Dictionaries | References उ उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा Script: Devanagari Meaning Related Words उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उडदापेक्षां कठिणपणांत व काळेपणांत अधिक असलेल्या अनेक वस्तु आहेतपण तिकडे लक्ष न देतां तो स्वतःचीच मोठी प्रौढी मारतो. मनुष्याला स्वतःच्या गुणांची फार प्रौढी वाटते. व तो स्वतःच त्याबद्दल फुशारकी मारीत असतो व आपल्यापेक्षा इतर कोणी अधिक गुणवान असतील याची चौकशी वगैरे करण्याच्या भानगडीत तो पडत नाहीतर स्वतःचीच स्तुति करण्यात दंग असतो. वास्तविक काळेपणा व कठिणपणा हो दोष आहेत पण काही लोकांस आपल्या दोषांबद्दलहि अभिमान वाटतो. व त्यांचीच ते फुशारकी मारूं लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP