|
स्त्री. धान्यादिकाची विपुलता , समृद्धि , भरपूरपणा . - वि . पुष्कळ ; विपुल ; भरपूर ; अतिशय . बंद केलेलें ; लावलेलें ( किल्ला इ० चें दार , दरवाजा , खिडकी ). ( क्रि० करणें ; होणें ). दरवाजे किल्ल्याचे रायगड याचे महामूर राखावे , दिंड्या मात्र उघड्या असाव्यात . ०मराचिसं २ . पुरें झालेलें पेरणी इ० सर्व कामें केलेलें ; पूर्णत्वास , पिकापावेतों आलेलें ( शेत , पीक इ० ). शेत पिकून महामूर झालें . गाढ ; स्वस्थ , भरपूर ( झोंप , नीज , निजणें ). आकंठ ; भरपूर ; भरगच्च ( जेवणें , खाणें , भोजन ). [ अर . मअमुर ] महामुरी - स्त्री . विपुलता ; समृद्धि . द्रव्याची लष्करांत महामुरी झाली . ( दार , खिडकी इ० ची ) बंदपणाची , दरवाजा लावलेली स्थिति . ( शेत , पीक इ० ची ) पूर्णावस्था ; लागवड .
|