Dictionaries | References

जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका

   
Script: Devanagari

जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका

   खेळामध्यें एक आई आपल्या मुलाला विकावयास तयार होते व तिच्या मुलाला एक अडक्याला मागणी येते. परंतु अखेरीस ती आपलें मूल द्यावयाचें नाकबूल करते व अडक्यापेक्षां आपलें मूलच अधिक लाडकें आहे असें सांगतें. आईची द्रव्यापेक्षां मुलावरच माया अधिक असते हें सांगावयास नको. ‘ भोपळा घ्या भोपळा, केवढ्याला ? अडक्याला. जळला तुमचा अडका माझा भोपळाच लाडका. ’ अशाप्रकारेंहि हा खेळ खेळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP