|
पु. ( हिं .) हिंदी पदाचा एक वीरसप्रधान , उत्तेजनपर प्रकार ; पोवाडा ; वीरश्रीचें कवन ; एक छंद . ' भाट बोलती कडका । धडाधडी होतसे । ' - दावि ४९६ . कडक पहा . पु. कडाका - खा . १ अतिशयपणा ; तीक्ष्णपणा ; भर ; तीव्रता ( ऊन्ह , थंडी इ०चा ). ' उन्हाचा - थडिचा कडका .' ' आज थंडीचा मोठा कडका पडला आहे , नाही ?' २ एकाएकीं झालेलें अतिशय दुःख ( अंग भाजलें , पलिस्तर मारलें असतां होतें तसें . ) ३ कडकडाट ; गर्जना ( मेघांची ); दणदणाट ; खणखणाट ; घोष ; गजर ( अनेक वाद्यांचा ). ' टाळी भजनाचा करवूनि कडका ' - दावि २६८ . ' मंगळतुरांचा कडका । ' - वेसीस्व ६ . ६९ . ४ जोराचें भांडण ; रागाचा आवेश . ' आला क्रोधाचा कडका । ' - दावि ३१४ . ५ ओरडा , रड ( अतिवृष्टि , अनावृष्टि , दुष्कांळ , सांथ , परचक्र वगैरेबद्दल ). अधिक अर्थासाठीं कडाखा व तडाखा पहा . ६ थाट ; मौज . ' आरंभला उत्छाह कडका ' - दावि २४८ . ७ ज्वारीवरचा एक रोग ( यानें पीक वाळतें ). ( क्रि०पडणें ). - शे ७ . १९५ . ८ ( कातकरी ) आवाज ; चाहूल . ' रथाचा कडका लागतांच राजाच्या मुलानें धांवत जाउन देवाचा रथ धरला .' - मसाप १ . ३ . ३१ .- क्रिवि . सपाट्यानें ; तडाख्याने ; त्वरेनें ; तत्परतेनें ; ( काम , माणसाचें बोलणें किंवा क्रिया चालणें ). ( कडक ) पु. ( हिं ) हिंदी भाषेंतील एक वृत्त , छंद ह्मा वृत्तांत भाठाचें गाणें असतें . याला वीर असेंहि दुसरें नांव आहे . अमृतरायाची कांही अक्विता या छंदांत आहे . याचें उदा० ' ध्रुवागमन ऐकतांचि भूप हर्ष मानितसे , तट तट तुटसि कसे , पुर्व दिशे पूर्ण चंद्र समुद्रासि जसा दिसे , उंचबळुनि गर्जतसे .' अमृत ११ . ' नाना पदें नाना श्लोक । नाना वीर नाना कडक । ' - अमृत ११ . ' नाना पदें नाना श्लोक । नाना वीर नाना कडक । ' - दा १२ . ५ . ५ ( हिं कडका - खा - यशोगीत , युद्ध गीत ) ०भार - पु . कडका गाण्यार्या भाटांचा समुदाय . ' कडकभार निघाले । ' - वेसीस्व ६ . ५६ .
|