|
पु. पाणी ओढण्यासाठीं दोन चाकांचें एक साधन . यंत्राचें चाक ( पांणी काढण्याच्या , सुतास पीळ देण्याच्या , दोर्या वळणाच्या ). ( सामा . ) एखाद्या यंत्राचें चाक . यंत्र . कांड्यावर सूत भरण्याचें साधन . सूत कातण्याचा चरखा . [ सं . अरघट्ट ; प्रा . अरहड्ड - रहट ] ०गाडगें न. वर गाडग्यांची अगर पोहर्यांची माळ असलेलें रहाटाचें मोठें चक्र . ( ल . ) नशीबाचे नेहमीं होणारे फेरफार , चांगलीं किंवा वाईट परिस्थिति ; ऐहिक व्यापार ; खालींवर होणें ; ( प्रपंच , व्यवहार इ० ची ). एकसारखी देवघेव , व्यवहार . ०घटिका स्त्री. रहाटगाडगें . न चुके संसार स्थिति । रहाटघटिका जैसी फिरतचि राहिली । - तुगा २४८३ . ०पाळणा पु. यात्रेंत चार पाळणे बांधलेलें फिरतें चक्र उभारतात तें ; जत्रेंतील खालींवर फिरणारा पाळणा . ०वड स्त्री. ( कों . ) रहाट तयार करण्यास लागणारीं साधनें ( कणा , रवे , खापेकड , लोटे , तुंबे इ० ) ०वणी न. ( को . ) रहाटाचें पाणी ; रंहाटगाडग्यानें काढिलेलें पाणी ; याच्या उलट ओढ्या - विहिरीचें पाणी . या एवढे मोठे आगरास रहाटवणी किती म्हणून शिंपाल . [ रहाट + वणी = पाणी ] रहाटागर पु . न . रहाटानें पाणी देऊन तयार केलेलें पीक , मळा , शेत . [ रहाट + आगर ] रहाट्या वि . रहाट चालविण्यास नेमलेला अगर नेमण्यास लायक मनुष्य ; पशु . दोन्ही बाजूच्या वतीनें खेळणारा खेळाडू . एकदा एक तर एकदा दुसरी बाजू घेणारा ; दुटप्पी ; वेळ येईल तसें वागणारा . ( ल . ) व्यवस्थापक ; प्रमुख . ( लग्न इ० समारंभांत ) वेतन न घेतां काम करणारा . ओझें वाहून शिवाय वाट दाखविणारा वाटाड्या ; हमाल व वाटाड्या . [ रहाट ]
|