|
स्त्री. १ ( व . ) औषधाचा टक ; मात्रा . दुधाच्या दोन टुका देत जा २ ( व . ) संवय . स्त्री. १ कळ ; गुरुकिल्ली ; युक्ति ; खुबी ; मख्खी ; फसविण्याची हिकमत ; गूढ . ( क्रि० साधणें ; सांपडणें ). २ धोरण ; खुबी ; हातोटी ; कसब ; उत्सुकता ; कौशल्य ; हुषारी ; शीघ्रग्रहणशक्ति ; कल्पकता ; आकलनशक्ति ; अभिरुचि ; पठुत्व . ३ ( टोंक = अणकुची ) जरूरीच्या वस्तू ; स्वाभाविक गरज ; सुस्थितीस आवश्यक परिस्थिति , काल , साधनसामुग्री , निगा , व्यवस्था वगैरे ; काळजी दक्षता ( माणूस , जनावर , वस्तु इ० ची ). शेताची टूक सांभाळली पाहिजे . = सर्व प्रकारची काळजी योग्य वेळीं घेतली पाहिजे . ४ टक ; रोखून पहाणी ; एकाग्र दृष्टि . टूक हा शब्द जेव्हां टूक राखावयाची या अर्थी असेल तेव्हां धरणें , संभाळणें , राखणें य्हा क्रियापदाबरोबर योजतात आणि जेव्हां हयगय या अर्थी असेल तेव्हां चुकणें , टळणें , अंतरणें या क्रियापदाबरोबर योजतात . जेवण टूकेवर ठेवणें - ऋतुकाळ , अन्नाचे गुणदोष व आपली प्रकृति हें सारें ध्यानांत घेऊन जेवणें . टूकेनें , जेवणें , निजणें , टोलणें , औषध घेणें , देणें इ० - या सर्व गोष्टी योग्यपणें , गरज आहे - नाहीं इ० पाहून काळजीनें व नियमितपणें करणें .
|