमत परत दिल्यास मूळ मालकास परत द्यावयाच्या अटीवर केलेला व्यवहार .
गहाण   - न . बाह्यत : खरेदी केलेली मिळकत तत्त्वत : गहाण समजून किंमत परत दिल्यास मूळ मालकास परत द्यावयाच्या अटीवर केलेला व्यवहार .
०घेणें   हरकत घेणें ; प्रतिकार करणें .
०गोष्ट  स्त्री. प्रत्युत्तर ; फेर जबाब ; उद्दामपणानें दिलेलें उत्तर .
०ढाल   ढाला - स्त्री .
स्वारी परत फिरविणें ; सैन्याचा मोर्चा विरुद्ध दिशेला ( कूच करण्यासाठीं ) वळविणें . ( क्रि० देणें ) उलटी ढाल पहा .
स्वपक्ष सोडून प्रतिपक्षास जाऊन मिळणें ; वचनभंग करणें शब्द मोडणें ; फितूर होणें ; बंड करणें .
०पालट   सुलट - स्त्री . उलटापालट . उलटासुलटा पहा . पुलट - स्त्री . उलथापालथ ; फिरवाफिरव ; खालींवर , इकडेतिकडे करण्याची क्रिया .
०बाजी   स्त्री प्रतिकार ; परत फिरविलेला डाव .
०मजकूर  पु. प्रत्युत्तर ; परत जबाब ; फेर निरोप ; उलट उत्तर .
०पत्र  न. उत्तरादाखल लिहिलेलें पत्र .
०भेट  स्त्री. आपल्या भेटीस आलेल्या गृहस्थाच्या घरीं भेटावयास जाणें ; भेट परत करणें ; परत भेट .
०मान  पु. आपला ज्यानें सन्मान केला त्याचा आपण उलट सन्मान करणें ; उलट मेजवानी , उलट जाबसाल - जबाब वगैरे वाक्प्रचारांत परत फेड असा अर्थ होतो . उलट अहेर पहा . तपासणी स्त्री .
एखादी गोष्ट पुन्हां शोधून किंवा तपासून पाहणें ; विचार करणें ;
साक्षीदारास प्रतिपक्षानें विचारलेले प्रश्न .
०मनसुबी  स्त्री. दिलेला न्याय किंवा निकाल फिरविणें ; उलट इन्साफ पहा .
०लढाई  स्त्री. फेर हल्ला ; पराजित झाल्यावर पुन्हां केलेली उठावणी ; पुनरुत्थान ( पराभवानंतरचें ).
०वारा  पु. विरुद्ध दिशेकडून येणारा वारा . ( क्रि० येणें ; लागणें ).
०सनद  स्त्री. जुन्या सनदेवरुन कायम करुन पुन्हां दिलेली सनद .
०हुकूम  पु. 
पुन्हां केलेला पहिलाच हुकूम .
विरुद्ध हुकूम ; पहिला हुकूम रद्द करणारा दुसरा हुकूम ; दुसरा हुकूम .
०हुंडा  पु. वधुपित्यानें वराकडून घ्यावयाचें द्रव्य , शुल्क . माझा उलटहुंडा घेण्यासाठीं वडिलांनीं मला मुद्दाम बिनलग्नाची वाढविली . - सासं २ . ४१५ . [ उलड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP