Dictionaries | References क कर्हें Script: Devanagari See also: कर्हा Meaning Related Words कर्हें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उंट ; उंटाचें पिलूं ' तंव विकट नामें कर्हा ' - पंच ३९ . ' अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्हेनि जैसें । ' - ज्ञा ११ . ४१४ . ( सं . करम ) न. उंट . ' अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्हेनि जेसें । ' - ज्ञा . ११ . ४१४ . ( सं . करभ = उंटाचें पिलू )१ मडकें ; मातीचा लहान घडा ; ज्या मडक्यास तोटीसारखें स्तन ( टोक ) असतें असे मडकें ; रहाट गाडग्याच्या माळेंतील मडकें . ' रहाटमाळेचे करे । पुढती रिता पुढती भरे । ' - एभा १० . ६७६ . ' सोन्याच्या कर्हा मोत्यांनी भरा ' - वेड्यांचा बाजार . २ लग्नांत पाणी भरलेल्या तांब्यांत अथवा पंचपात्रींत आंब्याच्या डहाळ्या , पानें टाकून त्यावर शेंडी वर केलेल्या नारळ ठेवतात . या भांड्यास कर्हा म्हणतात . व तो नवरीच्या व नवर्याच्या बहिणीच्या ( बहिण नसल्यास दुसर्या स्त्रीच्या ) हातांत असतो आणी तो कर्हा घेऊन ती आपल्या बहिणीच्या ( वधूच्या ) अगर भावाच्या ( वरच्या ) मागें उभी असते . -( क्रि०घेणें .) ३ सामान्यत ; कलश ; तांब्या . ४ ( बायकी ) मंगळागौरीची पंचामृती पुजा झाल्याबरोबर तें तीर्थ एका भांड्यांत भरून त्याचें तोंड चोळीनें बांधून त्यावर गोड्या तेलाचा दिवा ठेवतात तो ( हा प्रकार बहुधा कोंकणसंस्था आढळतो ). ५ एखाद्या मंगल संस्काराला वेळीं ओवाळावयास अगर मागे धरावयास जो दिवा घेतात तो . ' मागें मी मुहुर्ताचा कर्हा घेऊन उभी होतें ' - वेड्यांच्या बाजार . ( सं . करक ; प्रा . कराअ = करा )०दिवा पु. वरील ५ वा अर्थ दीप ; प्रा . करअ ; प्रा . करअ = करा ) ०दिवा - पु . वरील ५ वा अर्थ पहा . ओलाण दिवा ; लामण दिवा .( क्रि० घेणें .) ( सं . करक + दीप ; प्रा . करअ + दीव )०दिव्याच्या पु. कर्हा दिवा धरणार्या ख्रोस वस्त्रें वगैरे देऊन तिच्या केलेल्या सन्मान व तीं द्यावयाची सन्मानाचीं वस्त्रें पोषाख .मान पु. कर्हा दिवा धरणार्या ख्रोस वस्त्रें वगैरे देऊन तिच्या केलेल्या सन्मान व तीं द्यावयाची सन्मानाचीं वस्त्रें पोषाख . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP