Dictionaries | References

जेवणें

   
Script: Devanagari

जेवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. जैसें लक्षभोजन होता पाही ॥ तयामाजी अंत्यज जाई ॥ मग ब्राह्मण उठति लवलाही ॥ जेविता ठाव टाकूनि ॥. जेवूं घालणें To give to eat; to feed or maintain: also to set food before. जेवून सेवा गोड Worship or service is sweetest after one's meal. दोहींकडून जेवणें To take payment from both parties in a cause: also to take payment from one party and a bribe from the other;--used of a Wakíl or Advocate. दुसऱ्याच्या तोंडानें जेवणारा One who catches up and re-utters the sayings of another.
.

जेवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Make a meal, dine or sup.
जेवीन तर तुपाशीं, नाहीं तर उपाशीं.   My own terms or none.
दुसऱ्याच्या तोंडानें जेवणारा.   One who catches up and re-utters the saying of another.

जेवणें     

अ.क्रि.  १ खाणें ; भोजन करणें . कधीं कधीं या क्रियापदाला कर्म असतें तथापि त्याचा संबंध कर्त्याशींच असतो . उ० मी भात जेवलों , भाकरी जेवलों . २ ( ल . ) फळ चाखणें ; भोगणें ( एखाद्या बर्‍यावाईट कृत्याचें ); अनुभवणें ; परिणाम भोगणें . पूर्वी दुष्कर्मे केलीं त्यांचें फळ आतां जेवतों . ३ लांच घेणें . - न . ( राजा . ) देवळांतील जेवणावळ . [ सं . जेमन ; पो . जि . जलार ; फ्रेंजि . जमार ; गु . जमन ; पं . जेउणा ; हिं . थेवना ] ( वाप्र . ) जेविता ठाव टाकणें - पुढचें ताट ढकलून देणें ; पानावरून उठणें . जैसें लक्षभोजन होता पही । तयामाजी अंत्यज जाई । मग ब्राह्मण उठती लवलाही । जेविता ठाव टाकूनि । जेवूं घालणें - १ खावयास देणें ; पोषण करणें . २ वाढणें ; अन्न पुढें ठेवणें . जेवून सेवा गोड - जेवण झाल्यानंतर मग नौकरी वगैरे बरी वाटते . दोहोंकडून , जेवणें - एखाद्या कामांत दोन्ही पक्षांकडून पैसा घेणें किंवा एका पक्षाकडून पैसे ( फी ) घेऊन दुसर्‍या पक्षाकडून लांच घेणें ( वकिलांसंबंधीं योजतात ). म्ह० १ जेवीन तर दुधाशीं ( तुपाशीं ) नाहीं तर उपाशी = मी म्हणेन तसें नाहीं तर मुळीच नाही . २ रांधावें तसें जेवावें , करावें तसें पावावें . सामाशब्द - दुसर्‍याच्या तोंडानें जेवणारा - वि . १ दुसर्‍याचें बोलणें ऐकून घेऊन तेंच पुन्हां बोलणारा . २ स्वत : च्या मतानें कांहीं न करणारा ; दुसर्‍याच्या तंत्रानें वागणारा . जेवण्या - पु . ( कों . ) गलबतावरील जेवण करणारा . जेवतागण - वि . १ केवळ जेवण्याच्या कामाचा ( माणूस ). २ ( ल . ) बिनकामाचा पण खादाड ( माणूस ); फुकटखाऊ ; भोजनभाऊ . तो काडीमात्र उपयोगी नव्हे , आपला जेवतागण आहे . [ जेवणें + गण ] जेव्या - वि . जेवणाचे वेळीं हजर असणारा ; भोजनभाऊ . जेवतागण पहा . [ जेवणें ]

जेवणें     

दोहोंकडून जेवणें
काही वर्‍हाडी मंडळींचा वर व वधू पक्षांशी दोहोंशीहि नात्‍याचा संबंध असतो. त्‍यामुळे ते दोहीकडील जेवणावळीत हजर असतात. त्‍याप्रमाणें उभयान्वयी माणसाने दोन्ही पक्षांकडून लांच वगैरे घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP