Dictionaries | References

रड

   
Script: Devanagari

रड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : रडणें, रडें

रड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   raḍa f A long or continued crying or cry. v घे, लाव, & लाग, चाल, खळ, राह, अटोप. 2 A whining complaint; a piteous representation of woes. v सांग, गा. 3 A cry or importunate call after. Ex. यंदा पावसाची रड दिसती.

रड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A continued crying. A whining complaint.

रड

 ना.  गार्‍हाणे , तक्रार , पिरपिर .

रड

  स्त्री. 
   एकसारखें न थांबता रडणें किंवा अशा रडण्याची क्रिया . ( क्रि० घेणें , लावणें , लागणें , चालणें , खळणें , राहणें , आटोपणें ). या मुलाला सकाळपासून रड लागली आहे .
   तक्रार ; पिंरपिर . ( क्रि० लावणें ; चालविणें ). [ रडणें ] सामाशब्द -
०कथा   कहाणी - स्त्री . लांबलचक करुणास्पद कहाणी ; दुःखाची गोष्ट ; विपत्तीची कंटाळवाणी हकीकत ; ( क्रि० सांगणें ; गाणें ).
०गाणें  न. करुणास्पद कहाणी , गोष्ट , तक्रार इ० ; रडकथा ; दुःखाची गोष्ट .
०गात्या वि.  सदा आपल्या दुःखाच्या रडकथा , गार्‍हाणीं सांगणारा . [ रडणें आणि गाणें ]
०गार्‍हाणें  न. रडकथा ; रडगाणें ; शोकमय कथा . ( क्रि० सांगणें ; गाणें )
०गेला वि.  रडकथा , रडगाणें सांगण्याची प्रवृत्ति असलेला . [ रडका ]
०तोंड्या वि.  ज्याचा सर्वकाल रडण्याचा स्वभाव आहे असा ; मेषपात्र ; दुर्मुखलेला ; नेहमीं रडगाणें कुरकुर करणारा , सांगणारा . [ रडणें + तोंड ]
०पंचक  न. नेहमींचें रडगाणें अगर रडकथा , ( प्रपंचांतील ओढाताण व दुःख यामुळें ) ( क्रि० गाणें , सांगणें , वाचणें , लावणें , मांडणें ). रडारड स्त्री . कोणी गेला , मेला इ० कारणानें मोठें दुःख झालें असतां कोणेकांनीं रडूं लागावें असा जो व्यापार चालतो ती ; ( सामा . ) रडणें ; शोक करणें ; अनेकांनीं एकदम रडणें . [ रडणें ] रडारोई , रडारोवी स्त्री . मोठा शोक व रडणें ; छाती , ऊर बडवून रडणें ; मोठा आक्रोश ; आरडा ओरड . काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी । - तुगा १५८२ . [ म . रडणें ; हिं . रोना = रडणें ] रडुरडु , रडूरडू नस्त्री . रडण्याची पिरपीर . - क्रिवि . नेहमीं रडत रडत ; मुळमुळीत संमतीनें ; दीनवाणीपणानें . ( क्रि० करणें , लावणें , मांडणें ). रडू , रडें न .
   रडण्याची क्रिया .
   रडण्याचा आवेश . ( क्रि० कोसळणें ).
   शोक , भय , दुःख , प्रेम , हर्ष इ० कारणांनीं अंतःकरण शिथिल होऊन डोळ्यांत अश्रू येणें , तोंड पसरणें कंठध्वनि निघणें इ० विकारविशेष उत्पन्न होणें ; रडणें ; रुदन . ( क्रि० येणें ). देखे मडें येई रडें . [ रडणें ] रड्या - वि .
   सर्वकाल रडण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; सर्वदा रडणारा ; उत्साहहीन ; मंदगतीनें चालणारा ; रडतराऊत ; रडतोंड्या ; दुर्मुखलेला .
   ( ल . ) चालण्यास , कामास मंद असा ( बैल इ० ).
   हरसबबी ( इसम ). [ रडणें ] रडका - वि .
   सदा रडत असणारें ( मूल ); रडण्याची अगर चिरचिरण्याची संवय असलेला ; नेहमीं तक्रार करणारा ; गार्‍हाणें सांगणारा .
   दुःखी ; कष्टी ; मंद ; निराश ; निरुत्साही ( चेहेर्‍याचा अगर बोलणारा ).
   ज्याचे हातून कोणतेंच काम चांगलें होत नाहीं , तडीस जात नाहीं असा .
   रडतांना होतो तसा ( आवाज , चर्या ).
   ज्याचा चेहेरा , भाषण , काम इ० टवटवीत , उत्साहयुक्त किंवा प्रसन्न नाहीं असा .
   कंटाळवाणें ( भाषण इ० ). [ रडणें ] रडकी गोष्ट - स्त्री . शोकमय किंवा शोकजनक गोष्ट ; वाईट गोष्ट . रडकी सूरत - वि . सदा दुर्मुखलेला ( इसम ); सदा रड्या ; नेहमीं रडकी मुद्रा असणारा ; रडकी मुद्रा धारण करणारा ; रड्या ; दुःखी चेहेरा , मुद्रा असलेला . [ रडका + अर . सूरत ] रडकुंडा , डी - वि . रडावयाच्या बेतास आलेला ; डोळे पाण्यानें भरुन आले आहेत असा ; निस्तेज . [ रडणें आणि तोंड ] रडकुंडीस येणें - कांहीं कामांत अति त्रासल्यामुळें किंवा दूःख सोसवेनासें झाल्यामुळें आतां रडूं लागावें अशा स्थितीस पोहोंचणें ; रडण्याच्या बेतांत येणें ; अति दगदगीमुळें रडण्याच्या स्थितीस येणें ; रडें कोसळण्याइतका त्रास होणें , याच अर्थानें जीव रडकुंडीस येणें - रडीस येणें असेंहि म्हणतात . ती आजोबाजवळ गेली आणि अगदीं रडकुंडीस येऊन म्हणते कीं , लोक आतां तोंड नाहीं काढूं देत बरं कां ? - पकोघे . रडकूळ - स्त्री . ( गो . ) रडकुंडी . रडणें - अक्रि .
   रुदन करणें ; अश्रू गाळणें .
   विषाद वाटणें ; शोक करणें .
   ( ल . ) अपयश येणें ; ठेचाळणें ; आपटणें ; नष्ट होणें ; बंद पडणें ; अनादरानें बाजूला ढकलला जाणें . चार दिवस पाटीलबोवांचा आश्रय होता तोहि रडला . आतां गोंदोबाला भीकच मागितली पाहिजे . बक्षिसी रडो पण पगार तर द्याल कीं नाहीं ?
   नुकसान होणें . तूं नोकरी सोडलीस तर त्यांत माझें काय रडतें ?
   ( वैतागानें , निंदेनें ) असणें ; होणें . दोन वर्षे मामलत रडत होती तेव्हां आमच्या मुलानें आम्हाला काय दिलें तें तुम्ही पाहिलेंतच , आतां मामलत गेली , आतां काय देणार फतर्‍या ?
   एखादी गोष्ट घडणें , करणें , सुरु करणें या अर्थी तुच्छतेनें योजतात . मी सावकारी करीन म्हटलें ती रडली . आतां दुसरें कांहीं रडावें .
   निंदणें ; निर्भर्त्सिणें . मी त्याला नाहीं दोष देत , मी आपल्या दैवाला रडतों . - सक्रि . ( निंदेनें ) चालविणें ; करणें . दोन वर्षे तूं दुकान रडलास तेवढें बस्स झालें . [ सं . रट ; प्रा . रड ] म्ह०
   रोज मरे त्याला कोण रडे .
   ( व . ) रडली तर रडली काय माणिक मोती झडतील ? ( ही म्हण रडणार्‍या मुलीला अनुसरुन आहे . म्हणजे रडण्याचा एवढा धाक कशाला - या अर्थी ). रडतखडत , रडतरडत , रडत पडत , रडत कसत - क्रिवि . मोठ्या कष्टानें ; इच्छेविरुद्ध कसेंबसें ; रेंगाळत ; आळसल्यासारखें ; नाइलाजानें ; बिगारीनें ; मंदपणानें . रडतगोत्र - न . रड्या वंश ; रडी मंडळी अथवा जथावळ ; सदोदित कुरकुरणारी अथवा रडतराऊ व्यक्ति ; नेभळट , नेभळा , बिनकर्तबगारीचा , उत्साहरहित मनुष्य . त्याचें रडतगोत्र आहे ( म्हणजे तो रडतराऊत आहे ). रडत घोडें , रडत राऊत , रडत राव - नपु . लोकांच्या सक्तीनें किंवा स्वतःची इच्छा नसतांना कांहीं काम करणारा ; रडवा मनुष्य ; उत्साह किंवा धमक नसलेला , नेहमीं वाईट अगर संकटाची सबब सांगणारा इसम . रडता राऊत घोड्यावर बसविणें - एखाद्या कामास आंबटतोंड्या अगर निरुत्साही मनुष्यास पाठविणें अगर त्यास काम सांगणें ; काम करण्याचें मनांत नसणार्‍यास बळजबरीनें कामास लावणें . रडत राऊत घोड्यावर बसविला तर मेल्याची खबर आणितो . रडत लक्षुमी , लक्ष्मी - स्त्री . रडतपार्वती ; क्षणोक्षणीं कांहीं थोडेसें निमित्त होतांच रडूं लागणारी स्त्री ; उत्साहरहित स्त्री . रडता - वि . रडणारा ; रडका ; रड्या ; रडतोंड्या . हासती बायको आणि रडता पुरुष कामाची नाहींत . [ रडणें ] रडतोंड - न . दुर्मुखलेला चेहरा अगर सुरत . रडवा - वि . रडका ; दुःखी ; खिन्न ; कष्टी ; नेहमीं रडण्याची संवय असलेला ; सदा तक्रारी करणारा ; कुरकुर्‍या किंवा तशा स्वभावाचा ; निराश ; दुर्मुखलेला . [ रडणें ] रडविणें - सक्रि .
   रडावयास लावणें , भाग पाडणें ; दुःख देऊन रडीस आणणें .
   दुःखकारक प्रसंगाच्या वर्णनानें किंवा देखाव्यानें कोणेकाला डोळ्यांतून अश्रु गाळावयास लावणें .
   ( ल . ) नाश करणें ; वाढ खुंटविणें ; उर्जितावस्थेस येऊं न देणें .
   त्रास देणें ; चिडविणें ; एखाद्याला रडावयास येईल इतकें छळणें , गांजणें , उपद्रव देणें . मला ह्या कामानें पांच वर्षे रडविलें .
   आनंदाचा प्रसंग , पाऊस , वारा , रोग , थंडी , ऊन्ह इ० नीं शेत , रचनाविशेष इ० च्या रंगाचा भंग करणें .

Related Words

रड   मायेबगर रड ना, उज्या बगर कड ना   कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड   आवै रड धुवेखातीर आनी धूव रड गांवच्या मिंडा खातीर   गोष्‍टीची धड नि कामाची रड   आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   गोंडे हालैतना गोड, बायिले पोस्‍तना रड   जाळावांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   जाळावीण कढ नाहीं, मायेवीण रड नाहीं   मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   tears   crying   weeping   उंसाचा कोंब, खाण्याची बोंब   ट्याहां   ट्याहां ट्याहां   जागें जावप   आळप   अळप   अळपणी   डुकर मारुंकय व्हेल्‍यार रडता, पोसुंकय व्हेल्‍यार रडता   ढळढळां   वयल्यान   ढळढळ   रेरे रेरे   किरकिर   कढ   गाणें   दैन   जाळ   द्वार   कडका         एक   घाट   आग   धस   नारायण   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP