Dictionaries | References

माझा

   
Script: Devanagari

माझा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mine.

माझा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Mine.

माझा     

वि.  स्वतःचा ; माजा ; मम . मी शब्दाचें षष्ठीचें रुप . [ सं . अस्मत ] म्ह० माझी बाई गुणाची पायलीभर चुनाची = रडत असलेल्या मुलीस समजावितांना थट्टेनें म्हणतात .
०मी   क्रिवि . मी एकटा ; दुसर्‍याची मदत न घेतां . माझिये क्रिवि . माझ्या . मनीं माझिये हीत ऐसेंचि होतें । - राक १ . ३७ . माझें वि . मी याचें षष्ठीचें नपुंसकलिंगीं रुप . [ सं . अस्मत ; प्रा . मज्झ = माझें ] म्ह०
माझें मला होईना अन पावणा दळून खाईना .
( व . ) माझेंच नाक वर = हरला तरी ज्याची मुजोरी जात नाहीं अशा माणसासंबंधीं . माझें तुझें म्हणणें - ( आचरणांत ) पक्षपात करणें . माझें तुझें हें म्हणशील जेव्हां । - सारुह ७ . १२१ . [ प्रा . ] माझेंमाझें म्हणणें - न . सर्व ठिकाणीं आपलेपणा दर्शविणें ; सर्व माझेंच आहे असें म्हणणें . माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां । - दा ३ . १० . ५० . माझ्याकडे तरी पहा , मजकडे तरी पहा - माझी तरी दया येउंदे . नांदा एकत्र , नको द्वेष करुं मजकडेचि बा ! पाहे । - मौउद्योग २१ . ११ . माझ्या बापाच्यानें , हें होणार नाहीं - हें करण्यास मी अत्यंत असमर्थ आहे . माझ्या वस्त - क्रिवि . ( व . ) माझ्याच्याने ; माझ्याकडून .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP